22/05/2026
श्री सिद्धेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे आणि जेष्ठ नागरिक संघ, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने
जेष्ठ नागरिकांमध्ये आढळणाऱ्या विविध मूत्रविकार, त्यांची लक्षणे, आधुनिक निदान पद्धती व उपचार याविषयी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
स्थळ: जेष्ठ नागरिक संघ, शिवतीर्थाजवळ, धुळे
दिनांक: गुरुवार, २१-०५-२०२६
या मार्गदर्शन सत्रात
- डॉ. जितेंद्र ठाकूर – जनरल सर्जन
- डॉ. संदीप कुरंगळ – मूत्रविकार तज्ञ (Urologist)
यांनी वयोवृद्धांमध्ये आढळणारे विविध मूत्रविकार,
- वारंवार लघवी होणे
- लघवी अडणे
- प्रोस्टेट समस्या
- मूत्रमार्गातील संसर्ग
- आधुनिक उपचार पद्धती
याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या उपयुक्त व्याख्यानाचा जेष्ठ नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतला.
सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नेहमीच समाजाच्या आरोग्य जनजागृतीसाठी कटिबद्ध आहे.
सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 WQ59+69W, Near Ganpati Bridge, Garud Colony, Deopur, Dhule, Maharashtra 424005
📞 8888810802 | 02562 282 100
🌐 https://siddheshwarhospital.com