श्रीsandipak Clinic

श्रीsandipak Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीsandipak Clinic, Doctor, A-1, Malhar Palace Society No. 2, Manpada Road, Opp. Kasturi Plaza, Behind Ankit Society, Dombivili.

31/10/2024

शुभ दिपावली नमस्कार

आजकल जन्मदिन या विभिन्न त्योहारों पर चॉकलेट उपहार में दी जाती है। हालाँकि इसे होममेड के रूप में लिखा जाता है, इसे अक्सर बाहरी चॉकलेट यौगिक का उपयोग करके बनाया जाता है। इस चॉकलेट कंपाउंड में पाम ऑयल, चीनी, प्रिजर्वेटिव, इमल्सीफायर्स जैसी हानिकारक चीजें होती हैं। एक विकल्प के रूप में हमने संपूर्ण स्वस्थ सामग्रियों का उपयोग करके घर पर बनी चॉकलेट बनाई हैं। इसमें भुना हुआ ऑर्गेनिक सोयानट पाउडर, अलसी के बीज, शैल कैल्शियम, रसायन मुक्त देशी गुड़, कोको पाउडर, घर का घी, ए2 मिल्क पाउडर शामिल हैं। इसके अलावा आपके लिए काजू, बादाम, अखरोट, खजूर, किशमिश, मूंगफली और नारियल का इस्तेमाल कर 4 तरह की हेल्दी चॉकलेट तैयार की गई हैं. ये छोटे बच्चों को देने के लिए विशेष रूप से अच्छे हैं। आइए इस दिवाली अपने प्रियजनों को न्यूट्रीचोको स्वस्थ चॉकलेट उपहार में दें।

सुश्री केतकी गद्रे 9324265710
वैद्य कौस्तुभ गद्रे 9967772305
अधिक कहने के लिए, ये चॉकलेट ट्रैकिंग पर जाते समय ऊर्जा के लिए उपयोगी हैं। मुझसे 2 लोग हिमालय में ट्रैकिंग के लिए हेल्दी चॉकलेट ले गये थे।

Shubh Dipawali namaskar

Nowadays chocolates are gifted on birthdays or various festivals. Although it is written as homemade, it is often made using external chocolate compound. This chocolate compound contains harmful things like palm oil, sugar, preservatives, emulsifiers. As an alternative we have created homemade chocolates using whole healthy ingredients. It includes roasted organic soynut powder, flax seeds, shell calcium, chemical free desi jaggery, cocoa powder, homemade ghee, A2 milk powder. Apart from this, 4 types of healthy chocolates have been prepared for you using cashews, almonds, walnuts, dates, raisins, peanuts and coconut. These are especially good for giving to small children. Let's gift Nutrichoco healthy chocolates to your loved ones this Diwali.

Mrs. Ketaki Gadre 9324265710
Vaidya Kaustubh Gadre 9967772305
To say more, these chocolates are useful for energy while going on trekking. 2 people from me took healthy chocolates for trekking in Himalaya.

31/10/2024

शुभ दिपावली
नमस्कार 🙏
हल्ली वाढदिवसासाठी किंवा वेगवेगळ्या सणानिमित्त chocolates भेट दिली जातात. Homemade असे लिहिले असले तरी बरेचदा बाहेरील chocolate compound वापरून ती करतात. या chocolate compound मधे पाम ऑइल, साखर, prezervative, emulsifiers अशा हानिकारक गोष्टी असतात. याला पर्याय म्हणून आम्ही संपूर्ण आरोग्यदायक घटक वापरून homemade चॉकोलेट बनवली आहेत. यामध्ये Roasted Organic Soyanuts Powder, flaxseeds, shell Calcium, रसायन विरहित देशी गुळ, कोको पावडर, साजूक तूप, A2 milk powder हे घटक आहेत.या व्यतिरिक्त काजू, बदाम, अक्रोड, खजूर, मनुका, शेंगदाणे आणि नारळ वापरून 4 प्रकारची healthy Chocolates तुमच्याकरिता तयार केली आहेत. विशेषतः लहान मुलांना द्यायला ही अतिशय चांगली आहेत. चला तर या दिवाळीला आपल्या सुहृदांना भेट देऊया NutriChoco healthy Chocolates.

सौ केतकी गद्रे 9324265710
वैद्य कौस्तुभ गद्रे 9967772305
अजून एक सांगायचे तर
ही चॉकोलेट trekking ला जाताना energy साठी उपयोगी पडतात. माझ्याकडून २ जणा नी हिमालयात ट्रैकिंग साठी नेली होती.

आपल्या हेल्दी चॉकलेटबद्दलचा अभिप्राय
21/10/2024

आपल्या हेल्दी चॉकलेटबद्दलचा अभिप्राय

Have you Heard about the Healthy Chocolate? Noooo!!! Then suprise is for youश्रीSANDIPAK CLINIC HAS SUCCESSFULLY CREATED...
30/07/2024

Have you Heard about the Healthy Chocolate? Noooo!!! Then suprise is for you
श्रीSANDIPAK CLINIC HAS SUCCESSFULLY CREATED THE HEALTHY VEGETARIAN CHOCOLATE OF TWO TYPES for more information Contact 8169503235

प्रणाम सर्वांनामी आयुर्वेदीक आहारतज्ञ डॉक्टर कौस्तुभ विष्णु गद्रे. गेली सुमारे १४ वर्षे आयुर्वेदीक आहार तयार करण्याला वा...
30/04/2023

प्रणाम सर्वांना
मी आयुर्वेदीक आहारतज्ञ डॉक्टर कौस्तुभ विष्णु गद्रे. गेली सुमारे १४ वर्षे आयुर्वेदीक आहार तयार करण्याला वाहून घेतल्यामुळे तुमच्या सर्वांसाठी एक छान सोपा उपाय शोधता आला आहे.
डायबेटीस म्हणजे नक्की काय ते पाहू.
टाईप २ डायबेटीस म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स हे सर्वांना मान्य आहे. मग इन्शुलिन वाढविण्यासाठी पॅन्क्रीयासला उत्तेजन/टोचणी किंवा नुसते इन्शुलिन देऊन कसे चालेल?
अहो इन्शुलिन हे चावीसारखे आहे आणि ही चावी आपल्या पेशींवरच्या आवरणातील इन्शुलिन रिसेप्टर नामक कुलुप उघडते. मग साखर पेशींमध्ये प्रवेश करते आणि साखरेमुळे मिळालेल्या उर्जेमुळे पेशींमध्ये सगळी कामे होतात. आता टाईप २ डायबेटीसमध्ये नक्की होते काय?
तर पेशींवर मेदसदृश चिकट, बुळबुळीत (स्त्यान) असे लेप बसू लागतात. कारण आपण चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात हा चिकटा वाढवलेला असतो. नुसते बसून किंवा झोपून रहाणे, व्यायामाचा अभाव, दह्याचा चुकीचा आणि अतिवापर, चहा, कॉफी, बेकरी उत्पादने, साखर आणि गोडधोड, जंकफूड, एकांगी/एकप्रकारचे अन्न सतत खात राहिल्याने (आहार षड् रसात्मक हवा), चुकीच्या संकल्पना मनात बाळगून मांसाहाराचा अतिरेकी वापर. स्थौल्य/जाडेपणा, ताणतणाव इ. कारणांमुळे असे घडते.
आयुर्वेदाने याचे क्लेद म्हणजे चिखल किंवा पुष्कळसा पातळ कफ (कफ चिकट असतो) असे समर्पक वर्णन केले आहे. यामुळे इन्शुलिनची चावी निसटून जाते पेशींवरचे कुलूप उघडले जात नाही. मग साखर रक्तातच पडून रहाते. मग पेशींमधील इतर प्रक्रिया ऊर्जेअभावी कशा होणार? मग त्या प्रक्रियांसाठी लागणारे घटक कसे शोषले जाणार? मग ते ही रक्तातल्या चिखलात भर घालतात. दुष्काळात तेरावा महिना!!!

आता काही उदाहरणे:- डायबेटीसच्या ट्रीटमेंटसाठी आयुर्वेदीक आहार गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड का अतिशय योग्य आहे? आणि त्यामुळे डायबेटीसपासून पूर्ण सुटका कशी होऊ शकते ते बघा:

कराडचे श्री सतीशजी मयेकर पोलिस दलात काम करणारे बऱ्याचदा रात्री एक दीड वाजता घरी येतात पहिला रिपोर्ट दिनांक ९ मार्च २०२० चा आहे तो तीन महिन्याची सरासरी या स्वरुपात १३.४० 😳 म्हणजे ३३७+
दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजता नाश्ता करून घराबाहेर पडले आणि रक्त तपासासाठी देता देता नंबर आला तेव्हा अकरा वाजून गेले होते. म्हणजे आपोआप दोन तासांनंतरचा रिपोर्ट मिळाला पण तोही ३३५.
केवळ फोनवर बोलून दिनांक २८/०२/२०२० रोजी साधारण संध्याकाळी चार वाजता त्यांना गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड मिळाले.
दिनांक ०६/०३/२०२० ला फास्टिंग १४२ आणि जेवणानंतर दोन तासांनी १६९.
म्हणजे गेली पंधरा वर्षे त्यांच्या तब्येतीला जो गंभीर धोका होता तो केवळ साडेसहा दिवसांत सुमारे २२ डोसमधे (१० ग्रॅमच्या) खूपच कमी करता आला. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष भेट न घेताही हे शक्य झाले. केवळ फोनवर बोलून समजून घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी केली की झाले.

असा चमत्कार वाटावा असा फरक कसा पडतो?
आता आपले प्रॉडक्ट गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड कसे काम करते ते पाहू.
आपल्या प्रॉडक्ट मध्ये लेसिथिन, इसेन्शियल फॅटी ॲसिडस्, व्हिटॅमिन ई, स्लो रिलीजिंग कार्बोहाइड्रेट, माफक प्रमाणात पण उच्च दर्जाचं प्रोटीन, हळूहळू शोषले जाणारे कॅल्शियम आणि अन्य असे संरक्षक घटक आहेत. लेसिथिनमुळे आपल्या शरीरातील पेशींवरची मेदसदृश आवरणे विरघळू लागतात.
इसेन्शियल फॅटी ॲसिडस् आणि व्हिटॅमिन ई हे शरीरात ॲसिडोसिसमुळे लागलेल्या/त्यामुळे ॲसिडोसिस वाढवणाऱ्या इन्फ्लेमेशनरुपी आगी विझवणारे अग्निशामक दल आहे. इतकेच नव्हे तर यामुळे शरीरात अल्कलाईन वातावरण निर्माण होऊ लागते. यात काही पथ्य पाळली तर हे काम अधिक प्रभावीपणे होईल.

म्हणजे स्थूलता कमी होऊन बेढब शरीर सुदृढ आणि सुडौल दिसू लागेल. अर्थातच यासाठी नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे.

बरं का मंडळी!!
आता बोला!!!

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क:
WHATSAPP: 9323692803

CALL: 9967772305,

किंवा आपण प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये भेट देऊ शकता (Appointment साठी WhatsApp वर संपर्क करणे).

धन्यवाद 🙏 आभारी आहे 😊🙏
आयुर्वेदीक आहारतज्ञ : डॉक्टर कौस्तुभ विष्णु गद्रे.

प्रणाम सुमाध्यान्हंं सुहृदहो*जागतिक आरोग्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!* *आणि त्यानिमित्ताने एक सुवर्णसंधी!!!*सहजपणे आरोग...
07/04/2023

प्रणाम सुमाध्यान्हंं सुहृदहो
*जागतिक आरोग्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!*
*आणि त्यानिमित्ताने एक सुवर्णसंधी!!!*
सहजपणे आरोग्य हवं असेल तर एक छान औषध आहे *Phytowiz* नावाचे. अगदी मुळापासून रोग काढून टाकते. स्टेम सेल्स आहेत त्यात आश्चर्यकारक परिणाम करणाऱ्या. कारण कुठलाही अवयव आतून ७५% सडत नाही तोवर आपल्याला रोग पकडता येत नाही. पण हे औषध शरीरात गेल्यावर जे जे बिघडले/सडले आहे ते पुन्हा कार्यक्षम करते. आणि पुढच्या काळात निर्धास्तपणे जगण्याची सोय होते. आता इतकं सगळं करायचं म्हणजे थोडा खर्च आलाच की हो पण तो *दोन महिन्यांसाठी फक्त ₹१५,०००/-
दोन महिने का तर आपले मंडल म्हणजे साधारण ४० ते ४५ दिवसांचा काळ कारण या काळात आपले शरीर पूर्ण बदलून नवे होते अशी साधारण दहा मंडल हे औषध घेतले तर खरच काय होईल?
हॉस्पिटलमध्ये उपचार करायची वेळ आली तर किती खर्च होतो आणि नेमकी ट्रीटमेंटही मिळेलच याची खात्री नाही आणि केमिकल युक्त औषधे शरीरात गेल्यावर उच्छाद मांडतात ते वेगळे. हे पूर्णतः नैसर्गिक शाकाहारी आणि चविष्ट लागणारे औषध आहे. फक्त सकाळी एकदा दीड ग्रॅमचा पाउच उघडून जिभेखाली ठेवून दहा मिनिटे तोंड बंद ठेवायचे कारण थेट हृदयात जायचे असेल तर जिभेखाली ठेवावे असे शास्त्र आहे हे तुम्ही सर्व जाणताच. मग दहा मिनिटांनी एक ते दोन ग्लास साधे पाणी प्यावे. आणि त्यानंतर अर्धा तास काही खाऊ पिऊ नये.
हो इतके चांगले औषध घेत असताना थोडे पथ्य पाळले तर उत्तम फायदा होतो. चहा, कॉफी, साखर, बेकरी पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स, हार्ड ड्रिंक्स जंक फूड वगैरे वगळता आले तर उत्तम
उदाहरणार्थ अलिकडेच माझ्या पत्नीने पावभाजी ची भाजी केली होती पण मी एकही पाव न खाता पोळीसह ती भाजी ओरपली. पण इतके पथ्य पाळून मला काय मिळाले असेल हो, तर हे औषध सुरु केल्यावर केवळ आठ दिवसांतच माझा चेहरा बदलला आणि वीस दिवसांनी तो 2017 मध्ये काढलेल्या फोटोपेक्षा जास्त चांगला वाटतो आहे.
आता बोला!!!
तरी तुम्हाला हे औषध हवं असेल तर 9967772305 या नंबर वर किंवा 9323692803 यावर संपर्क साधावा व्हॉट्स ॲपही करता येईल धन्यवाद 🙏

14/02/2021

नमस्कार!🙏
मी डॉक्टर कौस्तुभ गद्रे. 🌱

प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ आणि अनेक महिन्यांच्या रिसर्च नंतर एक परफेक्ट आयुर्वेदिक प्रोडक्ट म्हणजे लेप तयार करण्यात मला यश आले आहे जे :
Premature Balding (टक्कल पडणे),Hair Thinning, Dandruff,ईत्यादी प्रॉब्लेम खात्रीशीर रित्या बरे करते तसेच Hair Growth प्रमोट करते.👨🗣️

Modern मेडिसिन ला ज्या समस्यांवर उपाय अद्यापही सापडले नाहीत त्यांचे उपाय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये फार प्राचीन काळापासूनच लिहून ठेवण्यात आले आहेत असे दिसून येते.🌄🌏
हीना,आवळा,माका,मंजिष्ठा, जास्वंद, आणि इतर 15 घटक असलेले हे प्रोडक्ट कोणत्याही Age Group,
स्त्री,पुरुष,सर्व वापरू शकतात. 🏃🏋👫आयुर्वेदिक असल्यामुळे कोणतेही side-effect होत नाहीत!!💯😄

30-35 वर्षाखालील व्यक्तींनी वापरल्यास, एक ते दीड आठवड्यामध्येच नवे केस दिसू लागतिल तसेच संपूर्ण टक्कल असल्यास केस यायला एक ते दोन वर्षेही लागू शकतात♨️👦✌
हा उपाय चमत्कारिक वाटत असला तरी अत्यंत scientific रित्या या समस्यांची मूळ कारणे शोधून त्यांना नष्ट करण्याची क्षमता या प्रॉडक्ट मध्ये आहे.💪🏻💓
मात्र 250 रुपयाला एका महिन्याचे,तसेच 100 रुपयाला एका आठवड्याचा Trial Packही उपलब्ध आहे🙏
(यासोबत आपला हेअर Type identify करून काही घरगुती उपायही सुचवले जातील).🔱💯

अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करा:-

*Inventor Dr.Kaustubh Gadre*

*9967772305 (call or what's app)*
*8169503235(Call)*

टीप:- सुमारे दीड वर्ष संशोधक वृत्तीने स्वतःच्याच टक्कलावर प्रयोग करून केसांचे पीक घेता येत आहे. अर्थात मार्चमध्ये लॉकडाऊनचा काळ सुरु झाला त्या सुमारास फायनल फॉर्म्युला ठरवता आला आणि रोज एकदा तरी दवाखान्यात जाऊनही उरलेला वेळ साधारण दिवसातून एकदा किंवा कधीतरी दोनदा लेप लावला साधारण अर्ध्या तासात तो वाळतो पण पाऊण तासाने धुऊन टाकतो थोडे थोडे पाणी शिंपडून तो ओला करता येतो आणि आयुर्वेदाचा नियमही तेच तर सा़गतो की लेप ओला असेपर्यंत त्याचे गुण मिळू शकतात.अशा रितीने मागून आणि दोन्ही बाजूंनी हळूहळू केस वाढताना दिसत आहेत. बहुधा अजून दोन वर्षे लावावा लागेल. अर्थात माझी तयारी आहेच की चिवटपणे लेप वापरायची.
पण निरनिराळ्या लोकांना आणि माझ्या २० वर्षे वयाच्या मुलाला केस विरळ होऊ लागले असताना दोन महिन्यांतच केसांचे भरघोस पीक आले आहे.
माझ्या आतेबहिणीची तक्रार आहे की लेप लावण्यात दहा पंधरा दिवसांचा खंड पडला की केस पुन्हा गळू लागतात बर ती रोज लेप लावू शकत नाही दर तिसऱ्या दिवशी लेप लावूनही फरक पडत आहे तिला.

15/01/2021
07/01/2021

अतिशय आश्चर्यकारक परिणाम देणारे प्रॉडक्ट
गॅपोमील एनर्जी बूस्टर

नुकतेच आमच्या सोसायटीतील दोन वॉचमन काकांनी गॅपोमील एनर्जी बूस्टर खाणे सुरू केले. सकाळच्या वेळी येणारे वॉचमन काका, पाच-दहा पावले चालल्यावर दम लागल्यामुळे त्यांना थांबायला लागत असे त्यांनी गॅपोमील पहिल्याच दिवशी चार वेळा खाल्ली सांगितल्याप्रमाणे आणि रात्री आठ वाजता ड्युटी संपल्यावर घरी जाताना त्यांना मुळीच दम लागला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या चेहर्‍यावरची सूजही कमी झालेली दिसली. जी आधी सूज म्हणून जाणवली नव्हती नुसता चेहरा थोराड वाटत होता आता दुसरे वॉचमन काका रात्री येणारे त्यांना चालताना उजव्या पायाच्या गुडघा आणि पोटरी यांमध्ये प्रचंड वेदना होत असत ते म्हणत की आई आठवते मला, डोळ्यात पाणी येतं माझ्या, इतकं दुखतं. रात्रपाळी असल्यामुळे वाताचा प्रकोप होणे हे ठरलेलं होतं पण रात्री चार वेळा त्यांना सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी दहा ग्रॅम गॅपोमील एनर्जी बूस्टर खाल्ली त्यांनी आणि सकाळी आठ वाजता ड्युटी वरून परत जाताना त्यांचा पाय मुळीच दुखला नाही असे दोन परस्परांहून वेगळे असें रिझल्ट मिळू शकले. कोणताही रोग प्रायः आपल्या शरीरामध्ये हे सूज आल्यामुळे होत असतो ह्यालाच इन्फ्लेमेशन असेही म्हणतात. पहिल्या वाॅचमन काकांना त्यांच्या श्वसन मार्गात सुजेमुळे अडथळे आलेले होते त्यामुळे त्यांना दम लागत होता आणि दुसऱ्यांना गुडघा आणि पोटरी येथे आतून सूज आल्यामुळे ते दुखत होते गॅपोमील एनर्जी बूस्टर किंवा गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड ही दोन्ही उत्पादने शरीरातील कुठलीही सूज कमी करण्याकरता उत्तम आहेत आणि तेही फारच कमी वेळात आणि आयुर्वेदिक प्रोसेसिंग आणि नैसर्गिक घटक असल्यामुळे याचा कसलाही साईड-इफेक्ट नाही म्हणजे रोगांसाठी असलेली धारदार तलवार शरीरासाठी मात्र लोण्याप्रमाणे मऊ असे याचे वर्णन करता येईल

ॐ श्री गुरुदेव दत्त

साध्या सर्दी खोकल्यापासून ते दम्यापर्यंत आणि त्वचा विकारापासून मणक्याचे विकार संधिवाता पर्यंत हृदयविकार डायबेटीस आणि कॅन्सर रोखण्यासाठी किंवा त्याच्या ट्रीटमेंट मध्ये साइड इफेक्ट कमी करण्यासाठी असा दूरगामी परिणाम ह्या चविष्ट आणि गोड अशा आयुर्वेदीक अन्नापासून मिळू शकतो
संशोधक आयुर्वेदीक आहारतज्ञ डॉ कौस्तुभ विष्णु गद्रे श्रीसंदीपक क्लिनिक
8169503235, 9967772305
wa.me//919323692803

08/10/2020

प्रणाम सर्वांना
मी संशोधक/आयुर्वेदीक आहारतज्ञ डॉ कौस्तुभ विष्णु गद्रे. गेली सुमारे १४ वर्षे आयुर्वेदीक आहार तयार करण्याला वाहून घेतल्यामुळे तुमच्या सर्वांसाठी एक छान सोपा उपाय शोधता आला आहे.

डायबेटीस म्हणजे नक्की काय ते पाहू.

टाईप २ डायबेटीस म्हणजे *इन्शुलिन रेझिस्टन्स* हे सर्वांना मान्य आहे. मग इन्शुलिन वाढविण्यासाठी पॅन्क्रीयासला उत्तेजन/टोचणी किंवा नुसते इन्शुलिन देऊन कसे चालेल?
अहो इन्शुलिन हे चावीसारखे आहे आणि ही चावी आपल्या पेशींवरच्या आवरणातील इन्शुलिन रिसेप्टर नामक कुलुप उघडते. मग साखर पेशींमध्ये प्रवेश करते आणि साखरेमुळे मिळालेल्या उर्जेमुळे पेशींमध्ये सगळी कामे होतात. आता टाईप २ डायबेटीसमध्ये नक्की होते काय?
तर पेशींवर मेदसदृश चिकट, बुळबुळीत (स्त्यान) असे लेप बसू लागतात. कारण आपण चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात हा चिकटा वाढवलेला असतो. नुसते बसून किंवा झोपून रहाणे, व्यायामाचा अभाव, दह्याचा चुकीचा आणि अतिवापर, चहा, कॉफी, बेकरी उत्पादने, साखर आणि गोडधोड, जंकफूड, एकांगी/एकप्रकारचे अन्न सतत खात राहिल्याने (आहार षड् रसात्मक हवा), चुकीच्या संकल्पना मनात बाळगून मांसाहाराचा अतिरेकी वापर. स्थौल्य/जाडेपणा, ताणतणाव इ. कारणांमुळे असे घडते.
आयुर्वेदाने याचे क्लेद म्हणजे चिखल किंवा पुष्कळसा पातळ कफ (कफ चिकट असतो) असे समर्पक वर्णन केले आहे. यामुळे इन्शुलिनची चावी निसटून जाते पेशींवरचे कुलूप उघडले जात नाही. मग साखर रक्तातच पडून रहाते. मग पेशींमधील इतर प्रक्रिया ऊर्जेअभावी कशा होणार? मग त्या प्रक्रियांसाठी लागणारे घटक कसे शोषले जाणार? मग ते ही रक्तातल्या चिखलात भर घालतात. दुष्काळात तेरावा महिना!!!
आता यात चहा इ. आधी सांगितलेली यादी असे खाऊन/पिऊन कसे चालेल कारण या प्रकारच्या अॅसिडोसिस/चिकटा वाढवणाऱ्या करणाऱ्या पदार्थांमुळेच तर डायबेटीस होतो.

आता काही उदाहरणे:- डायबेटीसच्या ट्रीटमेंटसाठी आयुर्वेदीक आहार गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड का अतिशय योग्य आहे? आणि त्यामुळे डायबेटीसपासून पूर्ण सुटका कशी होऊ शकते ते बघा

कराडचे श्री सतीशजी मयेकर पोलिस दलात काम करणारे बऱ्याचदा रात्री एक दीड वाजता घरी येतात पहिला रिपोर्ट दिनांक ९ मार्च २०२० चा आहे तो तीन महिन्याची सरासरी या स्वरुपात १३.४० 😳 म्हणजे ३३७+
दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजता नाश्ता करून घराबाहेर पडले आणि रक्त तपासासाठी देता देता नंबर आला तेव्हा अकरा वाजून गेले होते. म्हणजे आपोआप दोन तासांनंतरचा रिपोर्ट मिळाला पण तोही ३३५.
केवळ फोनवर बोलून दिनांक २८/०२/२०२० रोजी साधारण संध्याकाळी चार वाजता त्यांना गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड मिळाले.
लगेच चार/साडेचार आणि सहा/साडेसहा असे दोन डोस घेऊन सुरुवात केली.
दिनांक ०६/०३/२०२० ला फास्टिंग १४२ आणि जेवणानंतर दोन तासांनी १६९. म्हणजे Severe Diebetis मधून म्हणजे गेली पंधरा वर्षे त्यांच्या तब्येतीला जो गंभीर धोका होता तो केवळ साडेसहा दिवसांत सुमारे २२ डोसमधे (१० ग्रॅमच्या) खूपच कमी करता आला. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष भेट न घेताही हे शक्य झाले. केवळ फोनवर बोलून समजून घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी केली की झाले.

आणि हो श्री सतीशजी मयेकर हे पोलिस दलात असल्याने त्यांचे रिपोर्ट सरकारी इस्पितळातले आहेत. हाताने लिहिलेले जवळजवळ लिहिल्यामुळे अक्षरांची गर्दी झाली आहे. त्यामुळे पोस्ट केले तर पेजला चालू शकत नाही. पण तुम्ही जर सहकार्य केले तर तुम्हाला व्हॉट्स ॲप किंवा इ मेल वर पाठवता येतील रिपोर्ट

असा चमत्कार वाटावा असा फरक कसा पडतो?

आता आपले प्रॉडक्ट गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड कसे काम करते ते पाहू.
आपल्या प्रॉडक्ट मध्ये लेसिथिन, इसेन्शियल फॅटी अॅसिडस्, व्हिटॅमिन ई, स्लो रिलीजिंग कार्बोहाइड्रेट, माफक प्रमाणात पण उच्च दर्जाचं प्रोटीन, हळूहळू शोषले जाणारे कॅल्शियम आणि अन्य असे संरक्षक घटक आहेत. लेसिथिनमुळे आपल्या शरीरातील पेशींवरची मेदसदृश आवरणे विरघळू लागतात. (इमल्सिफिकेशन म्हणजे दोन पाण्याच्या रेणुंमध्ये मेदाचा एक रेणु आणणे यामुळे मेद आवरण करु शकत नाही)
इसेन्शियल फॅटी अॅसिडस् आणि व्हिटॅमिन ई हे शरीरात अॅसिडोसिसमुळे लागलेल्या/त्यामुळे अॅसिडोसिस वाढवणाऱ्या इन्फ्लेमेशनरुपी आगी विझवणारे अग्निशामक दल आहे. इतकेच नव्हे तर यामुळे शरीरात अल्कलाईन वातावरण निर्माण होऊ लागते. यात चहा वगैरे बंद ठेवले तरच हे काम प्रभावीपणे होईल. नाही तर मडक्याचे भोक न बुजवता त्यात पाणी भरल्यासारखे हे होईल. आता अल्कलाईन म्हणजे हळूहळू रक्तातला चिकटपणा, बुळबुळीतपणा (स्त्यान गुण) कमी होऊन विशदता/मोकळेपणा/स्वच्छपणा येऊ लागतो. साहजिकच लेसिथिनच्या कार्याला म्हणजे पेशींवरील मेदसदृश लेप हटविणे याला चांगलाच हातभार लागतो.
आता चहा इ. बंद करताना काय होते?
चहा बंद करावा तर डोके ठणकते म्हणूनच नुकतेच तयार झाले आहे डायबेटिक चोकोबूस्ट. याने ही डोकेदुखी बंद होते की हो!!!
आपली सगळी कामे सहज व्हायला हवी म्हणून ही सगळी धडपड आहे बरं का मंडळी!!!
इसेन्शियल फॅटी अॅसिडस् आणि व्हिटॅमिन ई मुळे पेशींवरील आवरणांचे उपरोक्त गळचेपीमुळे जे नुकसान होते ते ही भरुन निघते. स्पेअर पार्ट रिपेअर होतात.
मग शरीररुपी गाडी वेग पकडणार यात काय शंका🏃🏻‍♂️🏃🏻‍♂️🏃🏻‍♂️
आता शेवटचा एक मुद्दा. शरीरातील पेशींमध्ये एक मायटोकॉन्ड्रीया नावाचे जनरेटर आहे. ऊर्जानिर्मितीची यंत्रणा त्यात असते. यात साखर सहज शिरते आणि एका ग्रॅमला चार कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. यात साखरेच्या पेटत्या काडीने मेद जाळण्याची वात लावता येते मग एक ग्रॅम मेदापासून चक्क नऊ कॅलरी ऊर्जा मिळते की हो. पण_ _ _
मेद एकटे मायटोकॉन्ड्रीयात शिरु शकत नाही तर त्याला लागतो एल् कार्निटाईन हा जोडीदार. आपण नेहमी जे अन्न खातो त्यातून एल् कार्निटाईन तयार होणे जेमतेमच शक्य होते. मग हा मेदाचा दिवा कसा अखंड तेवत रहाणार? आपल्या गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड आणि डायबेटिक चोकोबूस्ट या दोन्ही उत्पादनांमध्ये एल् कार्निटाईन तयार करण्यासाठी आवश्यक मूळ घटक उत्तम प्रकारचे आहेत. त्यामुळे मेदाचा दिवा चांगला अखंड नंदादीप प्रज्वलित राहतो मग यामुळे तरतरीत, उत्साही आयुष्य जगता येतेच पण निवडून मेदाचे ज्वलन होत राहिल्याने स्थौल्य/जाडेपणा कमी होतो म्हणून तुम्हाला ऊर्जा मिळेलच पण ४५ मिनिटे तरी भरभर चालणे आवश्यक आहे. म्हणजे दिवसभर ही क्रिया होण्यासाठी चावी मिळेल हो ना?
म्हणजे स्थूलता कमी होऊन बेढब शरीर सुदृढ आणि सुडौल दिसू लागेल. अर्थातच यासाठी नियमित व्यायाम आणि आयुर्वेदीक खायला तयार अन्न गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड आणि डायबेटिक चोकोबूस्ट खात राहिल्याने हे सहज शक्य होईल.
बरं का मंडळी!!!
आता बोला!!!
धन्यवाद 🙏 आभारी आहे 😊🙏
*संशोधक/आयुर्वेदीक आहारतज्ञ डॉ कौस्तुभ विष्णु गद्रे.*
8169503235, 9967772305,
wa.me//919323692803

तुमचा व्हॉट्स ॲप'चा नंबर पाठवा.

28/09/2020

सुहृदहो एक आनंदाची बातमी
आता डायबेटिसपासून सहज सुटका शक्य. ते ही गोड खाऊ खाऊन. तसेच प्रत्यक्ष भेट न घेताही शक्य. केवळ फोनवर बोलूनही शक्य. कारण फक्त गोड खाऊ आणि काही व्हिटॅमिन्ससह(हे ही अन्नघटकच) जीवनशैलीतील बदल.
आणि ती ही केवळ २ ते ३ महिन्यातच होणार😊
अर्थात पुढे दीड वर्ष गोड खाऊ खात रहावा लागतो सर्व शरीर मजबूत करण्यासाठी डायबेटिस पुन्हा होऊ नये म्हणून.
दिनांक २४ जानेवारी २०१९ला संध्याकाळी रक्तशर्करा उपाशीपोटी २८७.८ आणि जेवल्यानंतर दोन तासांनी ४४२.१😳 असा रिपोर्ट घेऊन आलेले वय वर्षे ६४ आणि १० किलो वजन अचानक कमी झाल्याची तक्रार असलेले रुग्ण,
अशा वेळी हॉस्पिटलमध्ये दाखल करून इन्शुलिन देण्याची गरज असते. सगळा खर्चिक, क्लेशमय आणि वेळखाऊ मामला.
पण गेल्या सुमारे २७ वर्षांच्या पुण्याईमुळे रुग्ण आयुर्वेदीक चिकित्सा घेण्यासाठी तयारच होते.
मग अल्कलाईन गॅपोमील डायबेटिक सपोर्ट फूड १० ग्रॅम चार वेळा आणि थोडेसे पथ्य असे समजावून सांगितले. यात रोज ४५ मिनिटे भरभर चालणेही होते.
दिनांक २५ जानेवारीपासून उपक्रम सुरू झाला काही व्हिटॅमिन्ससह.
बरोब्बर बाराव्या दिवशी ५ फेब्रुवारीला पुन्हा रिपोर्ट आला तो उत्साहवर्धक. २८७.८ ची १६१.१ आणि ४४२.१ ची २५६😎
नंतर ५३ व्या दिवशी १८ मार्चला १६१.१ ची १२० आणि २५६ ची १२६.२. म्हणजे पेशंट डायबेटिस मधून poor glycemic control मधे आले.
त्यानंतर आंब्याच्या मोहात अडकले आणि आडवा हात मारला की हो!!!
मग २३ एप्रिल रोजी आलेला रिपोर्ट😳
उत्तम होता १२० ची ११७ आणि १२६.२ ची १२४.
मला सांगा खरे सुख म्हणजे काय असतं!!!
इतकं स्वातंत्र्य कोणा मधुमेही रुग्णाला असतं!!!

आता २६ एप्रिल रोजी त्यांना युरोप दौऱ्यावर निःशंकपणे जाता आले. मस्त ना?👍
आणि जे पथ्य पाळणे आवश्यक आहे ते या दौऱ्यावरही सहज पाळता येईल असेच होते😊
आता बोला!!!
आयुर्वेदीक आहारतज्ञ डॉ कौस्तुभ विष्णु गद्रे
8169503235, 9967772305
WA.ME//919323692803

ही पोस्ट वाचून कराडचे पोलिस श्री. सतीश मयेकर यांनी गॅपोमील मागविले आणि इतिहास तयार झाला की हो!!!! तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा कृपया 🙏👇

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2865991553476819&id=100001980083113

*डायबेटीस म्हणजे नक्की काय किंवा तो का होतो?*
*का बरा होऊ शकत नाही?*
*कसा बरा होऊ शकतो?*
*या सर्व प्रश्र्नांची उत्तरे आहेत या लिंकमधे!!!*
*कृपया फॉरवर्ड करावे🙏🏻*

Address

A-1, Malhar Palace Society No. 2, Manpada Road, Opp. Kasturi Plaza, Behind Ankit Society
Dombivili
421201

Opening Hours

Monday 11am - 10pm
Tuesday 11am - 10pm
Wednesday 11am - 10pm
Thursday 11am - 10pm
Friday 11am - 10pm
Saturday 11am - 10pm
Sunday 12:30pm - 5pm

Telephone

9967772305

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीsandipak Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to श्रीsandipak Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category