27/03/2024
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते.समाजाचे ऋण फेडायची एक संधी रक्तदानामुळेच मिळते.एका ठराविक वयानंतर रक्तदान करणे योग्य समजण्यात येते. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते ६५ व्या वर्षापर्यंत रक्तदान करणे योग्य असते.
मानवाच्या शरीरात साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदाना नंतर साधारण ३६ तासांत शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यां मध्ये रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
स्वैच्छिक रक्तदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. वारंवार होणारे अपघात, विविध आजारांमध्ये लागणारी रक्ताची गरज, जसे रक्तक्षय, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल या आजारांमध्ये रुग्णाला वारंवार रक्ताची गरज भासते. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्त्रियांमधील रक्ताचे कमी प्रमाण असणाऱ्या, प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. या रक्ताची मागणी पूर्ण होण्यासाठी त्याचप्रमाणे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदान करून सामाजिक ऋण फेडायला हवे.
*श्री योगविला स्टुडिओने* प्रथमच *”रक्तदान शिबिराचे”* आयोजन केले आहे. येत्या *31 मार्च 2024* रोजी *सकाळी 9 ते सायंकाळी 5* पर्यंत रक्तदान शिबिर आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने मित्र परिवार, कुटुंब सदस्यांन सोबत या रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा हि नम्र विनंती.💕 🙏🏻🙏🏻🙏🏻
*रक्तदान करके देखिये अच्छा लगता है!!😇