04/01/2026
योगगुरु श्री प्रवीण बांदकर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🙏🏻💐
गेली २५ वर्षे आपण अविरतपणे, योगशास्त्र सर्वांना सर्वांच्या बोली भाषेत सांगत आहात समजावत आहात ...आपले योगदान फार मोठ आहे. सुहासिनी योग चे योग मार्गदर्शन आणि संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे योग, व्यायाम याचे सर्वेसर्वा तुम्ही असून योगशास्त्र सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य तुम्ही केले आहे.
संपूर्ण मानवजातीचे आरोग्य सुदृढ ,निकोप रहावे हा प्रथम तुमच्या मनातला उदात्त विचार शिष्यगणांमध्ये मध्ये पेरून श्रुती ताई गायत्री ताई प्रसाद दादा यांना लोकांच्या आवडीचे योगशिक्षक तुम्ही बनवले .शरीर व मन सुदृढ, सक्षम आणि संतुलित रहावे यासाठी अध्यात्म आणि योग या संकल्पनेतून सुरू झालेले आपले योगकार्य आज अधिकच विस्तारत व बहरत चालले आहे. याचे कारण योग हा विषय तुम्ही अगदी सोपा करून सांगितला , आज घरोघरी लोक तुम्ही शिकवलेले सोपे व्यायामाचे , योगासनांचे तंत्र हस्तगत करून योग करत आहेत पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच करावयास सोपे सोपे व्यायाम प्रकार योगासने, प्राणायाम , आणि तत्सम योग ज्ञान , व्यायाम विषयक व्हिडिओ बनवून लोकांना देत आहात, सर्वसामान्यांना आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी व्हिडिओ कन्टेन्ट तयार करून सोशल मीडियावर करोडो लोकांपर्यंत भारतात आणि विविध देशांमध्ये योग ज्ञान पोहोचवत आहात संपूर्णपणे अभ्यासपूर्ण, विज्ञाननिष्ठ ,शास्त्रीय अधिष्ठान असणाऱ्या आपल्याला योग प्रशिक्षणाला लोकांनी अक्षरश डोक्यावर घेतले आहे त्यामुळे जगभरात आता आपले करोडो अनुयायी झाले आहेत .लहान विद्यार्थी अबाल वृद्ध वडीलधाऱ्यांना अनेकांना आरोग्यविषयक कितीतरी लाभ तुमच्या या अनोख्या प्रशिक्षणामुळे झाले आहेत . लोकांना आरोग्य लाभले, लोकांचे आजार दूर गेले, कितीतरी लोकांची कुटुंब सुखी झाली , योग प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम, योग वर्कशॉप, मुलाखती, टॅलेंट शो, योग प्रबोधने, इतकंच नव्हे तर संतांच्या शिकवणीची जोड योगशास्त्रला तुम्ही दिली.
योगशिबिरांचे आयोजन करून समाजाच्या विविध घटकांपर्यंत तुम्ही योग पोहोचवला आहे. अंध, अपंग, रिमांड होममधील मुली, आदिवासी मुला-मुलींना आपण योगशिक्षण दिले. तसेच सुमारे दीड लाख शालेय विद्यार्थ्यांना योगप्रशिक्षण देण्याचे कार्य आपण केले आहे, त्याने आपली भावी पिढी नक्कीच सुदृढ होण्यास त्याची मदत होईल, कार्पोरेट जगत, कामगार वर्ग, तसेच विविध संस्थांमध्ये आपले योग प्रशिक्षण झाले आहे. ,प्रसिद्धी किंवा प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता केवळ कार्य करणारी माणसे समाजात फारच दुर्मीळ असतात—आणि त्या दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी आपण एक आहात, हे आम्हाला अभिमानाने सांगावेसे वाटते.खरा योगी तोच जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो.
आपल्या या अमूल्य, समाजोपयोगी योगकार्याला सर्व शिष्यवर्ग व योगसाधकांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.
आपले कार्य असेच अखंड सुरू राहो, आणि आपण दीर्घायुषी, निरोगी व सदा असेच आनंदी राहो—हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏✨
- सुहासिनी योग टीम