18/11/2024
20 नोव्हेंबर
’’जागतिक मुळव्याध दिन’’ (World Piles day) निमित्त
वेदा पाईल्स हॉस्पिटल , गडचिरोली यांच्या वतीने
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ ला,
वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मुळव्याध, फिशर, भगंदर आणि इतर गुद रोगांवर मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुळव्याध ( पाईल्स/हेमोरहॉईड्स ), फिशर, भगंदर (फिस्टूला) ही एक अतिशय सामान्य समस्या आहे, जवळपास ५०-६० टक्के लोक या व्याधीनें त्रस्त आहे.
संकोच आणि शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे मुळव्याधच्या उपचारासाठी लोक पुढे येत नाहीत.
या दिवशी आम्ही प्रत्येकाला आवाहन करू इच्छितो की ज्यांना या लक्षणांचा त्रास आहे त्यांनी पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, कारण तपासणीस उशीर झाल्यास रोगाचे उपद्रव वाढतात, विशेषतः कर्करोगाच्या बाबतीत रोगनिदान बिघडू शकते.
लवकर निदान केल्यास रोग लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे लवकर तपासणी ही जीवनरक्षक आहे.
गुदाशय रक्तस्त्राव आणि इतर लक्षणे दुर्लक्ष करू नका, योग्य निदानाशिवाय औषध घेऊ नका. भीती आणि संकोच समस्या प्रगत टप्प्यात वाढवू शकतात. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा - 08554041305
पत्ता - वेदा पाइल्स हॉस्पिटल, इंदिरा गांधी चौक, बी.एस.एन.एल. ऑफिस समोर , गुजरी रोड, गडचिरोली.