25/04/2026
शारदा हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद!
शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गेवराई यांच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला तलवाडा आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शेकडो रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
🩺 शिबिरातील ठळक वैशिष्ट्ये:
स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग आणि विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी.
रुग्णांची मोफत रक्त तपासणी.
आजारांनुसार मोफत औषधोपचार.
मा. जयसिंग पंडित साहेब (सचिव, जयभवानी शिक्षण संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ. आसाराम मराठे, माजी सरपंच विष्णू हात्ते, अक्रम सौदागर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. अजयसिंह पंडित आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने (डॉ. धनश्री पंडित, डॉ. निखिल गव्हाणे, डॉ. प्राजक्ता नरोटे, डॉ. विवेक काळे, डॉ. अंकिता चाळक, डॉ. किरण जाधव, डॉ. मनोज कुमार) रुग्णांवर अत्यंत काळजीपूर्वक उपचार केले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले आमचे शिबिर समन्वयक, नर्सिंग स्टाफ, फार्मसी टीम, तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार! 🙏
रुग्णांच्या आणि समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी शारदा हॉस्पिटल नेहमीच कटिबद्ध आहे! 🏥
📍 स्थळ: शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गेवराई.