15/07/2023
🏥 *५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार ते सुद्धा सर्व प्रकारच्या राशन कार्ड धारकांना..!*
━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━
गेवराई तालुक्यातील रुग्णांना आधार हॉस्पिटल गेवराई या रुग्णालयात मिळणार सुविधांचा लाभ
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ मोटे बी आर
9970152115
आधार हॉस्पिटल
70387 91564
8446452115
💁🏻♂️ महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या योजनेचा लाभ आता सरसकट सर्वांनाच मिळणार आहे. राज्यातील केशरी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना लागू झाली आहे.
🧾महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या दोन योजनांच्या एकत्रीकरणामुळे पूर्वी मिळणारे दीड लाखांचे आरोग्य कवच यापुढे पाच लाखांचे मिळणार आहे. एवढेच नाही, तर उपचारांसाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
❓ *काय आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना?*
गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.
📙 *पूर्वी केशरी, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळायचा लाभ*
पूर्वी अन्नपूर्णा योजना, दारिद्र्यरेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड आणि दारिद्र्यरेषेवरील केशरी रेशनकार्ड तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक एक लाख उत्पन्न आहे, अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळायचा. आता ती अट काढून टाकण्यात आली आहे.
👨👩👧👦 *प्रत्येक कुटुंबावर पाच लाखांपर्यंत उपचार*
महात्मा फुले जनआरोग्य योजनेला पंतप्रधान जन आरोग्य योजनेची जोड देऊन फक्त पिवळे व केशरी कार्डधारकांनाच नव्हे, तर सर्व रेशनकार्ड धारकांना वैद्यकीय उपचारासाठी पाच लाखांचे आरोग्यसेवा कवच देण्यात येणार आहे