Anuradha Superspeciality Eye Hospital-Hatkanangale

Anuradha Superspeciality Eye Hospital-Hatkanangale Biggest Superspeciality Eye Hospital in western Maharashtra.

One can easily access details of our services, stories of successful operations and counseling about eye problems.

आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल जाहीर आभार....!!!सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल चे दि. १५ ...
04/04/2025

आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल जाहीर आभार....!!!

सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल चे दि. १५ मे २०२२ रोजी व्हिजन केअर सेंटर हे डोळ्यांचे ओपीडी युनिट हातकणंगले येथे सुरु केले होते. या तीन वर्षामध्ये व परिसरातील जनतेने डोळे तपासणी आणि ऑपरेशनसाठी आमच्या हॉस्पिटलला पसंती दिली त्या बद्दल सर्वांचे मन पूर्वक आभार !!!

दि. ०१ एप्रिल २०२५ पासून येथील आमचा हा दवाखाना बंद करून तो कवठेमहांकाळ जि. सांगली येथे स्थलांतरीत करत आहोत. आम्ही आमची ही नेत्रसेवा अशी अखंडित सुरु ठेवणार असून, डोळ्याविषयी कोणत्याही समस्या अथवा शंका असतील तर खात्रीशीर उपचाराकरता आमच्या सांगली येथील अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलला संपर्क साधू शकता. आपणास होत असलेल्या तसदीबद्दल क्षमस्व... धन्यवाद !!!

 #अनुराधा ची  #कार्यतत्परता आणि  #माणुसकी याचा आलेला सुंदर अनुभवमी आई कांचन बडरे व माझा मुलगा आर्यन....सकाळच्या वेळी घरी...
27/03/2025

#अनुराधा ची #कार्यतत्परता आणि #माणुसकी याचा आलेला सुंदर अनुभव

मी आई कांचन बडरे व माझा मुलगा आर्यन....

सकाळच्या वेळी घरी साफसफाई चालू होती त्याचवेळी आर्यनला चून्याची पुडी हाताला लागली व तो त्या पुडीवर दगडाने जोराने बडवू लागला आणि चुना बाहेर येऊन डोळ्यांमध्ये गेला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून मी त्याच्या जवळ गेले आणि बघितलं की त्याच्या डोळ्यात चुना गेला आहे. मी खूप घाबरून गेले होते लगेचच मी माझ्या मिस्टरांना कॉल लावला व त्यांना लगेच यायला सांगितले. यानंतर आम्ही दोघांनी त्याला घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सलाईनच्या पाण्याने डोळा स्वच्छ धुऊन घेतला व लगेच #आटपाडी मध्ये असलेल्या अनुराधा आय हॉस्पिटल मध्ये जायला सांगितले. तिथे गेल्यानंतर त्याचे डोळे चेक केले व त्याला काही ड्रॉप्स व मलम दिलं त्यानंतर पुढच्या उपचारासाठी तातडीने त्याला सांगली ची मेन शाखा अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आर्यन चा डोळा लगेच पांढरा पडला होता त्यामुळे आम्ही खूपच घाबरून गेलो होतो काही सुचत नव्हते.

सांगलीच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर हॉस्पिटल बघून थोडसं घाबरायला झालं कारण एकतर आम्ही कमी शिकलेलो आणि इतका मोठा दवाखाना बघून जास्तच भीती वाटायला लागली, हॉस्पिटलच्या आत आल्यानंतर लगेचच औपचारिकता पूर्ण करून डॉक्टर प्रियंका भिडे मॅडम यांना दाखवण्यात आले, बुबळासाठी एक स्वतंत्र डॉक्टर आहेत हे पहिल्यांदा समजले. मॅडमनी खूप छान पद्धतीने त्याची पूर्ण तपासणी केली तपासणीनंतर त्यांनी लगेचच ऑपरेशन करून घ्यावं लागेल असे सांगितले, लहान मुलाला डोळ्याचा ऑपरेशन करायचं म्हटल्यावर आम्हाला दोघांना खूप घाम सुटला कारण इतकं काय झालंय की त्याचं ऑपरेशन करावं लागेल असे वाटले.

डॉक्टर प्रियंका भिडे मॅडम यांनी खूप छान पद्धतीने शांतपणे आम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं आणि ऑपरेशन का करून घेणे गरजेचे आहे हे समजावून सांगितलं. ऑपरेशन करून घ्यायची तयारी जरी असली तरी खर्चाची बाब ही जास्त महत्त्वाची होती कारण हातावरचे पोट असल्यामुळे रोजंदारी शिवाय पर्याय नाही त्यामुळे इतकी मोठी रक्कम जमा करायला आम्हाला जमणार नव्हते त्यामुळे आम्ही दोघेही खूप निराश झालो होतो.

पण तिथला स्टाफ आणि #प्रियंका_भिडे मॅडम यांनी इतकं सहजपणे आमची ही अडचण दूर केली की आम्ही लगेचच ऑपरेशन करून घ्यायचं ठरवलं. त्याच्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच ऑपरेशनला घेतले. ऑपरेशन नंतर त्याचा डोळा व्यवस्थित व्हावा ही इतकीच अपेक्षा होती तो पूर्वीसारखा बघावा असे वाटते. पण डोळ्यात चुना गेल्या मुळे नजर येण्याची शक्यता फार कमी आहे असे आधीच डॉक्टरांनी कल्पना दिलेली होती. पण ऑपरेशन नाही केलं तर अजून वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते हे सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं. ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी आम्हाला दोघांना येऊन खूप धीर दिला, सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या. औषध कशाप्रकारे घालायची, ऑपरेशन नंतर नक्की कशी काळजी घ्यायची याबद्दल खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं.

डॉक्टरांनी किंवा कोणत्याच स्टाफने एकदाही खर्चाच्या बाबतीत किंवा बिलाबाबतीत आम्हाला विचारलं नाही. तुम्हाला पैसे जसे जमतील तसे भरा असं स्पष्ट सांगितलं त्यामुळे आम्हा दोघांना फार धीर मिळाला. इथे आम्ही जवळजवळ तीन दिवस राहिलो पण इथे जेवणाची सोय नाष्टा चहा या सगळ्याची सोय केली होती आणि त्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे बिल घेतले गेले नाही. हॉस्पिटल म्हणलं की सगळ्यांना वाटतं की खूप पैसे द्यावे लागतील आणि पैसे दिल्याशिवाय पुढे ऑपरेशन होत नाही हा आमचा गैरसमज इथे अनुराधा मध्ये आल्यावर दूर झाला.

स्टाफचं करावं तेवढं कौतुक फार कमीच आहे, इतका सुसज्ज आणि सांभाळून घेणारा स्टाफ आम्हाला खूप आवडला. खूप सुंदर, स्वच्छ, असे हे हॉस्पिटल अशाच प्रकारे सेवा देत राहो आणि #अनुराधा_सुपर_स्पेसिलीटी_आय_हॉस्पिटलची अशीच उन्नती होत राहो. धन्यवाद 🙏

24/03/2025

#काचबिंदू ( #ग्लॉकोमा) झाल्यास सुरुवातीला फारसे लक्षणे जाणवत नाहीत, पण पुढील लक्षणे आढळू शकतात:
1. दृष्टी मंदावणे – हळूहळू दृष्टी कमी होते, विशेषतः बाजूची (परिफेरल) दृष्टी.
2. डोळ्यात दुखणे किंवा जड वाटणे – डोळ्यांमध्ये ताण जाणवतो किंवा वेदना होऊ शकतात.
3. डोळे लालसर होणे – काही वेळा डोळे लालसर दिसू शकतात.
4. प्रकाशाभोवती वलय दिसणे – दिवे किंवा इतर प्रकाश स्रोतांच्या आजूबाजूला वलय दिसू शकते.
5. सतत डोळ्यांमध्ये दडपण जाणवणे – डोळ्यांमध्ये अस्वस्थता किंवा जडपणा जाणवतो.
6. अचानक दृष्टी कमी होणे – काही प्रकरणांमध्ये अचानक दृष्टी धूसर होते किंवा संपूर्ण दृष्टी गमावली जाते.
जर वरील लक्षणे दिसत असतील तर त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार न घेतल्यास दृष्टी कायमस्वरूपी जाऊ शकते.

 #अनुराधा_सुपर_स्पेसिलीटी_आय_हॉस्पिटलचे  डायरेक्टर तसेच तिरळेपणा व बालनेत्ररोग तज्ञ  #डॉ_मिलिंद किल्लेदार सर यांचे  डोळ्...
22/03/2025

#अनुराधा_सुपर_स्पेसिलीटी_आय_हॉस्पिटलचे डायरेक्टर तसेच तिरळेपणा व बालनेत्ररोग तज्ञ #डॉ_मिलिंद किल्लेदार सर यांचे डोळ्यांच्या तिरळेपणा - कारणे, त्याचे परिणाम व त्यावरील उपचार या बाबतची विशेष मुलाखत रविवार दिनांक २३/०३/२५ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत वर ऐकायला मिळणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

20/03/2025

✅ #काचबिंदू कोणाला होतो?

कोणालाही काचबिंदू होऊ शकतो, पण काही व्यक्तींमध्ये त्याचा धोका जास्त असतो:

1. वय जास्त असलेल्या व्यक्ती (40 वर्षांवरील लोक)
2. अनुवंशिकता (काचबिंदू असलेल्या कुटुंबातील सदस्य)
3. डायबेटीस (मधुमेह) असलेले लोक
4. उच्च रक्तदाब (High BP) असलेले लोक
5. डोळ्याला इजा झालेली किंवा शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती
6. दीर्घकाळ स्टेरॉइड औषधे घेणारे लोक
7. चष्म्याचा मोठा नंबर असलेल्या व्यक्ती .मायोपिया (नजर जवळच्या गोष्टींसाठी जास्त वापरणारे) >> हायपरमेट्रोपिया (नजर दूरच्या गोष्टींसाठी जास्त वापरणारे)

✅ काचबिंदू का होतो?

डोळ्यातील Aqueous Humor नावाचा द्रव डोळ्याच्या पुढील भागात सतत तयार होतो आणि एक विशिष्ट प्रवाहाद्वारे बाहेर जातो.
जर हा द्रव योग्य प्रकारे बाहेर न गेला तर डोळ्यातील दाब वाढतो आणि ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचते.

✅ मुख्य कारणे:
1. डोळ्यातील द्रव बाहेर जाण्याचा मार्ग बंद होणे
2. डोळ्यात जास्त द्रव तयार होणे
3. वंशपरंपरागत कारणे
4. डोळ्यातील रक्ताभिसरणामध्ये बिघाड

17/03/2025

#रंगपंचमी खेळताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा:

✅ डोळ्यांचे संरक्षण:
- गॉगल्स किंवा सनग्लासेस घाला, जेणेकरून रंग डोळ्यांत जाऊ नये.
- शक्यतो हर्बल रंग वापरा, कारण रासायनिक रंग डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात.

✅ रंग डोळ्यांत गेल्यास:
- रंग डोळ्यांत गेला तर लगेच स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धुवा.
- डोळे चोळू नका; यामुळे रंग अधिक आत जाऊ शकतो.
- डोळ्यांत पाणी येतं असेल, लाल होत असतील,जळजळ होत असेल तर नेत्रातज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

✅ मेकअप आणि तेलाचा वापर:
- डोळ्यांच्या आजूबाजूला कोकोनट ऑइल किंवा व्हॅसलीन लावा, ज्यामुळे रंग त्वचेला चिकटणार नाही.
- कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर रंगपंचमी खेळताना त्या काढून ठेवा.

✅ स्वच्छता आणि खबरदारी:
- रंग खेळून झाल्यानंतर सौम्य फेसवॉश आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
- शक्यतो डोळ्यांवर रंग मारू नका आणि इतरांनाही सावध करा.
ही काळजी घेतल्यास तुमची रंगपंचमी आनंददायक आणि सुरक्षित होईल.
सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🧡💛💚💙💜🤎🤍🩷🩵🩶

 #अनुराधा_सुपर_स्पेसिलीटी_आय_हॉस्पिटलच्या डायरेक्टर तसेच  #ग्लुकोमा तज्ञ  #डॉ_संगिता_मालाणी मॅडम यांची जागतिक  #काचबिंदू...
15/03/2025

#अनुराधा_सुपर_स्पेसिलीटी_आय_हॉस्पिटलच्या डायरेक्टर तसेच #ग्लुकोमा तज्ञ #डॉ_संगिता_मालाणी मॅडम यांची जागतिक #काचबिंदू सप्ताह निम्मित रविवार दिनांक १६/०३/२५ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत वर विशेष मुलाखत ऐकायला मिळणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

15/03/2025

#मोतिबिंदू ( ) आणि #काचबिंदू ( ) मधील फरक

✅ मोतिबिंदू म्हणजे काय ?
डोळ्याच्या लेन्सवर मळकटपणा (धूसरपणा) येतो, ज्यामुळे स्पष्टपणे पाहणे कठीण होते.

✅ काचबिंदू म्हणजे काय ?
डोळ्यातील दाब वाढतो, ज्यामुळे ऑप्टिक नर्व्हला नुकसान होते आणि दृष्टी कमी होते.

✅ मुख्य कारणे:
▪️ मोतिबिंदू :- वृद्धत्व, मधुमेह, UV किरणे, डोळ्याला झालेली दुखापत, स्टेरॉईड्सचा जास्त वापर.
▪️ काचबिंदू: - डोळ्यातील द्रव (Aqueous Humor) बाहेर न पडल्यामुळे दाब वाढतो.

✅ लक्षणे
▪️ मोतिबिंदू: - धूसर दृष्टी, प्रकाशाची चमक जास्त जाणवणे, रंग फिके दिसणे.
▪️ काचबिंदू: - सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसतात, नंतर टनेल व्हिजन (संकीर्ण दृष्टी), डोळ्यांमध्ये वेदना, अंधुक दृष्टी.

✅ परिणाम
▪️ मोतिबिंदू: - योग्य उपचार केल्यास दृष्टी सुधारता येते.
▪️ काचबिंदू: - कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.

✅ उपचार:
* मोतिबिंदू शस्त्रक्रिया (Cataract Surgery) करून कृत्रिम लेन्स बसवली जाते.
* काचबिंदू: औषधे, लेझर ट्रीटमेंट किंवा शस्त्रक्रियेने दाब नियंत्रित केला जातो.

✅ महत्वाचे

▪️ मोतिबिंदू बरा करता येतो, तर ग्लॉकोमा पूर्ण बरा होत नाही, फक्त नियंत्रित करता येतो.
▪️ काचबिंदू वेळेवर लक्षात न आल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.
▪️डोळ्यांची नियमित तपासणी करून दोन्ही आजारांची वेळेवर काळजी घ्यावी.

✅ काही प्रकरणांमध्ये मोतिबिंदूमुळे काचबिंदू होऊ शकतो.

▪️ वाढल्यामुळे डोळ्याची नैसर्गिक लेन्स जाडसर आणि मोठी होते. यामुळे डोळ्यातील द्रव बाहेर जाण्याचा मार्ग (ड्रेनेज अँगल) अरुंद होतो, ज्यामुळे डोळ्याचा दाब वाढतो आणि अँगल-क्लोजर ग्लॉकोमा (काचबिंदू) होऊ शकतो.
▪️ सर्वच मोतिबिंदू काचबिंदूला कारणीभूत होत नाहीत, परंतु काही प्रकारांमध्ये हा धोका असतो.
▪️ वेळेवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केल्यास काचबिंदू होण्याचा धोका कमी होतो.

12/03/2025

#ग्लॉकोमा ( ) #काचबिंदू

जागतिक महिला दिनानिमित्त दि. 10/3/25 रोजी युवती महिला मंडळ कागवाड येथे  नेत्रदान आणि अवयव दान विषयी जनजागृती विषयी कार्य...
12/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त दि. 10/3/25 रोजी युवती महिला मंडळ कागवाड येथे नेत्रदान आणि अवयव दान विषयी जनजागृती विषयी कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये नेत्रदान विषयी दृष्टीदान आय बँक मार्फत डॉ दीप्ती पाटील मॅडम व अवयव दान विषय दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई च्या सांगली जिल्हा समन्वयक डॉ हेमा चौधरी मॅडम यांनी विशेष माहिती दिली या कार्यक्रमासाठी युवती महिला मंडळ च्या अध्यक्षा श्रीमती जयश्री पटवर्धन मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 #ग्लॉकोमा ( )  बद्दल सामान्य गैरसमज आणि तथ्यगैरसमज १: ग्लॉकोमा हा फक्त वयोवृद्ध लोकांनाच होतो.✅ तथ्य: ग्लॉकोमा कोणत्याह...
11/03/2025

#ग्लॉकोमा ( ) बद्दल सामान्य गैरसमज आणि तथ्य

गैरसमज १: ग्लॉकोमा हा फक्त वयोवृद्ध लोकांनाच होतो.

✅ तथ्य: ग्लॉकोमा कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये तो जन्मजात असतो, आणि काहीवेळा मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कुटुंबात आनुवंशिक इतिहास असल्यास लवकर होऊ शकतो.

गैरसमज २: ग्लॉकोमाचा त्रास झाला तर लगेच लक्षणे दिसतात.

✅ तथ्य: ग्लॉकोमा हळूहळू विकसित होतो आणि सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच लोकांना तो शेवटच्या टप्प्यातच लक्षात येतो. नियमित नेत्रतपासणी आवश्यक आहे.

गैरसमज ३: ग्लॉकोमावर इलाज नाही, तो झाल्यास दृष्टी कायमची जाते.

✅ तथ्य: योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास ग्लॉकोमा नियंत्रित करता येतो आणि दृष्टी टिकवून ठेवता येते. औषधे, लेझर किंवा शस्त्रक्रिया यामुळे डोळ्यांचा दाब कमी करता येतो.

गैरसमज ४: फक्त चष्मा लावल्याने किंवा घरगुती उपायांनी ग्लॉकोमा बरा होतो.

✅ तथ्य: ग्लॉकोमा हा गंभीर वैद्यकीय आजार आहे, जो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बरा होत नाही. घरगुती उपाय किंवा चष्मा याने हा आजार थांबत नाही.

गैरसमज ५: फक्त डोळ्यात जळजळ किंवा वेदना झाल्या तरच ग्लॉकोमा असतो.

✅ तथ्य: काही प्रकारच्या ग्लॉकोमामध्ये कोणतेही वेदनादायक लक्षण नसते. विशेषतः ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये हळूहळू दृष्टी कमी होते, पण कोणताही त्रास होत नाही.

✅ ग्लॉकोमापासून बचावासाठी काय करावे?
नियमित डोळ्यांची तपासणी (विशेषतः ४० वर्षांनंतर).
मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे.
डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेणे.
डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा नियमित वापर करणे.

✅ निष्कर्ष:
ग्लॉकोमा हा ‘मूक चोर’ म्हणून ओळखला जातो, कारण तो हळूहळू आणि कुठल्याही ठळक लक्षणांशिवाय होतो. त्यामुळे वेळीच तपासणी आणि उपचार घेतल्यास दृष्टी वाचवता येऊ शकते.

 #ग्लॉकोमा ( ) मधील IOP आणि रक्तदाब (BP) यामधील फरक✅ गोंधळ कसा होतो?ग्लॉकोमामध्ये IOP वाढतो, पण रक्तदाब (BP) नॉर्मल असू ...
10/03/2025

#ग्लॉकोमा ( ) मधील IOP आणि रक्तदाब (BP) यामधील फरक

✅ गोंधळ कसा होतो?

ग्लॉकोमामध्ये IOP वाढतो, पण रक्तदाब (BP) नॉर्मल असू शकतो.

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना नेहमी ग्लॉकोमा होईल असे नाही.

काही संशोधनानुसार, अतिशय कमी रक्तदाब (Low BP) असलेल्या व्यक्तींमध्ये डोळ्याला योग्य रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे ऑप्टिक नर्व्हला नुकसान होऊ शकते.

✅ निष्कर्ष:

IOP आणि BP दोन्ही वेगवेगळे आहेत. ग्लॉकोमा हा रक्तदाबामुळे होत नाही, पण उच्च किंवा कमी BP अप्रत्यक्षपणे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. म्हणूनच, नियमित डोळ्यांची तपासणी करणे आणि IOP नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.

Address

Anuradha Eye Hospital, Vision Care Center, Pethbhag, Near ST Stand, Hatkanagale-Wadagaon Road
Hatkanangale
416109

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anuradha Superspeciality Eye Hospital-Hatkanangale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anuradha Superspeciality Eye Hospital-Hatkanangale:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram