Dr Murar Homoeopathic Multispeciality Hospital Hinganghat

Dr Murar Homoeopathic Multispeciality Hospital Hinganghat Multispeciality Homoeopathic Hospital

11/09/2025
22/07/2025

*कथाविश्र्व*
*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*
*!!बोलून तर बघा प्रश्न सुटेल!!*
*एक सुंदर वाचनीय कथा अवश्य वाचावी*
*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*

*माझे एक मित्र आहेत बार्शीचे बाळासाहेब त्यांनी खूप दिवसां पासून आपल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलाय बोलून तर बघा प्रश्न सुटेल! पहिल्यांदा जेव्हा मी हा स्टेटस पाहिला तेव्हा मला खूप गंमत वाटली नंतर मी यावर विचारही केला खरेच बऱ्याचदा माणसे आपल्या समस्या घेऊन त्यात स्वतःच गुंतून पडलेली असतात गुरफटून गेलेली असतात ना ती त्याबद्दल कोणाशी बोलतात ना कोणाशी शेअर करतात ना कोणाकडे मदत मागतात संकोच अथवा कमीपणा वाटणे अहं आड येणे समोरच्यावर विश्वास नसणे आता मदत घेतली तर पुढे आपल्याला ही अशी मदत करावी लागेल याची भीती वाटणे मदत मागितल्यास बेइज्जत होईल अशी शंका येणे इ. कारणाने माणसे आपल्या समस्ये बद्दल तोंड उघडत नाहीत*

*पण या एका वाक्याने एका अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या मुलीच्या जीवनात खूप मोठा बदल झाला तिचे जगणे सुसह्य झाले तिच्या जीवनात अक्षरशः क्रांती झाली त्यामुळे हे वाक्य कायम माझ्या स्मरणात राहीले आहे त्याचे असे झाले*

*एकदा डिसेंबर मध्येच नववी आणि दहावीच्या मुलांना बोर्डाच्या परीक्षे संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एका शाळेने कार्यशाळा आयोजित केली होती स्किल क्राफ्टर्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे मी कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो आम्ही शाळेत पोहोचण्या पूर्वीच मुले हॉल मध्ये शिस्तीत बसली होती दारा बाहेर आमच्या नावा सकट स्वागताचा बोर्ड होता दरवाजात सुंदर रांगोळी काढलेली होती या शाळेत येणारी मुले ही अत्यंत गरीब घरातील होती त्यांचे पालक या मुलांना शाळेत पाठवतात म्हणजे शाळेवर उपकारच करतात असा अविर्भाव असणारे बहुतेक विद्यार्थ्यांचे वडील हे व्यसनी घराकडे लक्ष न देणारे तर आई विड्या वळणारी किंवा रोजंदारीवर काम करुन घर चालविणारी त्यामुळे मुलांना घरुन शिक्षणासाठी सपोर्ट असा नाहीच तरीही शाळेचे संचालक शिक्षक मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न करत होते हे पाहून खूप बरे वाटले अभ्यास कसा करावा वाचलेले लक्षात कसे ठेवावे नवीन परीक्षा पद्धतीतील बदल सराव परीक्षेचे महत्व आदी विषयांवर विद्यार्थ्यांना कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले*

*प्रमुख अतिथी म्हणून माझे काम मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे होते ते मी छान गोष्टी रुपातून केले मुले आणि शिक्षक दोघेही खूष झाले कार्यक्रम संपल्या नंतर विद्यार्थ्यांचा घोळका माझ्या भोवती जमा झाला (हा माझा नेहमीचा अनुभव) कारण मुले तेव्हा खूप चार्जड् झालेली असतात त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात त्याची त्यांना उत्तरे हवी असतात सुमारे अर्धा तास हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम उभ्या उभ्याच सुरु होता शेवटी मुख्याध्यापिका मॅडमनी आम्हाला ऑफिस मध्ये चहा घेण्यासाठी आमंत्रित केले मुलांच्या गराड्यातून वाट काढत निघालो तेवढ्यात एक नववीतील मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली सर मला तुमचा मोबाईल नंबर देता का?*

*मी तिला म्हणालो, का गं तुला काही विचारायचे आहे का?*

*ती म्हणाली हो पण मी नंतर फोनवर विचारले तर चालेल का?*
*मी तिला माझे कार्ड दिले आणि बेटा तुझे नाव काय? म्हणून विचारले कार्ड हातात घेत ती म्हणाली अस्मिता (नाव बदलले आहे)*
*गोरीपान छान वेणी घातलेली पाणीदार डोळ्यांची पण मला ती तिच्या वया पेक्षा जास्तच मॅच्युअर्ड वाटली आणि तिच्या डोळ्यात एक वेदना देखील जाणवली माझे कार्ड घेऊन ती मैत्रिणींच्या घोळक्यात मिसळली मी मॅडमच्या सोबत ऑफिस मध्ये आलो तिथे चहा घेत शाळेच्या अडचणी शासनाचे असहकार्य पालकांचे भले बुरे अनुभव यावर दहा पंधरा मिनिटे चर्चा झाली आणि मग मी निरोप घेतला दैनंदीन व्यापात मी अस्मिताला विसरुनही गेलो आणि मग एके दिवशी माझा मोबाईल वाजला अन् नोन नंबर होता मी फोन घेतला पलीकडून आवाज आला*

*हॅलो सर, नमस्कार मी अस्मिता बोलतेय त्या दिवशी तुम्ही आमच्या शाळेत आला होतात ना, मी तुमचे कार्ड घेतले होते बघा*

*हां हां. बोल, अस्मिता बोल*

*सर, मला तुमची थोडीशी मदत हवी होती*

*हं, बोल ना.*

*सर, माझे वडील हातगाड्यावर केळी विकतात दिवसभरात दोन तीनशे रुपये मिळतात हातगाडी भाड्याची आहे त्याचे रोज शंभर रुपये द्यावे लागतात त्यात वडील दारु पितात माझी आई जवळच्याच गादी कारखान्यात कापूस स्वच्छ करायचे काम करते तिला रोज दीडशे रुपये पगार मिळतो पण कापसाच्या यंत्रापाशी बसून तिला दम्याचा त्रास व्हायला लागलाय घरात मीच मोठी आहे एक लहान बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत मला आईला मदत म्हणून काही काम मिळेल का?*

*मी विचारले, तुला काय करायला आवडते?*

*सर, मला चित्रकला आवडते तुम्ही शाळेत आला होतात त्या दिवशी हॉलच्या दारात मीच रांगोळी काढली होती आणि मला मेंदीपण खूप छान काढता येते*

*मी म्हटले अस्मिता, हा फोन कोणाचा आहे?*

*ती: सर, हा आमच्या क्लासटीचर मॅडमचा आहे*

*मी: ठीक आहे मी तुझ्यासाठी काही तरी काम शोधेन आणि या नंबरवर तुला आठवडा भरात निरोप देईन तू मात्र अभ्यासाकडे लक्ष दे बरे*

*ती: थँक्यु सर*

*मी लगेच Asma's madam या नावाने नंबर सेव्ह केला आणि विचारात पडलो की किती कठीण परिस्थितीतून या मुलीला जावे लागतंय या अल्लड वयातपण ती किती मॅच्युअर्ड विचार करते ती ज्या घरात रहाते ज्या वस्तीत राहून ती मोठी होतेय ते पाहिले तर हे तिच्या कडून हे अजिबात अपेक्षित नव्हते पण म्हणतात ना Nature is great balancer त्याने अशी गुणी मुलगी अशा बापाच्या पदरात टाकून बॅलन्सच साधला होता काय बरे काम द्यावे या मुलीला? मी मार्ग शोधत होतो*

*दोन चार दिवस गेले माझा एक व्यापारी मित्र मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला घरी आला मुलगा जळगावचा होता त्यांचा तेथे कपड्याचा मोठा व्यापार होता दहा दिवसांनी लग्न सोलापूरात होणार होतं तीन दिवस लग्नाचा कार्यक्रम चालणार होता मला अस्मिता आणि बाळासाहेबांचे वाक्य दोन्ही एकदम आठवले बोलून तर बघा प्रश्न सुटेल! मी माझ्या मित्राला विचारले अरे श्रीनिवास मेंदीचे काय केलेस? कोणाला सांगितलेस? तो म्हणाला थांब ते डिपार्टमेंट बायकोकडे आहे तिला विचारतो ते ऐकून वहिनी म्हणाल्या अहो भाऊजी आठ दिवस झाले सांगतेय तुमच्या मित्राला बघू या बघू या असेच म्हणतात असेल कोणी तर सांगा तुमच्या ओळखीचे*

*मी लगेच अस्मिताच्या मॅडमना फोन लावला अस्मिताशीपण बोललो वहिनी आणि अस्मिताचे बोलणे करुन दिले एका व्यक्तीला चारशे रुपये याप्रमाणे अस्मिताने पुढच्या आठ दिवसात लग्नघरी जाऊन पन्नास साठ मुलींच्या महिलांच्या हातावर सुंदर मेंदी काढली काही लोकांनी खूष होऊन जास्तीचे पैसे दिले अस्मिताने तीसेक हजार रुपये आठ दिवसात मिळवले या आठ दिवसात ती मला रोज रिपोर्टिंग करत होती मी तिला प्रोत्साहन देत राहिलो लग्न पार पडले*

*आणि मग महिनाभराने अस्मिताचा फोन आला ती खूप आनंदात होती सांगत होती*

*सर तुम्हाला खूप खूप थँक्स तुम्ही मेंदी काढायचे काम मिळवून दिले त्याचे तीस हजार मिळाले त्यातून बाबांसाठी पाच हजाराचा नवा हातगाडा तयार करून घेतला आईला दवाखान्यात नेऊन आणले व एक शिलाई मशीन घेऊन दिली घराला जुन्या बाजारातून पत्रे घेतले ते घातले आता पावसाळ्यात आमचे घर गळणार नाही आणि उरलेल्या पैशातून आणखी दोन हातगाड्या तयार करून घेतल्या त्या मी रोज प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे भाड्याने देतेय हे भाडे मी स्वतः घेते यातून आमच्या सगळ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागेल मी आता सुट्टीत कॉम्प्युटर क्लास लावणार आहे कारण तुम्ही सांगितलेल्या काकांना माझा स्वभाव खूप आवडला मला अठरा वर्षे पूर्ण झाली की त्यांच्या सुपर मार्केट मध्ये नोकरी देईन म्हणून सांगितलय त्यांनी सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले आता माझ्या घरातले वातावरण खूप बदललाय बाबा आता दारु पीत नाहीत आम्हा सगळ्यांशी प्रेमाने बोलतात काळजी घेतात सर माझे आई बाबा तुम्हाला एकदा भेटायचे म्हणतात ते म्हणतात "देव आम्हालाही पहायचा आहे" कधी भेटाल सर?*

*मी स्तब्ध, निःशब्द! सहज म्हणून मी श्रीनिवासकडे मेंदीचा विषय काढला काय आणि या पोरीने तर पुढे चमत्कारच करुन दाखवला अक्षरशः चमत्कार!*

*मी म्हटले अस्मिता बेटा कधीही ये फक्त फोन करून ये आणि मी देव वगैरे नाही एक सर्वसामान्य माणूस आहे तुझ्या सारखाच मी विशेष असे काहीच केले नाही तू बोललीस तू प्रयत्न केलास म्हणून हे सारं शक्य झाले तू माझ्याकडे बोललीस मी पुढे बोललो*

*मला बाळासाहेबांचा स्टेटस आठवला*
*बोलून तर बघा प्रश्न सुटेल!*🌹

*...सुप्रभात...*

07/07/2025

हमारे आधुनिक जीवनशैली उपचार पद्धती से कोलायटिस अल्सर, पॅरालिसिस स्ट्रोक जैसी गंभीर बिमारीयां 2 महिने के भीतर ही सफलतापूर्वक रिव्हर्स हो गयी है..
अधिक जानकारी हेतू..

डॉ मुरार होमिओपॅथिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटर हिंगणघाट
काॅल 9766921239

27/06/2025

💐💐💐सुप्रभात💐💐💐

"फिटनेस - एक संघर्ष" (अनुवादित)

मला आश्चर्य वाटत होते की मला धडधाकट (फिट) राहण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो.

आणि मग मला लक्षात आलं - मी अशा संस्कृतीतून आलो आहे जिथे माझे "शरीर" महत्त्वाचे आहे हे मला कधी शिकवलंच गेलं नाही.

मध्यमवर्गीय आचार विचार तुम्हाला निरोगी राहण्याचे महत्त्व कधीच शिकवत नाहीत. ते तुम्हाला सुरक्षित रहाणे, आज्ञाधारक रहाणे शिकवतात. ज्यायोगे नोकरी मिळेल असं काहीतरी शिकणं हेच चांगलं हेच तुमच्यावर बिंबवलं जातं. शारीरिकदृष्ट्या मजबूत किंवा "आरोग्यं धन संपदा" याबद्दल जागरूक राहणं कधीच शिकवलं जात नाही.

पै अन् पै वाचवणं आम्हाला महत्त्वाचं आहे, गुडघे वाचवणं नाही. समाजात आपली पत काय आहे याची आम्हाला काळजी असते, पण माझी posture (उभं राहण्याची ढब) बरोबर आहे का नाही यावर आम्ही कधीच लक्ष देत नाही.

आमचे बालपण गुण, शिष्टाचार आणि लग्न यावरील उपदेशांनी भरलेले होते. पण सुयोग्य श्वासोच्छवासाने अथवा प्राणायामाने anxiety (चिंता) वर कशी मात करता येऊ शकते, हे कधी कोणी आपल्याला सांगितलेच नाही. खरी झोप कशी असते हे कोणीही आपल्याला शिकवले नाही. साखर एखाद्या अंमली पदार्थासारखी घातक आहे, पचनसंस्था चांगली असणं किती महत्त्वाचं आहे यावर कधी चर्चाच झाली नाही.

नाश्त्याला टांग देणे म्हणजे आपण खूप बिझी आहोत असं नाही तर तर ते खूप नुकसानकारक आहे हे आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाही.

जे काही घरी शिजवलेले आहे, जे पानात पडेल ते तुम्ही निमूटपणे खाता. जिथे जशी जागा मिळेल तिथे तुम्ही बसता. आजारी पडलात तरच तुम्ही विश्रांती घेता. या शिकवणीतच आपण मोठे होत गेलो.

विश्रांती म्हणजे आळस. व्यायाम म्हणजे टाईमपास. आरोग्य म्हणजे काहीतरी बिघाड झाल्यावर मगच लक्ष देण्याची गोष्ट - हेच आपल्यावर बिंबवलं गेलं.

डोकं दुखतंय का?
"बाम लाव थोडा, पड थोडावेळ."

पाठ दुखत आहे का?
"आयोडेक्स किंवा मूव्ह लाव. थोडा आराम कर."

घसा खराब आहे का?
"हळद घालून दूध पी, माझ्या आज्जीने हेच सांगितलं होतं."

गेला आठवडाभर अशक्तपणा जाणवत आहे का?
"किती धावपळ चालली आहे तुझी गेला आठवडाभर. एक काम कर, उद्या सुट्टी घे, बरं वाटेल."

जिथे रोग होऊच न देण्यावर (prevention) भर होता, अशा घरी आम्ही वाढलोच नाही. आम्ही अशा घरात वाढलो जिथे रोगापेक्षा निदानाची (diagnosis) भीती जास्त होती.

आपण टर्म इन्शुरन्स, लाइफ इन्शुरन्स, हेल्थ पॉलिसीजसाठी पैसे देऊ पण मानसिक उपचारांवर खर्च करणार नाही. किंवा फिटनेस कोच किंवा न्यूट्रिशनिस्ट यांची मदत घेण्याबद्दल कदापि विचार करणार नाही. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल तेव्हाच आम्ही रुग्णालयात जाऊ आणि मग तिथे डॉक्टर विचारतील, "पहले क्यूँ नहीं आये आप?"

आम्ही छोले भटुरे खाण्यासाठी २० किमी प्रवास करू, पण जेवणानंतर ५ किमी धावणार नाही. आपण केमिस्टकडे एमआरपीवरून वाद घालू, पण पाहुण्यांसाठी थंड पेये आणि फरसाण आदिंवर शेकडो रुपये खर्च करू.

आणि हे सगळं कसं योग्य, कसं छान आहे हेच आपण पटवून देत राहू.

आपण जर वारंवार थकत असू, सकाळी जागे होतानाही जर आपल्याला फ्रेश न वाटता थकवाच जाणवत असेल, तर त्याबद्दल काळजी वाटण्याऐवजी आपल्याला त्याचा अभिमानच वाटतो - कित्ती काम करतो तो !!

थकवा, ॲसिडिटी जणू आपल्या घरातले एक सदस्यच झालेले आहेत.

हा केवढा विसंवाद - केवढं विडंबन आहे हे ! प्रत्येक पावती, प्रत्येक रुपया, जुन्या लग्नपत्रिका, आलेल्या गिफ्टची आकर्षक वेष्टनं - हे सगळं सगळं आपण जपून ठेवतो, पण आपलं शरीर मात्र आपण जपत नाही, त्याची अक्षम्य हेळसांड करतो.

आपण करिअर घडवतो. आपण कुटुंबे वाढवतो. समाजाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक चौकटीत टिक करतो. पण आपण ज्या शरीराच्या माध्यमातून या सर्व गोष्टी शक्य करतो ते मात्र आपण दुर्लक्षित ठेवतो. जोवर गाडी ढकलता येते तोवर आपण ती ढकलतच राहतो.

आणि जेव्हा समजतं, तोपर्यंत, आधीच खूप उशीर झालेला असतो. स्लिप डिस्क. मधुमेह. निद्रानाश. वाढतं वजन. जिने चढताना लागणारा दम. सांधेदुखी.

रावण दहा अक्राळविक्राळ तोंडांनी आपल्याला भेडसावू लागतो.

शरीराच्या बारीकसारीक कुराबुरींतून मिळणाऱ्या धोक्याच्या सूचनांकडे (warnings) आपण दुर्लक्ष करत राहतो आणि मग कपाळाला हात लावून बसतो.

आपली विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे.

"दमलो" ऐवजी "मला विश्रांतीची गरज आहे" म्हणा.

"तब्येतीचे बघू हो नंतर" ऐवजी "तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही, ताबडतोब बघितले पाहिजे" म्हणा.

लोकमान्य टिळकांनी प्रकृती सुधारण्यासाठी कॉलेजचं एक वर्ष मेहनत घेतली होती. आरोग्यासाठी केलेला खर्च, दिलेला वेळ हे खर्च नाहीत तर तुमची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे.

आणि फिटनेस म्हणजे शरीराचे लाड अथवा चोचले नाहीत तर चांगल्या रीतीने जगण्यासाठी एक अविभाज्य अंग आहे.

जर आपण वेळीच जागे झालो नाही, शरीराच्या - मनाच्या कुरकुरीकडे दुर्लक्ष करून पैश्यांच्या मागे धावत राहिलो, तर एके दिवशी हे सगळे साठवलेले पैसे त्याच शरीरावर, शरीराच्या दुरुस्तीवर - डागडूजीवर खर्च करावे लागतील आणि आपल्या औषधोपचारांच्या कर्जाचा डोंगर पुढच्या पिढीला फेडत बसावं लागेल.

(५८ वर्षांच्या तरण्याबांड काटक राकेश मोघे - गोरेगाव, मुंबई यांच्याकडून अग्रेषित)

अधिक जानकारी हेतू -

डॉ मुरार होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हिंगणघाट

26/06/2025

(साभार - Google AI)

मनुष्य की दैनिक पोषण संबंधी आवश्यकताएँ:

मनुष्यों के लिए दैनिक पोषण संबंधी आवश्यकताओं में कैलोरी, मैक्रोन्यूट्रिएंट्स (प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, वसा), और माइक्रोन्यूट्रिएंट्स (विटामिन और खनिज) शामिल हैं। एक स्वस्थ आहार में ये सभी पोषक तत्व शामिल होने चाहिए, जो व्यक्ति की उम्र, लिंग, गतिविधि स्तर और स्वास्थ्य स्थिति के अनुसार अलग-अलग होते हैं।

कैलोरी:
एक वयस्क व्यक्ति को प्रतिदिन लगभग 2000-3000 कैलोरी की आवश्यकता होती है, लेकिन यह व्यक्ति की गतिविधि स्तर और शरीर के वजन पर निर्भर करता है।
प्रोटीन:
पुरुषों को प्रतिदिन 56 ग्राम और महिलाओं को 46 ग्राम प्रोटीन की आवश्यकता होती है।
कार्बोहाइड्रेट:
कार्बोहाइड्रेट ऊर्जा का मुख्य स्रोत हैं, और एक स्वस्थ आहार में इनका सेवन 45-65% होना चाहिए।
वसा:
वसा शरीर के लिए आवश्यक है, लेकिन इसका सेवन 20-35% से अधिक नहीं होना चाहिए।

क्या होगा जब मनुष्य संतुलित आहार नहीं लेगा..?

यदि मानव संतुलित आहार नहीं लेते हैं, तो उन्हें कई स्वास्थ्य समस्याओं का सामना करना पड़ सकता है। कमजोरी, थकान, और बीमारियों के प्रति संवेदनशीलता बढ़ सकती है। इसके अलावा, कुपोषण, वजन बढ़ना या घटना, और पुरानी बीमारियां जैसे हृदय रोग, मधुमेह और कुछ कैंसर का खतरा भी बढ़ सकता है।

विस्तार में:

संतुलित आहार, जिसमें सभी आवश्यक पोषक तत्व उचित मात्रा में शामिल होते हैं, शरीर को स्वस्थ रहने और बीमारियों से बचाने के लिए महत्वपूर्ण है। जब हम संतुलित आहार नहीं लेते हैं, तो हमारा शरीर ठीक से काम करने में संघर्ष करता है, जिससे कई समस्याएं हो सकती हैं:

कमजोरी और थकान:

शरीर को पर्याप्त ऊर्जा और पोषक तत्व नहीं मिलने पर कमजोरी और थकान महसूस हो सकती है।

बीमारियों के प्रति संवेदनशीलता:

संतुलित आहार प्रतिरक्षा प्रणाली को मजबूत करता है। इसलिए, यदि आप संतुलित आहार नहीं लेते हैं, तो आपका शरीर संक्रमण और बीमारियों के प्रति अधिक संवेदनशील हो सकता है।

कुपोषण:

यह तब होता है जब शरीर को पर्याप्त पोषक तत्व नहीं मिल पाते हैं, जिससे शारीरिक विकास और कार्य प्रभावित हो सकते हैं।

वजन बढ़ना या घटना:

संतुलित आहार शरीर के वजन को नियंत्रित करने में भी मदद करता है। असंतुलित आहार से या तो वजन बढ़ सकता है या कम हो सकता है।

पुरानी बीमारियां:

संतुलित आहार की कमी से हृदय रोग, मधुमेह और कुछ प्रकार के कैंसर जैसी पुरानी बीमारियों का खतरा बढ़ सकता है।

इसलिए, स्वस्थ रहने के लिए, यह आवश्यक है कि हम अपने आहार में सभी आवश्यक पोषक तत्वों को शामिल करें और एक संतुलित आहार लें।

24/06/2025

( साभार - WHO विश्व स्वास्थ्य संगठन )

महत्वपूर्ण तथ्यों -

👉स्वस्थ आहार सभी प्रकार के कुपोषण से बचाने में मदद करता है, साथ ही मधुमेह, हृदय रोग, स्ट्रोक और कैंसर सहित गैर-संचारी रोगों (एनसीडी) से भी बचाता है।
👉अस्वास्थ्यकर आहार और शारीरिक गतिविधि की कमी स्वास्थ्य के लिए वैश्विक जोखिम का प्रमुख कारण हैं।
👉स्वस्थ आहार संबंधी आदतें जीवन में कम उम्र में ही शुरू हो जाती हैं - स्तनपान स्वस्थ विकास को बढ़ावा देता है और संज्ञानात्मक विकास में सुधार करता है, तथा इसके दीर्घकालिक स्वास्थ्य लाभ हो सकते हैं, जैसे कि अधिक वजन या मोटापे का जोखिम कम होना और जीवन में आगे चलकर गैर-संचारी रोग विकसित होने का जोखिम कम होना।
👉ऊर्जा का सेवन (कैलोरी) ऊर्जा व्यय के साथ संतुलित होना चाहिए। अस्वास्थ्यकर वजन बढ़ने से बचने के लिए, कुल वसा कुल ऊर्जा सेवन के 30% से अधिक नहीं होनी चाहिए (1, 2, 3)। संतृप्त वसा का सेवन कुल ऊर्जा सेवन के 10% से कम होना चाहिए, और ट्रांस-वसा का सेवन कुल ऊर्जा सेवन के 1% से कम होना चाहिए, वसा की खपत में संतृप्त वसा और ट्रांस-वसा से असंतृप्त वसा (3) की ओर बदलाव होना चाहिए, और औद्योगिक रूप से उत्पादित ट्रांस-वसा को खत्म करने के लक्ष्य की ओर बढ़ना चाहिए (4, 5, 6)।
👉कुल ऊर्जा सेवन के 10% से कम तक मुक्त शर्करा का सेवन सीमित करना (2, 7) एक स्वस्थ आहार का हिस्सा है। अतिरिक्त स्वास्थ्य लाभों के लिए कुल ऊर्जा सेवन के 5% से कम तक की कमी का सुझाव दिया जाता है (7)।
👉नमक का सेवन प्रतिदिन 5 ग्राम से कम रखने से (प्रतिदिन 2 ग्राम से कम सोडियम सेवन के बराबर) उच्च रक्तचाप को रोकने में मदद मिलती है, और वयस्क आबादी में हृदय रोग और स्ट्रोक का खतरा कम हो जाता है (8)।
👉डब्ल्यू.एच.ओ. के सदस्य देशों ने वर्ष 2025 तक वैश्विक जनसंख्या द्वारा नमक के सेवन में 30% की कमी लाने पर सहमति व्यक्त की है; साथ ही उन्होंने वर्ष 2025 तक वयस्कों और किशोरों में मधुमेह और मोटापे की वृद्धि को रोकने तथा बच्चों में अधिक वजन की वृद्धि को रोकने पर भी सहमति व्यक्त की है (9, 10)।

अवलोकन -

जीवन भर स्वस्थ आहार लेने से कुपोषण के सभी रूपों के साथ-साथ कई तरह की गैर-संचारी बीमारियों (एनसीडी) और स्थितियों को रोकने में मदद मिलती है। हालाँकि, प्रसंस्कृत खाद्य पदार्थों के बढ़ते उत्पादन, तेज़ी से शहरीकरण और बदलती जीवनशैली के कारण आहार पैटर्न में बदलाव आया है। लोग अब ऊर्जा, वसा, मुक्त शर्करा और नमक/सोडियम से भरपूर खाद्य पदार्थों का अधिक सेवन कर रहे हैं, और बहुत से लोग पर्याप्त मात्रा में फल, सब्जियाँ और अन्य आहार फाइबर जैसे कि साबुत अनाज नहीं खाते हैं।

विविधतापूर्ण, संतुलित और स्वस्थ आहार की सटीक संरचना व्यक्तिगत विशेषताओं (जैसे आयु, लिंग, जीवनशैली और शारीरिक गतिविधि की डिग्री), सांस्कृतिक संदर्भ, स्थानीय रूप से उपलब्ध खाद्य पदार्थों और आहार संबंधी रीति-रिवाजों के आधार पर अलग-अलग होगी। हालाँकि, स्वस्थ आहार का गठन करने वाले मूल सिद्धांत समान रहते हैं।

वयस्कों के लिए -
एक स्वस्थ आहार में निम्नलिखित शामिल हैं:

👉फल, सब्जियां, फलियां (जैसे दालें और बीन्स), मेवे और साबुत अनाज (जैसे अप्रसंस्कृत मक्का, बाजरा, जई, गेहूं और भूरा चावल)।
👉प्रतिदिन कम से कम 400 ग्राम (यानी पांच भाग) फल और सब्जियां (2) , आलू, शकरकंद, कसावा और अन्य स्टार्च वाली जड़ों को छोड़कर।
👉कुल ऊर्जा सेवन का 10% से कम मुक्त शर्करा (2, 7) से प्राप्त होता है, जो प्रतिदिन लगभग 2000 कैलोरी का उपभोग करने वाले स्वस्थ शरीर के वजन वाले व्यक्ति के लिए 50 ग्राम (या लगभग 12 चम्मच) के बराबर है, लेकिन अतिरिक्त स्वास्थ्य लाभों के लिए आदर्श रूप से कुल ऊर्जा सेवन का 5% से कम है (7) । मुक्त शर्करा वे सभी शर्करा हैं जिन्हें निर्माता, रसोइया या उपभोक्ता द्वारा खाद्य पदार्थों या पेय पदार्थों में मिलाया जाता है, साथ ही शहद, सिरप, फलों के रस और फलों के रस के सांद्रणों में स्वाभाविक रूप से मौजूद शर्करा भी शामिल हैं।
👉कुल ऊर्जा सेवन का 30% से भी कम वसा से होता है (1, 2, 3) । असंतृप्त वसा (मछली, एवोकाडो और मेवों में और सूरजमुखी, सोयाबीन, कैनोला और जैतून के तेल में पाए जाते हैं) संतृप्त वसा (वसायुक्त मांस, मक्खन, ताड़ और नारियल तेल, क्रीम, पनीर, घी और लार्ड में पाए जाते हैं) और सभी प्रकार के ट्रांस- वसा से बेहतर हैं, जिसमें औद्योगिक रूप से उत्पादित ट्रांस- वसा (बेक्ड और तले हुए खाद्य पदार्थों और पहले से पैक किए गए स्नैक्स और खाद्य पदार्थों जैसे कि फ्रोजन पिज्जा, पाई, कुकीज, बिस्कुट, वेफर्स और खाना पकाने के तेल और स्प्रेड में पाए जाते हैं) और जुगाली करने वाले ट्रांस- वसा (गाय, भेड़, बकरी और ऊंट जैसे जुगाली करने वाले जानवरों के मांस और डेयरी खाद्य पदार्थों में पाए जाते हैं) शामिल हैं। यह सुझाव दिया जाता है कि संतृप्त वसा का सेवन कुल ऊर्जा सेवन के 10% से भी कम और ट्रांस- वसा का सेवन कुल ऊर्जा सेवन के 1% से भी कम किया जाए (5) । विशेष रूप से, औद्योगिक रूप से उत्पादित ट्रांस -वसा स्वस्थ आहार का हिस्सा नहीं हैं और इनसे बचना चाहिए (4, 6) ।
👉प्रतिदिन 5 ग्राम से कम नमक (लगभग एक चम्मच के बराबर) (8)। ​​नमक आयोडीन युक्त होना चाहिए।

शिशुओं और छोटे बच्चों के लिए -
बच्चे के जीवन के पहले 2 वर्षों में, इष्टतम पोषण स्वस्थ विकास को बढ़ावा देता है और संज्ञानात्मक विकास में सुधार करता है। यह जीवन में आगे चलकर अधिक वजन या मोटापे और एनसीडी विकसित होने के जोखिम को भी कम करता है।

शिशुओं और बच्चों के लिए स्वस्थ आहार पर सलाह वयस्कों के समान ही है, लेकिन निम्नलिखित तत्व भी महत्वपूर्ण हैं:

👉शिशुओं को जीवन के प्रथम 6 माह तक केवल स्तनपान ही कराया जाना चाहिए।
👉शिशुओं को 2 वर्ष की आयु तक और उससे अधिक समय तक लगातार स्तनपान कराया जाना चाहिए।
👉6 महीने की उम्र से, स्तनपान के साथ-साथ विभिन्न प्रकार के पर्याप्त, सुरक्षित और पोषक तत्वों से भरपूर खाद्य पदार्थ दिए जाने चाहिए। पूरक खाद्य पदार्थों में नमक और चीनी नहीं मिलानी चाहिए।

स्वस्थ आहार बनाए रखने पर व्यावहारिक सलाह :-

फल और सब्जियां -

प्रतिदिन कम से कम 400 ग्राम या पांच भाग फल और सब्जियां खाने से एनसीडी (2) का जोखिम कम हो जाता है और आहार फाइबर का पर्याप्त दैनिक सेवन सुनिश्चित करने में मदद मिलती है।

फल और सब्जियों के सेवन को निम्नलिखित तरीकों से बेहतर बनाया जा सकता है:

👉भोजन में हमेशा सब्जियाँ शामिल करें;
👉नाश्ते के रूप में ताजे फल और कच्ची सब्जियाँ खाना;
👉मौसम के अनुसार ताजे फल और सब्जियां खाना; तथा
👉विभिन्न प्रकार के फल और सब्जियाँ खाना।

वसा -

कुल ऊर्जा सेवन के 30% से कम वसा सेवन की मात्रा को कम करने से वयस्क आबादी में अस्वास्थ्यकर वजन बढ़ने से रोकने में मदद मिलती है (1, 2, 3) । इसके अलावा, एनसीडी विकसित होने का जोखिम कम हो जाता है:

👉कुल ऊर्जा सेवन में संतृप्त वसा को 10% से कम करना;
👉कुल ऊर्जा सेवन में ट्रांस -वसा को 1% से भी कम तक कम करना ; तथा
👉संतृप्त वसा और ट्रांस- वसा दोनों को असंतृप्त वसा (2, 3) से प्रतिस्थापित करना - विशेष रूप से, पॉलीअनसेचुरेटेड वसा के साथ।

वसा का सेवन, विशेष रूप से संतृप्त वसा और औद्योगिक रूप से उत्पादित ट्रांस-
वसा का सेवन, निम्न तरीकों से कम किया जा सकता है:

👉खाना बनाते समय तलने के बजाय भाप देना या उबालना;
👉मक्खन, लार्ड और घी की जगह बहुअसंतृप्त वसा से भरपूर तेलों का उपयोग करना, जैसे सोयाबीन, कैनोला (रेपसीड), मक्का, कुसुम और सूरजमुखी के तेल;
कम वसा वाले डेयरी खाद्य पदार्थ और दुबला मांस खाना, या मांस से दिखाई देने वाली वसा को कम करना; तथा
👉पके हुए और तले हुए खाद्य पदार्थों, तथा पहले से पैक किए गए स्नैक्स और खाद्य पदार्थों (जैसे डोनट्स, केक, पाई, कुकीज़, बिस्कुट और वेफर्स) के उपभोग को सीमित करना, जिनमें औद्योगिक रूप से उत्पादित ट्रांस- वसा होती है।

नमक, सोडियम और पोटेशियम -

ज़्यादातर लोग नमक के ज़रिए बहुत ज़्यादा सोडियम का सेवन करते हैं (जो कि औसतन 9-12 ग्राम नमक प्रतिदिन सेवन करने के बराबर है) और पर्याप्त मात्रा में पोटैशियम नहीं लेते (3.5 ग्राम से कम)। ज़्यादा सोडियम और कम पोटैशियम का सेवन उच्च रक्तचाप में योगदान देता है, जो बदले में हृदय रोग और स्ट्रोक के जोखिम को बढ़ाता है (8, 11) ।

नमक का सेवन प्रतिदिन 5 ग्राम से कम के अनुशंसित स्तर तक कम करने से हर साल 1.7 मिलियन मौतों को रोका जा सकता है (12) ।

लोग अक्सर इस बात से अनजान होते हैं कि वे कितना नमक खाते हैं। कई देशों में, ज़्यादातर नमक प्रसंस्कृत खाद्य पदार्थों (जैसे कि तैयार भोजन; बेकन, हैम और सलामी जैसे प्रसंस्कृत मांस; पनीर; और नमकीन स्नैक्स) या अक्सर बड़ी मात्रा में खाए जाने वाले खाद्य पदार्थों (जैसे कि ब्रेड) से आता है। खाना पकाने के दौरान (जैसे कि शोरबा, स्टॉक क्यूब्स, सोया सॉस और मछली सॉस) या खाने के समय (जैसे कि टेबल नमक) भी नमक डाला जाता है।

नमक का सेवन निम्न प्रकार से कम किया जा सकता है:

👉खाना पकाते और तैयार करते समय नमक और उच्च सोडियम वाले मसालों (जैसे सोया सॉस, मछली सॉस और बुइलन) की मात्रा को सीमित करना;
👉मेज पर नमक या उच्च सोडियम सॉस न रखना;
👉नमकीन स्नैक्स का सेवन सीमित करना; तथा
👉कम सोडियम सामग्री वाले उत्पादों का चयन करें।
कुछ खाद्य निर्माता अपने उत्पादों में सोडियम की मात्रा कम करने के लिए व्यंजनों में सुधार कर रहे हैं, तथा लोगों को प्रोत्साहित किया जाना चाहिए कि वे किसी उत्पाद को खरीदने या उसका सेवन करने से पहले उसके पोषण लेबल की जांच कर लें कि उसमें कितना सोडियम है।

पोटेशियम रक्तचाप पर सोडियम की अधिक खपत के नकारात्मक प्रभावों को कम कर सकता है। ताजे फल और सब्जियों का सेवन करके पोटेशियम का सेवन बढ़ाया जा सकता है।

शर्करा (चीनी) -

वयस्कों और बच्चों दोनों में, मुक्त शर्करा का सेवन कुल ऊर्जा सेवन के 10% से कम होना चाहिए (2, 7) । कुल ऊर्जा सेवन के 5% से कम तक की कमी से अतिरिक्त स्वास्थ्य लाभ मिलेगा (7) ।

मुक्त शर्करा का सेवन करने से दंत क्षय (दांतों की सड़न) का खतरा बढ़ जाता है। मुक्त शर्करा वाले खाद्य पदार्थों और पेय पदार्थों से मिलने वाली अतिरिक्त कैलोरी भी अस्वास्थ्यकर वजन बढ़ाने में योगदान करती है, जिससे अधिक वजन और मोटापा हो सकता है। हाल के साक्ष्य यह भी दर्शाते हैं कि मुक्त शर्करा रक्तचाप और सीरम लिपिड को प्रभावित करती है, और सुझाव देती है कि मुक्त शर्करा के सेवन में कमी से हृदय संबंधी बीमारियों के जोखिम कारक कम हो जाते हैं (13) ।

चीनी का सेवन निम्न प्रकार से कम किया जा सकता है:

👉उच्च मात्रा में शर्करा युक्त खाद्य पदार्थों और पेय पदार्थों के उपभोग को सीमित करना, जैसे कि मीठे स्नैक्स, कैंडीज और चीनी-मीठे पेय पदार्थ (अर्थात सभी प्रकार के पेय पदार्थ जिनमें मुक्त शर्करा होती है - इनमें कार्बोनेटेड या गैर-कार्बोनेटेड शीतल पेय, फलों या सब्जियों के रस और पेय, तरल और पाउडर सांद्र, सुगंधित पानी, ऊर्जा और खेल पेय, पीने के लिए तैयार चाय, पीने के लिए तैयार कॉफी और सुगंधित दूध पेय शामिल हैं); तथा
👉मीठे नाश्ते के स्थान पर ताजे फल और कच्ची सब्जियां खाएं।

16/06/2025

🙏नमस्कार 🙏

✅ मैं हेल्थ & फिटनेस कोच -
डॉ. प्रफुल मुरार
BHMS,MPH
• Homoeopathic Consultant
•Diet-Nutrition-Wellness-LifeStyle Diseases Coach
• Former Medical Coordinator, mjpjay & pmjay, Govt. Sub District Hospital, Hinganghat
• Value Based Care ( USA )
• Quality Improvement in Healthcare Organizations ( USA )
• Foundation of Public Health Practice - The Public Health Approach ( LONDON )
• Sustainable Tourism - Promoting Environmental Public Health ( DENMARK )
• Health Information Technology Fundamentals ( USA )
• Evaluating the Quality of Healthcare Delivery ( USA )
• Healthy Practices : Nutrition, Physical Activity, and Community and Family Participation ( USA )

उपलब्ध सुविधा -
• मानसिक रोग - डिप्रेशन • मेंदूचे रोग - पॅरालिसिस • ह्रदयरोग • श्वसनरोग • कान-नाक-घसा • प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग • बालरोग - बाल समुपदेशन • शल्यचिकित्सा • त्वचारोग व गुप्तरोग • किडणी-मुत्र-लिव्हर रोग • अस्थिरोग-वात विकार • पोटाचे रोग-मुळव्याद-भगंदर • मधुमेह • नेत्ररोग • कॅन्सर केअर • मुल न होणे-नपुंसकता-वैवाहिक समुपदेशन • केसांचे विकार

और..

✅ खाना - पीना खाते हुए, घर से ही, बिना जिम जाये स्वस्थ और फिट रह सकते है ।
✅ बेस्ट सोल्युशन के लिए कॉल या व्हाट्सअप किजिये - 9766921239

👉 वजन घटाना (मोटापा या पेट की चरबी मे कमी)
👉वजन बढ़ाना ( मसल्स )
👉 पेट साफ / गैस, कब्ज
👉 थायरॉईड (हाइपो / हाइपर )
👉 ब्लडप्रेशर / शुगर
👉 स्किन, बाल झरना
👉 टेंशन / डिप्रेशन / हर्ट समस्या
👉 ऍसिडिटी / साँस फुलना
👉 महिला समस्या - इरेगुलर पीरियड्स / PCOD / PCOS.
👉 कमर या घुटना दर्द
✅ दवाई और बीमारी फ्री लाइफ.

✅ अगर आप भी मोटापे से परेशान है और मोटापा कम करना चाहते है तो मैसेज किजिये मुझे। आप कितना वज़न कम करना चाहते हैं?
👉(1) 5kg (2) 10kg (3) 15kg
(4) 20kg (5) 30kg (6) 40kg

👉30 दिन चैलेंज, 👉गारंटी

👉 हेल्थ कोच
9766921239

✅ डिटेल समझने के लिए- Comment YES

"आपकी सेहत ही हमारी प्राथमिकता है — किसी भी स्वास्थ्य समस्या के लिए तुरंत हमसे संपर्क करें।"

Best Regards,
डॉ मुरार होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हिंगणघाट

अपॉइंटमेंट बुक करने के लिए डायल कर सकते है..
9766921239

02/06/2025

"आपकी सेहत हमारी प्राथमिकता है — किसी भी स्वास्थ्य समस्या के लिए तुरंत हमसे संपर्क करें।"

Best Regards,
डॉ मुरार होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हिंगणघाट
डाॅ प्रफुल मुरार
BHMS, MPH
• Homoeopathic Consultant
•Diet-Nutrition-Wellness-LifeStyle Diseases Coach
• Former Medical Coordinator, mjpjay & pmjay, Govt. Sub District Hospital, Hinganghat
• Value Based Care ( USA )
• Quality Improvement in Healthcare Organizations ( USA )
• Foundation of Public Health Practice - The Public Health Approach ( LONDON )
• Sustainable Tourism - Promoting Environmental Public Health ( DENMARK )
• Health Information Technology Fundamentals ( USA )
• Evaluating the Quality of Healthcare Delivery ( USA )
• Healthy Practices : Nutrition, Physical Activity, and Community and Family Participation ( USA )

उपलब्ध सुविधा -
• मानसिक रोग - डिप्रेशन • मेंदूचे रोग - पॅरालिसिस • ह्रदयरोग • श्वसनरोग • कान-नाक-घसा • प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग • बालरोग - बाल समुपदेशन • शल्यचिकित्सा • त्वचारोग व गुप्तरोग • किडणी-मुत्र-लिव्हर रोग • अस्थिरोग-वात विकार • पोटाचे रोग-मुळव्याद-भगंदर • मधुमेह • नेत्ररोग • कॅन्सर केअर • मुल न होणे-नपुंसकता-वैवाहिक समुपदेशन • केसांचे विकार

अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी डायल करा 9766921239

01/05/2025

"फिटनेस - एक संघर्ष" (अनुवादित)

मला आश्चर्य वाटत होते की मला धडधाकट (फिट) राहण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो.

आणि मग मला लक्षात आलं - मी अशा संस्कृतीतून आलो आहे जिथे माझे "शरीर" महत्त्वाचे आहे हे मला कधी शिकवलंच गेलं नाही.

मध्यमवर्गीय आचार विचार तुम्हाला निरोगी राहण्याचे महत्त्व कधीच शिकवत नाहीत. ते तुम्हाला सुरक्षित रहाणे, आज्ञाधारक रहाणे शिकवतात. ज्यायोगे नोकरी मिळेल असं काहीतरी शिकणं हेच चांगलं हेच तुमच्यावर बिंबवलं जातं. शारीरिकदृष्ट्या मजबूत किंवा "आरोग्यं धन संपदा" याबद्दल जागरूक राहणं कधीच शिकवलं जात नाही.

पै अन् पै वाचवणं आम्हाला महत्त्वाचं आहे, गुडघे वाचवणं नाही. समाजात आपली पत काय आहे याची आम्हाला काळजी असते, पण माझी posture (उभं राहण्याची ढब) बरोबर आहे का नाही यावर आम्ही कधीच लक्ष देत नाही.

आमचे बालपण गुण, शिष्टाचार आणि लग्न यावरील उपदेशांनी भरलेले होते. पण सुयोग्य श्वासोच्छवासाने अथवा प्राणायामाने anxiety (चिंता) वर कशी मात करता येऊ शकते, हे कधी कोणी आपल्याला सांगितलेच नाही. खरी झोप कशी असते हे कोणीही आपल्याला शिकवले नाही. साखर एखाद्या अंमली पदार्थासारखी घातक आहे, पचनसंस्था चांगली असणं किती महत्त्वाचं आहे यावर कधी चर्चाच झाली नाही.

नाश्त्याला टांग देणे म्हणजे आपण खूप बिझी आहोत असं नाही तर तर ते खूप नुकसानकारक आहे हे आपल्याला कधी कोणी शिकवलंच नाही.

जे काही घरी शिजवलेले आहे, जे पानात पडेल ते तुम्ही निमूटपणे खाता. जिथे जशी जागा मिळेल तिथे तुम्ही बसता. आजारी पडलात तरच तुम्ही विश्रांती घेता. या शिकवणीतच आपण मोठे होत गेलो.

विश्रांती म्हणजे आळस. व्यायाम म्हणजे टाईमपास. आरोग्य म्हणजे काहीतरी बिघाड झाल्यावर मगच लक्ष देण्याची गोष्ट - हेच आपल्यावर बिंबवलं गेलं.

डोकं दुखतंय का?
"बाम लाव थोडा, पड थोडावेळ."

पाठ दुखत आहे का?
"आयोडेक्स किंवा मूव्ह लाव. थोडा आराम कर."

घसा खराब आहे का?
"हळद घालून दूध पी, माझ्या आज्जीने हेच सांगितलं होतं."

गेला आठवडाभर अशक्तपणा जाणवत आहे का?
"किती धावपळ चालली आहे तुझी गेला आठवडाभर. एक काम कर, उद्या सुट्टी घे, बरं वाटेल."

जिथे रोग होऊच न देण्यावर (prevention) भर होता, अशा घरी आम्ही वाढलोच नाही. आम्ही अशा घरात वाढलो जिथे रोगापेक्षा निदानाची (diagnosis) भीती जास्त होती.

आपण टर्म इन्शुरन्स, लाइफ इन्शुरन्स, हेल्थ पॉलिसीजसाठी पैसे देऊ पण मानसिक उपचारांवर खर्च करणार नाही. किंवा फिटनेस कोच किंवा न्यूट्रिशनिस्ट यांची मदत घेण्याबद्दल कदापि विचार करणार नाही. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल तेव्हाच आम्ही रुग्णालयात जाऊ आणि मग तिथे डॉक्टर विचारतील, "पहले क्यूँ नहीं आये आप?"

आम्ही छोले भटुरे खाण्यासाठी २० किमी प्रवास करू, पण जेवणानंतर ५ किमी धावणार नाही. आपण केमिस्टकडे एमआरपीवरून वाद घालू, पण पाहुण्यांसाठी थंड पेये आणि फरसाण आदिंवर शेकडो रुपये खर्च करू.

आणि हे सगळं कसं योग्य, कसं छान आहे हेच आपण पटवून देत राहू.

आपण जर वारंवार थकत असू, सकाळी जागे होतानाही जर आपल्याला फ्रेश न वाटता थकवाच जाणवत असेल, तर त्याबद्दल काळजी वाटण्याऐवजी आपल्याला त्याचा अभिमानच वाटतो - कित्ती काम करतो तो !!

थकवा, ॲसिडिटी जणू आपल्या घरातले एक सदस्यच झालेले आहेत.

हा केवढा विसंवाद - केवढं विडंबन आहे हे ! प्रत्येक पावती, प्रत्येक रुपया, जुन्या लग्नपत्रिका, आलेल्या गिफ्टची आकर्षक वेष्टनं - हे सगळं सगळं आपण जपून ठेवतो, पण आपलं शरीर मात्र आपण जपत नाही, त्याची अक्षम्य हेळसांड करतो.

आपण करिअर घडवतो. आपण कुटुंबे वाढवतो. समाजाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक चौकटीत टिक करतो. पण आपण ज्या शरीराच्या माध्यमातून या सर्व गोष्टी शक्य करतो ते मात्र आपण दुर्लक्षित ठेवतो. जोवर गाडी ढकलता येते तोवर आपण ती ढकलतच राहतो.

आणि जेव्हा समजतं, तोपर्यंत, आधीच खूप उशीर झालेला असतो. स्लिप डिस्क. मधुमेह. निद्रानाश. वाढतं वजन. जिने चढताना लागणारा दम. सांधेदुखी.

रावण दहा अक्राळविक्राळ तोंडांनी आपल्याला भेडसावू लागतो.

शरीराच्या बारीकसारीक कुराबुरींतून मिळणाऱ्या धोक्याच्या सूचनांकडे (warnings) आपण दुर्लक्ष करत राहतो आणि मग कपाळाला हात लावून बसतो.

आपली विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे.

"दमलो" ऐवजी "मला विश्रांतीची गरज आहे" म्हणा.

"तब्येतीचे बघू हो नंतर" ऐवजी "तब्येतीची हेळसांड करून चालणार नाही, ताबडतोब बघितले पाहिजे" म्हणा.

लोकमान्य टिळकांनी प्रकृती सुधारण्यासाठी कॉलेजचं एक वर्ष मेहनत घेतली होती. आरोग्यासाठी केलेला खर्च, दिलेला वेळ हे खर्च नाहीत तर तुमची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे.

आणि फिटनेस म्हणजे शरीराचे लाड अथवा चोचले नाहीत तर चांगल्या रीतीने जगण्यासाठी एक अविभाज्य अंग आहे.

जर आपण वेळीच जागे झालो नाही, शरीराच्या - मनाच्या कुरकुरीकडे दुर्लक्ष करून पैश्यांच्या मागे धावत राहिलो, तर एके दिवशी हे सगळे साठवलेले पैसे त्याच शरीरावर, शरीराच्या दुरुस्तीवर - डागडूजीवर खर्च करावे लागतील आणि आपल्या औषधोपचारांच्या कर्जाचा डोंगर पुढच्या पिढीला फेडत बसावं लागेल.

(५८ वर्षांच्या तरण्याबांड काटक राकेश मोघे - गोरेगाव, मुंबई यांच्याकडून अग्रेषित)

अधिक जानकारी हेतू -

डॉ मुरार होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हिंगणघाट
डाॅ प्रफुल मुरार
BHMS, MPH
• Homoeopathic Consultant
• Diet-Nutrition-Wellness-LifeStyle Diseases Coach
• Medical Coordinator, mjpjay & pmjay, Govt. Sub District Hospital, Hinganghat
• Value Based Care ( USA )
• Quality Improvement in Healthcare Organizations ( USA )
• Foundation of Public Health Practice - The Public Health Approach ( LONDON )
• Sustainable Tourism - Promoting Environmental Public Health ( DENMARK )
• Health Information Technology Fundamentals ( USA )
• Evaluating the Quality of Healthcare Delivery ( USA )
• Healthy Practices : Nutrition, Physical Activity, and Community and Family Participation ( USA )

उपलब्ध सुविधा -
• मानसिक रोग - डिप्रेशन • मेंदूचे रोग - पॅरालिसिस • ह्रदयरोग • श्वसनरोग • कान-नाक-घसा • प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोग • बालरोग - बाल समुपदेशन • शल्यचिकित्सा • त्वचारोग व गुप्तरोग • किडणी-मुत्र-लिव्हर रोग • अस्थिरोग-वात विकार • पोटाचे रोग-मुळव्याद-भगंदर • मधुमेह • नेत्ररोग • कॅन्सर केअर • मुल न होणे-नपुंसकता-वैवाहिक समुपदेशन • केसांचे विकार

अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी डायल करा 9766921239

Address

Hinganghat
442301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Murar Homoeopathic Multispeciality Hospital Hinganghat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Murar Homoeopathic Multispeciality Hospital Hinganghat:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category