15/08/2025
आज (१५ ऑगस्ट) देशाचा स्वातंत्र्यदिन...
१५ ऑगस्ट म्हणजे, राष्ट्रीय सण; जो प्रत्येक भारतीय आणि विविध देशांत स्थायिक झालेले भारतीय नागरिक हा दिवस उत्साहात साजरा करतात. आजच्याच दिवशी देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले होते. आज देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. इंग्रजांनी सुमारे दीडशे वर्षे या विशाल देशावर निरंकुश राज्य केले. आर्थिकदृष्ट्या संपन्न देशाला विपन्नावस्था आणली. जुलूम, अत्याचार केले, धर्म-जातींमध्ये भांडणे लावली. हे सर्व असह्य झाल्याने स्वातंत्र्यचळवळ सुरू झाली.
लो. टिळक, म. गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू यांच्यासारख्या नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. स्वा. सावरकर, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र लढा उभारला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून जबरदस्त संघर्ष केला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. जनतेनेही मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सोसल्या, तुरुंगवास भोगला. प्राणांचे बलिदान केले. महिला, शाळकरी मुलेही यामध्ये मागे नव्हती. म्हणूनच या स्वातंत्र्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना देश व देशहित प्रथम ही उदात्त भावना जपणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करू या. सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा...
जय हिंद..!
#भारत #भारतीय_स्वातंत्र्यदिन ्ट #हार्दिक_शुभेच्छा