11/05/2022
मनुष्याला नैसर्गिकरित्या दोन वेळा दात येतात. दुधाचे दात व नंतर ते पडल्यावर कायमस्वरूपी दात येतात
आताच्या आधुनिक उपचारपद्धतीमध्ये याची जागा दंतप्रत्यारोपण (Dental Implant) ने घेतले आहे. जो दात नाही त्याठिकाणी आधुनिक उपचाऱ्यांच्या पद्धतीने दंतप्रत्यारोपण केले जाते. अगोदरचे जुने दंतरोग तज्ज्ञ मजेने रुग्णांना म्हणायचे कायमचा दात पडल्यानंतर देवाने ठरवले तरी आता तो दात येणार नाही. पण खरेतर या उपचारपद्धतीने रुग्णांना तिसऱ्यांदा दात मिळणे शक्य झाले आहे.
दंत प्रत्यारोपण म्हणजे काय?
दात नसलेल्या जागी (Missing Tooth) टायटॅनियम या धातूचा स्क्रूवर दात बसविला जातो. दंत प्रत्यारोपण त्यावर सिरॅमिक कॅप बसविली जाते. या पद्धतीने बसविलेले दात खऱ्या दातासारखेच दिसतात. खरेतर आपल्या देशात दातांची ट्रीटमेंट फार गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. दातांची नियमित तपासणी केली पाहिजे पण तसे काही होताना दिसत नाही. दंत प्रत्यारोपण किंवा दातांच्या आधुनिक उपचार पद्धतीसाठी रुग्णांना खूप वेळ, संयम आणि व्हिजिट्स द्याव्या लागतात.
प्रत्यारोपणाचे फायदे काय?
इम्पलान्ट्स खराब होत नाही, तसेच किडत नाही. या उपचार पद्धतीत कमीत कमी शस्त्रक्रिया असल्यामुळे यात फारशा वेदना, रक्तस्राव व सूज येण्याचा प्रकार नाही. कॅड कॅम तंत्रज्ञानद्वारे करण्यात येणारे हे नवीन प्रोस्थेसिस स्वच्छ करणे व त्यांची देखभाल करणे हे अधिक सोपे आहे. मुख्य म्हणजे इम्पलान्ट्स दीर्घ काळ टिकतात. शिवाय आर्थिकदृष्ट्या आता ते सर्वसामान्यांना परवडण्याजोगे झाले आहेत.
चांगल्या दातांमुळे रुग्ण व्यवस्थित खाऊ शकतो, यामुळे रुग्णाला एक पूर्णपणे नवीन व मोहक असे स्मितहास्य मिळते. या कृत्रिम दातांचा उपयोग त्या व्यक्तीला अर्थातच अन्न चावण्यासाठी तसेच आरोग्य व रूप सुधारण्यासाठी होतो.
* * * * * * * * * *
दात चांगले स्वच्छ करायला हवे, जेणे करून हिरड्यांच्या समस्या निर्माण होऊ नये. दातांचे आरोग्य चांगले आहे ना, तसेच आपल्याला अन्नपदार्थ नीट चावता येतात ना, याची खात्री करण्यासाठी दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने डॉक्टरांची फॉलोअप भेट घ्यावी.