
07/09/2022
जळवात :-शरीरामध्ये रूक्षता वाढल्याने, वातप्रकोपक थंड पदार्थांचे अतिमात्रेत सेवन केल्याने शरीरातील आवश्यक अशा स्निग्धतेचा -हास होतो. त्वचा आणि मांसासारख्या धातूना एकसंघ ठेवणारा जो स्निग्धांश त्याच्यातच कमी झाल्याने हातापायाला भेगा पडून जळवात निर्माण होतो. काही वेळा तर या भेगा इतक्या मोठ्या असतात की, आतील हाड व मांस उघडे झालेले दिसतात. व्यवस्थित चालता येत नाही. हाताने घास घेणेही अवघड होते. जसा स्निग्धांश वाढेल व थंडी कमी होईल तसे शरीर पुन्हा सामान्यवस्थेत येत जाते. असे दिसते की, काही घडलेच नाही. जर स्निग्धांश वाढला नाही तर हा आजार वर्षभरही राहू शकतो.