SD-SEED (Suresh Dada Scheme for Educational & Entrepreneurial Development)

  • Home
  • India
  • Jaigaon
  • SD-SEED (Suresh Dada Scheme for Educational & Entrepreneurial Development)

SD-SEED (Suresh Dada Scheme for Educational & Entrepreneurial Development) Suresh Dada Scheme for Educational & Entrepreneurial Development (SD-SEED) provides scholarship to needy and intellectual students of Jalgaon district. Shri.

Since 2008, over 13500 students have benefited from this scheme. Under the guidance of Shri. Suresh Dada Jain, 'Suresh Dada Scheme for Educational & Entrepreneurial Development' (SD-SEED) has been started with the vision, 'To seed talented students for successfully acquiring entrepreneurial skills and enhanced employability at global level'. Suresh Dada Jain is a renowned personality of Maharashtra. Dada has been tirelessly working for the last four decades in the fields of politics, education, social harmony, health, culture etc. He inherited this committement to public service from his parents and has always been ahead of his peers in the development and progress of Jalgaon districts.

एसडी-सीड तर्फे दिनांक १७ जानेवारी २०२५  रोजी "वेळेचे नियोजन” या विषयावर महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय...
24/03/2025

एसडी-सीड तर्फे दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी "वेळेचे नियोजन” या विषयावर महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव येथे श्री अभिजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

एसडी-सीड तर्फे दिनांक १६ जानेवारी २०२५  रोजी "स्मरणशक्ती विकास” या विषयावर प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय जळगाव येथे प्...
24/03/2025

एसडी-सीड तर्फे दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी "स्मरणशक्ती विकास” या विषयावर प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय जळगाव येथे प्रा. सुरेश पांडे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

एसडी-सीड तर्फे दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी "ध्येय निश्चिती व संपादन” या विषयावर जय दुर्गा  माध्यमिक विद्यालय जळगाव येथे ...
04/01/2025

एसडी-सीड तर्फे दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी "ध्येय निश्चिती व संपादन” या विषयावर जय दुर्गा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे प्रा. सुरेश पांडे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

एसडी-सीड तर्फे दिनांक १६  व १७ डिसेंबर २०२४ रोजी "SMART GIRL” या विषयावर मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालय जळगाव येथे श्री...
04/01/2025

एसडी-सीड तर्फे दिनांक १६ व १७ डिसेंबर २०२४ रोजी "SMART GIRL” या विषयावर मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालय जळगाव येथे श्री. रत्नाकर महाजन हिंगोली यांच्या मार्गदर्शनात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुमारे ५७ विद्यार्थिनींनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

एसडी-सीड तर्फे दिनांक १२ व १३   डिसेंबर  २०२४  रोजी "SMART GIRL” या विषयावर डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्...
04/01/2025

एसडी-सीड तर्फे दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२४ रोजी "SMART GIRL” या विषयावर डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्याल जळगाव येथे श्री. रत्नाकर महाजन हिंगोली यांच्या मार्गदर्शनात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुमारे ५५ विद्यार्थिनींनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

एसडी-सीड तर्फे दिनांक ११  डिसेंबर  २०२४  रोजी “सीईटी परीक्षा मार्गदर्शन” या विषयावर इकरा शाहीन जुनिअर कॉलेज जळगाव येथे श...
04/01/2025

एसडी-सीड तर्फे दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी “सीईटी परीक्षा मार्गदर्शन” या विषयावर इकरा शाहीन जुनिअर कॉलेज जळगाव येथे श्री. नंदलाल गादिया यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुमारे ६७ विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

एसडी-सीड तर्फे दिनांक १०  डिसेंबर  २०२४  रोजी “परिक्षेला सामोरे जातांना ..” या विषयावर मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालय, ...
10/12/2024

एसडी-सीड तर्फे दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी “परिक्षेला सामोरे जातांना ..” या विषयावर मानवसेवा मंडळ माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे श्री. नंदलाल गादिया यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुमारे ५० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

एसडी-सीड तर्फे दिनांक ०९  डिसेंबर  २०२४  रोजी “करिअर मार्गदर्शन” या विषयावर महाराणा प्रताप  माध्यमिक विद्यालय, जळगाव  ये...
10/12/2024

एसडी-सीड तर्फे दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी “करिअर मार्गदर्शन” या विषयावर महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे प्रा. एस. व्ही. सोमवंशी यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुमारे ७० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

एसडी-सीड तर्फे दिनांक ०४ डिसेंबर  २०२४  रोजी “श्रवण कौशल्य विकास” या विषयावर या.दे.पाटील माध्यमिक विद्यालय, जळगाव  येथे ...
10/12/2024

एसडी-सीड तर्फे दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी “श्रवण कौशल्य विकास” या विषयावर या.दे.पाटील माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे प्रा. सुरेश पांडे यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुमारे १२० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

25/11/2024
एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा थाटात संपन्न करिअर निवडतांना प्लान बी तयार ठेवा - डॉ. एस. एस. मंथाजीवनात यशस्वी व्हायचे...
25/11/2024

एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा थाटात संपन्न
करिअर निवडतांना प्लान बी तयार ठेवा - डॉ. एस. एस. मंथा
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला ओळखा - मा. दीपक चौधरी
जळगाव: एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अशा ५०० विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिरात मोठ्या थाटात शिष्यवृत्तीचे वितरण डॉ. एस. एस. मंथा आणि भूमिपुत्र मा. दीपक चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सुरेशदादा जैन यांच्या मातोश्री स्वर्गीय प्रेमाबाई जैन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अपर्णा भट आणि त्यांच्या समूहाने सरस्वती वंदना सादर केली एसडी-सीड गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी एसडी-सीडचा गेल्या सतरा वर्षाचा प्रगतीचा गोषवारा संक्षिप्त स्वरुपात मांडला.
कार्याध्यक्ष मीनाक्षी जैन यांनी संस्थेच्या भविष्यातील योजना आणि कार्यप्रणाली याबाबत माहिती दिली देतांना विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच आर्थिक साक्षरता रुजावी म्हणून एसडी-सीड तर्फे कार्य करण्यात येत आहे व भविष्यातही वेगवेगळे विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविले जातील असे सांगितले.
यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच एसडी-सीड दत्तक योजनेत दानशूर व्यक्ती व सेवाभावी सामाजिक संस्थांनी अधिक योगदान देण्याचे आवाहन केले.
आपल्या क्षमता दाखवण्यासाठी आणि आपले भविष्य घडवण्यासाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे. प्रत्येक धडा, प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक धक्का ही वाढीची संधी असते. जिज्ञासू रहा, कठोर परिश्रम करा आणि यशस्वी होण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. जीवन तुमची परीक्षा घेईल, परंतु तुमचा दृढनिश्चय आणि लवचिकता तुम्हाला यातून पार करेल असे मार्गदर्शन ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्युकेशनचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा यांनी केले.
करिअर निवडतांना शैक्षणीक अर्हतेवर आधारित आपले करिअर आणि तुमच्या अंगीभूत विशेष कौशल्य व क्षमतेवर /गुणांवर आधारित करिअर असे दोन पर्याय तयार ठेवा.
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूमी पुत्र मा. दीपक चौधरी यांनी मार्गदर्शन करतांना आपला संघर्षमय जीवन प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रेरणादायी पुस्तके वाचून किंवा प्रेरणादायी लोकांचे भाषणे ऐकून जीवनात कोणी यशस्वी होत नाही तर जे अपयशी झाले आहेत त्यांच्या जीवन प्रवासातून, प्रेरणेतून शिकता येते आणि यशस्वी होता येते. शून्यातून विश्व निर्माण करता येते त्यासाठी स्वतः वर विश्वास पाहिजे आणि कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटी हवी. शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तुम्ही चुका स्वीकारा आणि तुमची ध्येये कधीही गमावू नका. तुमचा आजचा प्रयत्न उद्या च्या यशाचा पाया तयार करेल. चालत राहा, तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा आणि तुमच्यात महान गोष्टी साध्य करण्याची ताकद आहे हे जाणून घ्या.
व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशदादा जैन, कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड, राजा मयूर, मेजर नाना वाणी, राजेश जैन, गव्हर्निंग बोर्ड सदस्य डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन व मानपत्र वाचन महेश गोरडे यांनी केले. पसायदान ऋषभ जैन यांनी सादर केले. सूत्र संचलन अपूर्वा राका आणि राजेश यावलकर यांनी केले.
त्याच बरोबर सभागृहात एसडी-सीड सदस्य डॉ. एस. एस. राणे, डॉ. विवेक काटदरे, डॉ. अजित वाघ, डॉ. आर. एस. डाकलिया, डॉ. शांताराम बडगुजर, प्रा. संजय दहाड, प्रा. नंदलाल गादिया, श्री उमेश सेठिया, श्री सागर पगारिया, श्री सुभाष लोढा, श्री विक्रांत सराफ, डॉ. सुरेश अलीझाड, श्री. मनोज गोविंदवार तालुका समन्वयक श्री पप्पूशेट बरोडा, श्री. सुरेश धारिवाल, श्री सुरेश भंडारी हे उपस्थित होते.
प्रातिनिधिक स्वरुपात दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण
भूमी संतोष सपके, रुहीनाज रंगरेज अनिस, रोशनी गजानन पाटील, ललित सुर्यकांत हरणे, अपर्णा प्रविण बारी, कंदर्प सुभाष पाटील, तेजस्विनी संजय कदम, राहुल सुधाकर अत्तरदे, गायत्री देविदास काकडे, रोहित हरीश जैसवाल. उर्वरित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
प्रसाद जोशी आणि इशिता पाटे या दोन विद्यार्थ्यांनी एसडी-सीड कडून होत असलेलेया शिष्यवृत्ती रुपी मदतीने त्यांच्या जीवनात काय परिवर्तन होत आहे या बद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले.

Address

SD-SEED, 7, Shivaji Nagar
Jaigaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when SD-SEED (Suresh Dada Scheme for Educational & Entrepreneurial Development) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to SD-SEED (Suresh Dada Scheme for Educational & Entrepreneurial Development):

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram