16/07/2019
तुमचे सांधे सातत्याने दुखत असतील तर ती ऑर्थरायटीसची सुरवात असू शकते. या दुखण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या गंभीर स्वरूप घेवू शकते. भारतातील ऑर्थरायटीसच्या रुग्णांची संख्या
वेगाने वाढत असून लवकरच ऑर्थरायटीसने पीडीत रूग्णांची संख्या मधुमेहीपेक्षा जास्त होईल, असा अंदाज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. ऑर्थरायटीस म्हणजे काय व स्मायलींग नी अर्थातच पार्शल जाँईंट व टोटल नी रिप्लेसमेंट हे जाणून घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मनिष चौधरी,जळगाव.
*पार्शल नी रिप्लेसमेंट : आधुनिक तंत्रज्ञानाची गुडघ्यावरील आनंददायी शस्त्रक्रिया*
गुडघ्यावरील शस्त्रक्रिया म्हटली की अनेकांच्या मनात विविध शंका येत असतात. पण गुडघ्यात होत असलेल्या असहय वेदना पाहता शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया म्हटली की रूग्णास होणारा त्रास, तो पुन्हा पहिल्यासारखा चालेल का ? त्यासाठी होणारा खर्च असे अनेकविध प्रश्न उपस्थित होतात. कारणही तसेच होते. कारण आतापर्यत गुडघ्यांवरील उपचारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरात जावे लागत असे. त्यात खर्चही होत असे. परंतू आता गुडघ्यांवरील आजारांवरील उपचारांसाठी मुंबई पुण्यास जाण्याची गरज नाही. कारण गुडघ्यावरील शस्त्रक्रियेची अत्याध्ुनिक अशी सुविधा जळगावच्या नॉर्दन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
पार्शल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
गुडघे घासले गेल्याने त्याचे संतुलन ढासळते. त्यामुळे उभे राहणे, चालणे, उठ बस करतांना असहय असा वेदना होत असतात. तर उभे राहण्यासह चालताही येत नाही. या समस्येवर वैद्यकशास्त्रात रोज नवनविन शोध लावले जात आहेत. त्यात पूर्ण गुडघा बदलाची शस्त्रक्रिया हा एक शोध होता. त्यानुसार रुग्णाचा दुखणारा गुडघा शस्त्रक्रिया करून बदलवण्यात येत असे. यानंतर रुग्ण त्याची नियमित कामे करू शकतो. पूर्ण गुडघा बदलण्याबाबत वैद्यक शास्त्रात संशोधन केले गेले. आता फक्त गुडघ्याचा जो भाग घासला गेला आहे तोच बदलण्याचा शोध लागला आहे. या शस्त्रक्रियेस पार्शल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया असे म्हटले जाते.
अशी होते शस्त्रक्रिया
यात गुडघ्याचा जो भाग घासला गेला आहे तोच भाग बदलवण्यात येतो. जो भाग घासला गेला आहे तेवढाच बदल करून गुडघ्याचे आतील संतूलन राखले जाते. त्यावर भार पेलण्याच्या क्षमतेचा आधार दिला जातो. पार्शल रिप्लेसमेंट अर्थात आंशीक गुडघा बदल होय. यात गुडघ्याचा फक्त खराब झालेला भाग मध्यभागी, बाहेरील भाग बदलवला जातो. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी एक तास वेळ लागतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रूग्ण सायंकाळी घरी चालत जातो. दुस-या दिवसापासून तो पूर्वीप्रमाणेच मांडी घालून बसणे, चालणे, योगासणे करणे, धावणे, उभे राहणे आदी सर्व तो करू शकतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा तासात शस्त्रक्रिया रिकव्हर होत असते. वॉकर घेवून चालण्याची गरजच भासत नाही.
गुडघे दुखीवरील दुसरी उपचाराची पध्दत म्हणजे लिंगामेंट इंनज्युरी
यात दुर्बीणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. यात खराब झालेला भाग काढून तेथे कृत्रिम भाग टाकला जातो. खेळतांना किंवा वयोमनानुसार किंवा विविध कारणांमुळे गुडघ्यासह खांद्यास दुखापत होत असते. अशावेळी ही शस्त्रक्रिया केली जाते.यामुळे गुडघा लचकत नाही. त्याचे संतूलनही पुर्वीसारखे राहत रूग्ण सर्व कामे करू शकतो.
*रूग्ण आनंदाने सांगतात....*
पार्शल शस्त्रक्रिया केलेले जळगावातील योगशिक्षक डॉ. जगदीश जोशी यांनी नॉर्दन हॉस्पिटलमध्ये दोनही गुडघ्यांना पार्शल शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झाल्याच्या दुस-या दिवसापासून ते त्यांची सर्व कामे करू लागली. एवढेच नव्हे तर त्यांनी चारधाम यात्राही केली आहे. या चारधाम यात्रेत त्यांना शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्याने कोणताही त्रास दिला नाही. नियमित योगासणे, चालणे, मांडी घालून बसणे, उठणे या सर्व क्रिया त्या विनासायास करत आहेत.
पंजाब केसरी कुस्तीपटू अब्दुल गनी यांनेही येथे लिगामेंट सर्जरी केली असुन पुन्हा तो कुस्तीचा आखाडा गाजवण्यास नव्या जोशात तयार झाला आहे. शेगावचा कबडडीपटू अनिल निंबोळकर यानेही गुडघ्यावर लिगामेंट शस्त्रक्रिया करून घेतली. आज तोही प्रो लिग कबडडीमध्ये खेळत आहे.
एकूणच काय तर गुडघ्यावरील दूखण्यावरील शस्त्रक्रियेसाठी आता मुंबई पुण्याकडे जाण्याची गरज नाही. तर जळगावातही ही शस्त्रक्रिया नॉर्दन हॉस्पिटलमध्ये डॉ. मनिष चौधरी यशस्वीपणे करत आहेत. नॉर्दन हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आहे. योग्य व कमी खर्चात शस्त्रक्रिया होत असल्याने आता मुंबई पुण्याहून येथे रूग्ण उपचारासाठी येत आहेत.
...
संकलन व शब्दांकन : पंकज पाटील, जळगाव
मो. नं. 7588822126