Tapdiya Clinic - Nursing Home Jalgaon

Tapdiya Clinic - Nursing Home Jalgaon Address - 1. Tapdiya Clinic , In front of Sambhaji Nagar Auto Stop, Mahabal, Jalgaon 425001.
2. Tap

08/09/2022

*हृदयाची काळजी घ्या,* *कोलेस्टेरॉल कमी करा*

अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाहीत. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी किरकोळ स्वरुपाचा त्रास झाला तरी वैद्यकीय तपासणी करुन घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार करुन घेणे हिताचे आहे.

जग वेगाने प्रगती करत आहे, या प्रगतीसोबतच नवनव्या आजारांचा जन्म होत आहे. काही जुने आजार तीव्र स्वरुपात माणसाला त्रास देऊ लागले आहेत. यातच समावेश होतो कोलेस्टेरॉल या आजाराचा. हा आजार अतिशय आरामात शरीरात प्रवेश करतो. एरवी फिट दिसणारे तरुण तरुणीही या आजाराला बळी पडू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी करणाऱ्यांना या आजाराचे संकेत लवकर मिळू शकतात. पण इतरांना हा आजार झाल्याचे कळायला वेळ लागतो.

कोलेस्टेरॉलचा आजार जेवढा गंभीर आहे तेवढाच तो दूर करणेही सोपे आहे. पण त्यासाठी चिकाटी हवी, संयम हवा आणि सातत्य हवे. काही सोपे उपाय नियमित केले तर कोलेस्टेरॉलच्या आजारावर मात करणे शक्य आहे.

*कोलेस्टेरॉल म्हणजे काय?*

सोप्या भाषेत सांगायचे तर कोलेस्टेरॉल (cholesterol) हा रक्तात असलेला घटक आहे. शरीरात रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहावे वेगवेगळ्या अवयवांना ऊर्जा मिळावी यासाठी रक्तातील कोलेस्टेरॉलचा वापर होतो. नैसर्गिकरित्या शरीर कोलेस्टेरॉल तयार करते तसेच फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांच्या सेवनामुळे शरीरात कृत्रिम कोलेस्टेरॉल प्रवेश करते. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ते रक्तवाहिन्यांजवळ चिकटून नव्या भिंती, नवे अडथळे निर्माण करते. यामुळे शरारीत सतत सुरू असलेल्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यास तब्येत बिघडण्यास सुरुवात होते. शरीरात अतिरिक्त कोलेस्टेरॉलची निर्मिती होणे या आजाराला हायपर कोलेस्ट्रोलेमिया म्हणतात.

शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळते. कमी घनता असलेले लिपोप्रोटीन LDL आणि जास्त घनतेचे लिपोप्रोटीन HDL कोलेस्टेरॉल शरीरात आढळते. कोलेस्टेरॉलचे शरीरातील प्रमाण वाढण्याची अनेक कारणं आहेत. यातील २ प्रमुख कारणं

आहाराच्या तुलनेत शरीराच्या हालचाली कमी असणे फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन
जर वजन जास्त असेल तर दोन पैकी किमान एक आणि काही वेळा दोन्ही कारणांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. रक्ताची कोलेस्टेरॉल तपासणी करुन घ्या. यात शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण समजेल. रक्तात 200 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर चिंतेची गरज नाही. पण रक्तात 200-239 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. जर रक्तात 240 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण हे हाय कोलेस्टेरॉल आहे. ज्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते अशांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो.

कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे सोपे उपाय

◼️दररोज जास्तीत उकळलेले पाणी प्या.

◼️दररोज सकाळी तुळशीची २-४ स्वच्छ धुऊन घेतलेली पाने चावून खा.

◼️सकाळी एक ग्लास पाण्यात लेमनग्रास तेलाचे ५ थेंब टाकून ते पाणी प्या.

◼️लिंबू पाण्याने धुवून घ्या नंतर दोन ग्लास पाणी भांड्यात उकळवत ठेवा. पाणी कोमट असताना त्यात लिंबू पिळा आणि लिंबाच्या साली पाण्यात टाका. लिंबाच्या साली टाकून द्या.

◼️दररोज सकाळी ब्रश करण्याआधी लसणाच्या (Garlic) २-४ पाकळ्या चावून खा. किंवा लसणाच्या गोळ्या मिळतात त्या खायलाही हरकत नाही.

◼️रोजच्या आहारात मर्यादीत प्रमाणात लसणाचा वापर करा. नारळाच्या तेलापासून (Coconut oil) तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करा.

◼️माशापासून तयार केलेल्या तेलाचा (Cod liver oil) खाण्याच्या पदार्थांमध्ये वापर करा आणि त्या पदार्थांचे सेवन करा. ओमेगा-3 च्या गोळ्या घ्यायलाही हरकत नाही.

◼️ज्या पदार्थांमधून ब३, क आणि ई जीवनसत्व (vitamine B3, C, E) मिळतात अशा पदार्थांचे सेवन करा.

◼️दररोज दुपारच्या जेवणात एक वाटी दह्याचे सेवन करा. दही पदार्थांच्या पचनासाठी मदत करते.

◼️फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ यांचे सेवन टाळा.

◼️साखर आणि मैदा यांचा वापर करुन केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.

◼️बेकरी प्रॉडक्ट, चिप्स आणि वेफर्स खाणे टाळा.

◼️गोडव्यासाठी जेवणात साखरेऐवजी गुळाचा वापर करा.

◼️दररोज किमान एक तास योगासने करा. तसेच चालणे-फिरणेही ठेवा.

30/08/2022

*पचनक्रिया बिघडलीय?, आहारात या गोष्टींचा करा समावेश*

1.पचनक्रिया सुधारण्यासाठी पपई हे फळ महत्त्वपूर्ण कामगिरी निभावते. पचनक्रियेमध्ये झालेला बिघाड पपईचे सेवन केल्यास 24 तासांच्या आत सुधारते.

2.दहीमध्ये असलेले रासायनिक गुणधर्म अन्नपदार्थ पचवण्यास मदत करतात. अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसच्या समस्यास असल्यास एक वाटी दही खावे. या समस्या दूर होण्यास मदत होईल.

3.केळ्यांमध्ये फायबरचे प्रचंड प्रमाणात असते. केळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. शिवाय, आतड्यांमध्ये होणार जळजळदेखील कमी होते. जेवणानंतर एक केळे खाण्याची सवय लावल्यास ते आरोग्यास फायदेशीर ठरते.

4.हळदीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोमट पाण्यामध्ये कच्ची हळद मिसून प्यावे. गॅसेसचा त्रास कमी होतो

5.अननसमध्ये ब्रोमेलिन एन्जाइम असतात, हे पचनक्रिया उत्तम करण्यास फायदेशीर ठरतात. जेवणानंतर अननस किंवा अननसाच्या रसाचे सेवन करावे.

6.नारळाच्या तेलामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबत अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटीसारखा त्रासही कमी होतो.

7.पुदिनाच्या सेवनामुळे पोटाला थंडावा मिळतो. बिघडलेली पचनक्रिया सुधारते. पुदिन्याचा रस किंवा पाने चावून खाल्ल्यास पोटातील गॅस, पोटदुखी, पोटाला आतील बाजूनं आलेली सूज इत्यादी समस्या कमी होतात.

(टीप - कुठलेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

अधिक माहितीसाठी संपर्क करा -
तापडिया क्लिनिक नर्सिंग होम
1. सिंधी कॉलनी , सरस्वती डेरी समोर जळगाव
2. संभाजी नगर चौक, महाबळ जळगाव
9422777756

05/01/2022

कोरोना हा विषाणू अनेक वर्षांपासून सर्दी खोकल्याचा दुर्मिळ विषाणू म्हणून ओळखला जातो.अचानक हा विषाणू नैसर्गिक वा कृत्रिम जनुकीय बदलांमूळे जीवघेण्या आजाराचे जगभरात कारण होतो.त्यानंतर या विषाणूच्या जनुकीय रचनेत सतत बदल होतात व तो वेगवेगळ्या नावाने जगभरात ओळखला जातो.कधी डेल्टा प्लस तर आता ओमायक्रॉन !
निश्चितच हे जनुकीय बदल नेहमीच्या नैसर्गिक पद्धतीनेच होत असणार व या विषाणूची ओळख फक्त व फक्त 'सर्दी खोकल्याचा विषाणू' म्हणूनच राहील. त्यामूळे नियमित होणार्‍या सर्दी खोकल्याच्या आजारा इतकचं महत्व याला द्यायला हवे.या विषाणूच्या संसर्गासोबत पुन्हा 'भिती'चा विषाणू जर चिकटला तर मृत्युचा आकडे परत मोजले जातील व दुकानदारीला हेच हवे आहे.तरी पुन्हा तेच सांगावेसे वाटते,
घाबरू नका ! सर्दी खोकल्याच्या नियमित आजारासारखीच वागणूक या विषाणूला द्या.

डॉ गोविंद अनिल तापडिया
तापडिया क्लिनिक
जळगाव
📞९४२२७७७७५६
🙏

04/11/2021

🪔 *शुभ दीपावली* 🪔

समजा जर मुले कोरोना ने बाधित झाली तर काय ?मी मागे पण सांगितले आहे की मुलांच्या शाळा बंद आहेत ,त्यांचे इतर मुलांमध्ये खेळ...
30/05/2021

समजा जर मुले कोरोना ने बाधित झाली तर काय ?

मी मागे पण सांगितले आहे की मुलांच्या शाळा बंद आहेत ,त्यांचे इतर मुलांमध्ये खेळणे बंद आहे , ते स्वतः कुठे जाऊन फिरून कोरोना घरी घेऊन यायची शक्यता कमी आहे .इथे प्रॉब्लेम मोठ्यांचा आहे ,त्यांना बाहेर जावे लागते ,त्या दरम्यान त्यांना बाधा झाली आणि त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही , तर घरातील मुले बाधित होऊ शकतात ! त्यामुळे मुलांना कोरोना पासून कसे वाचवायचे ? असा प्रश्न आला तर माझे पाहिले वाक्य असते ," तुम्ही आधी तुमची योग्य काळजी घ्या ,SMS चे काटेकोर पालन करा ,तुम्ही वाचले तर घरातील मुले वाचतील !

एवढे सर्व करून ,नकळत जर मुले बाधित झालीच तर काय ?

90 ते 95 टक्के मुलांना सौम्य आजार होतो ,त्यातील 80 टक्के मुलांना तर काही लक्षणेच दिसत नाहीत ! 5 /6 टक्के मुले मध्यम ते तीव्र स्वरूपाचा आजार होतो ,ज्यात काहींना oxygen ची गरज भासू शकते .2 ते 3 टक्के मुले यांना तीव्र सुरूपाचा कोविड नयूमोनिया किंवा MIS-C ,आणि MIS_N नावाचे आजार होऊ शकतात आणि कोविडPICU मध्ये त्याचे उपचार केले जातात .

ह्या पोस्ट मध्ये आपण जो 90 ते 95 टक्के वाला गट आहे त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी कसे manage करावे ते बघू .

मुलांच्या खालील गोष्टी वर आपण लक्ष ठेवले पाहिजे

1. शारीरिक तापमान temperature

2 .Oxygen saturation ( pulse oxymeter ,वर मोजतात)

3.पल्स ,हृदयाची गति (हे पण पल्स oxymeter वर दिसते)

4. श्वासाची गति ( एक मिनिटात कितीवेळा छातीचा भाता वर खाली होतो ते मोजणे )

5 .मुलांच्या लघवीचे प्रमाण (त्यांनी दर 3 /4 तासांनी भरपूर लघवी केली पाहिजे , 6 तास उलटून लघवी केली नाही हे धोक्याचे लक्षण आहे )

ह्या 5 गोष्टीसाठी एक तक्ता बनवा ,दर दिवशी चे सकाळ आणि संध्याकाळचे reading त्यात मांडून ठेवणे .

आपल्या नेहमीच्या बालरोगतज्ञांना हा तक्ता रोज च्या रोज पाठवावा .पोसिटीव्ह आल्या पासून ते पुढे 14 दिवस तुम्हाला ते करायचे आहे .

रेड फ्लॅग sign ( धोक्याचे सिग्नल)

1.सलग 3 दिवसाच्या वर ताप सारखा चढउतार होणे

2.Oxygen ची पातळी 94 %च्या खाली जाणे

3.पल्स rate वाढलेला असणे किंवा कमी होणे
( 28 दिवसापेक्षा कमी दिवसाचे बाळ = 100 ते 160
1 महिना ते 11 महिने =90 ते 160/min
1 वर्ष ते 2 वर्ष =80 ते 120/min
3 ते 5 वर्ष = 60 ते 100/min
6 ते 11 वर्ष = 60 ते 90 /min
12 ते 15 वर्ष = 50 ते 90 /min)
हे नॉर्मल range आहे हृदय गती म्हणजेच पल्स ची .

4. त्याची श्वासाची गति वाढणे
(2 महिन्यापेक्षा लहान बाळ = 60 /min
2 ते 11 महिने= 50 /min
1 ते 4 वर्ष = 40/min
5 वरश्यावरील मुले = 30/min)
ही नॉर्मल range आहे.

5 .लघवीचे प्रमाण कमी होणे
( 6 तासांपेक्षा जास्त वेळ लघवी न करणे)

6 .मूल खूप मलूल होणे ,drowsiness वाढणे .

7.अंगावर लाल पुरळ / rash यायला लागणे,डोळे लाल होणे , ओठ लाल होणे

8 . झटके येणे (epileptic अटॅक )

वरील काहीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांना आधी फोन करून कल्पना देऊन त्यांच्या सल्ल्याने हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणे .

आधी फोन करावा तो ह्यासाठी की जर कोविड पोसिटीव्ह रुग्ण येत आहे तर तसा बेड कुठे उपलब्ध आहे ह्याची चौकशी ते करून मग तुम्हाला तसा सल्ला देऊ शकतात ! त्यामुळे तुमची एका हॉस्पिटल ते दुसऱ्या हॉस्पिटल मधल्या चकरा वाचतील .

घरातील बाकीच्या लोकांनी मास्क घालावा .
वयस्कर व्यक्तींना मुलांपासून लांब ठेवावे
शक्यतो एकाच व्यक्तीने ( आई किंवा बाबा ) मुलाची जबाबदारी घ्यावी .
मोठी मुले असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात .
साधा घरचा ताजा सकस पचायला हलका असा आहार घ्यावा .
पाण्याचे प्रमाण मात्र भरपूर वाढवावे ,त्यात लिंबू सरबत ,कोकम सरबत ,ताक ,लस्सी ,फळांचे ज्यूस देण्यास हरकत नाही .
बाळ जर आईचे दूध पीत असेल तर आई ने मास्क घालून आणि कोविड संबंधी सर्व काळजी घेऊन आपल्या बाळाला स्तनपान करावे ,ते बंद करण्याची गरज नाही .

Qurantine असतांना मुलांनी आराम करावा ,ताप उतरल्यानंतर ,व 3 दिवस सालग ताप परत आला नाही तर घरातल्या घरात थोडे शाळेत PT मध्ये करतात तसे व्यायाम करायला सांगावे ,पण उगाच दमू नये .

मुलांशी सतत बोलणे ही चालू ठेवावे ,त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेत रहावा .

90 ते 95 टक्के मुले छान पैकी घरी राहून बरी होतात , त्यासाठी पालक ,डॉक्टर ह्यांचे एकमेकांमधील सामंजस्य महत्वाचे आहे .

दुर्दैवाने जर हॉस्पिटल ची गरज पडली तर आपण खूप लवकर त्यांना ओळखू शकू ,जर आपण पहिल्या दिवसापासून 5 गोष्टीचा तक्ता आपण ठेवला असेल तर 👍 त्यामुळे घाबरून न जाता आपण सतर्क राहणे गरजे चे आहे .आपले डॉक्टर आपल्याला वेळोवेळी मदत करतीलच , पण आपण ही त्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे जर घरी मूल कोविड पोसिटीव्ह असेल तर !

सतर्क राहू सुरक्षित राहु 😊😊

Address - 1. Tapdiya Clinic , In front of Sambhaji Nagar Auto Stop, Mahabal, Jalgaon 425001.
2. Tap

03/01/2021

👉🏻 कोरोना वॅक्सिनसाठी आलेला फोन उचलू नका.. रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमचा आधार कार्ड नंबर मागणार... नंतर सांगणार ओटीपी दिला की तुमचे नाव रजिस्टर होईल. पण चुकूनही अजिबात माहिती सांगू नका. नाहीतर तुमचे बँक बॅलन्स खाली झाले म्हणून समजा....!
सावध राहा आणि काळजी घ्या...!🙏
🙏आपला हितचिंतक🙏

04/10/2020

कोरोना रुग्णांच्या संख्येतील अचानक घट ही आपल्या सर्वांच्या प्रयत्नांव्यतिरिक्त वाढत्या तापमानामुळेही आहे.
गाफिल राहू नये.दिवाळी नंतर थंडीमधे दरवर्षी येणारे सर्दीतापाचे आजार कोरोनाला पुन्हा आपल्यात संक्रमित करतील.त्यामुळे आता खरं मास्कच्या वापराचे व स्वच्छतेचे महत्व अधिक आहे.
चांगल्या सवयी सोडू नये !!!!

आज जळगाव चे पालकमंत्री श्री. गुलाबराव जी पाटील यांच्या सोबत जळगाव जिल्हा कोरोना संदर्भात चर्चा केली. जळगाव मृत्यू दर कसा...
24/06/2020

आज जळगाव चे पालकमंत्री श्री. गुलाबराव जी पाटील यांच्या सोबत जळगाव जिल्हा कोरोना संदर्भात चर्चा केली. जळगाव मृत्यू दर कसा कमी करता येईल तसेच आयुर्वेदिक औषधींचा उपयोग जास्तीत जास्त करावा या संदर्भात सगळी माहिती दिली
👇👇👇👇👇

🦠🦠...कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती...🦠🦠_हा मेसेज तयार करण्यास 5 दिवस लागले आहेत. विनंती करतो कृपया पूर्ण वाचा आण...
24/03/2020

🦠🦠...कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती...🦠🦠

_हा मेसेज तयार करण्यास 5 दिवस लागले आहेत. विनंती करतो कृपया पूर्ण वाचा आणि इतरांना सांगा.🙏🙏🙏🙏 _

*प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?*

उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते. 🤴

*प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?*

उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2). novel म्हणजे नवीन.
या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.

*प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे झाला?*

उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे.

*प्रश्न 4. हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?*

उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा विषाणू पसरू शकतो. थंड असो अथवा उष्ण (भारतात सुद्धा).

*प्रश्न 5. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहील का?*

उत्तर = या विषाणूला मारण्यासाठी 55° C पेक्षा जास्त तापमान लागते. भारतातील आत्तापर्यंतचे कमाल तापमान 51°C (फालोडी,राजस्थान-2016) आहे.म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका. उलट हवेची आर्द्रता(Humidity) कमी झाल्यामुळे हा वेगाने संक्रमित होवू शकतो.

*प्रश्न 6. हा आजार कोणत्या व्यक्तींना होवू शकतो?*

उत्तर = सर्वच. पण विशेषतः लहान मुलांना (10 वर्षाच्या आतील) व वयस्क व्यक्तींना (60 वर्षाच्या वरील) होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे व्यक्ति अगोदरच आजारी आहेत अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तरुण व ताकदवान असलात तरीही याची बाधा तुम्हाला होऊ शकते आणि तुम्ही तो घरात पसरवू शकता.

*प्रश्न 7. दारु पिणाऱ्या लोकांना हा आजार होत नाही का?*

उत्तर = दारूने (Ethyl alcohol/Isopropyl alcohol) हा विषाणू मरतो पण जर ती 70% असेल तर. पण पिण्याची दारू ही 8 ते 40 % असते, त्यामुळे ही अफवा देखील चुकीची आहे.उलट दारू पिनाऱ्यांची रोगपरतिकारकशक्ती कमी होते आणि ते सहज आजारी पडू शकतात.

*प्रश्न 8. मांसाहार करणार्‍या व्यक्तींना हा आजार होतो का?*

उत्तर = जर जेवण करण्यापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले आणि मांस अथवा अंडी स्वच्छ धुऊन व्यवस्थित उकडून घेतले तर हा विषाणू मरतो. (पण किमान 15 दिवस मांसाहार टाळलेला बरा)

*प्रश्न 9. या आजाराची लक्षणे काय आहेत?*

उत्तर = 1. ताप
2. सर्दी
3. श्वास घेताना अडचण होणे
4. थकवा
5. कोरडा खोकला

*प्रश्न 10. लक्षण दिसण्यास किती दिवस लागतात?*

उत्तर = 2 ते 16 दिवस. पण काही जणांमधे तर लक्षणच दिसत नाहित(Asymptomatic Patients). त्यामुळेच तर हा आजार इतका विचित्र आहे, कोणाला झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे. त्या व्यक्तीची चाचणी केल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते.लक्षण दिसण्या अगोदरच तो व्यक्ती व्हायरस पसरवतो(Carrier). म्हणुन तर वैज्ञानिक सांगत आहेत की एकमेकांपासून दुर रहा.

*प्रश्न 11. माझ्यात जर लक्षणे जाणवली तर ?*

उत्तर = काळजी करू नका. अगोदर डॉक्टर ला कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या,तुमच्या प्रकृतीनुसार ते टेस्ट करायची की नाही हे ठरवतील.

*प्रश्न 12. हा आजार कसा पसरतो?*

उत्तर = जो व्यक्ती आजारी आहे अश्या व्यक्ती जवळ गेल्यास, त्याने बोलल्यास, खोकल्यास,शिंकल्यास त्यातून बाहेर पडणार्‍या द्रवबिंदू (droplet) मधून पसरतो. नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की कोरोणा ग्रस्त व्यक्ती त्याच्या बोलण्यातून देखील (aerosol) हा विषाणू पसरवू शकतो.

*प्रश्न 13. कारोणा बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकतो?*

उत्तर = या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0) हा 2.7 आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर 2 ते 3 जणांना बाधित करू शकतो.

*प्रश्न. 14. कोरोना झाल्यास व्यक्ती मरतो का?*

उत्तर = जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार 100 % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे(recover) होताना दिसत आहेत.

*प्रश्न 15. हा विषाणू किती वेळ जिवंत राहतो?*

उत्तर = या विषाणूचा जीवनकाळ खालील प्रमाणे आहे
1. हवा = 3 तास
2. तांबे = 4 तास
3. कागद (नोटा,वह्या,पुस्तक) = 1 दिवस
4. स्टील = 2 ते 3 दिवस
5. प्लास्टिक(मोबाईल,कॉम्प्युटर,पेन,कीबोर्ड)=3ते4 दिवस

*प्रश्न 16. या आजारावर कोणते औषध किंवा लस नाही का?*

उत्तर. सध्यातरी कोणतीच लस(Vaccine) उपलब्ध नाही.लस तयार होण्यास व उपलब्ध होण्यास किमान एक ते दीड वर्ष लागू शकतात. हा विषाणू स्वतःचा आकार बदलू शकतो(Mutation) म्हणून लस शोधणे अवघड आणि किचकट काम आहे. आणि आत्तापर्यंत तरी कोणतेच औषध यावर नाही.

*प्रश्न 17. गोमूत्र,लसूण,काळी मिरची,लवंग काम करते का ?*

उत्तर. वरील वस्तू या आरोग्यासाठी हितकर असतात.पण यापैकी कोणतीच वस्तू कोरोना विषाणूला मारत नाही. यावर कोणतेच संशोधन झाले नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.

*प्रश्न 18.Social Distancing म्हणजे काय?याचा काय उपयोग ?*

उत्तर = Social distancing (सामाजिक अंतरता) म्हणजे एकमेकांपासून किमान 5 ते 6 फूट अंतरावर राहणे जेणेकरून आपण आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत आणि आपण जर आजारी असलात तर इतरांना संक्रमित करणार नाहीत.
जर असे आपण किमान 2 ते 3 हफ्ते केलात(जे इटलीने किंवा चीनने केले नाही) तर आपण रुग्णांची संख्या कमी करू शकतो(Flattening the curve) व आपल्या दवाखान्यातील क्षमता अगोदरच कमी आहे त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था देखील सुरळीत राहील.

*प्रश्न 19. मी कसे सुरक्षित राहू ? प्रतिबंध काय ?*

उत्तर. = तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी खालील प्रतिबंध करू शकता

1.वारंवार हात धुणे.(किमान 30 सेकंद) दर 2 ते 3 तास.
बाहेरून आल्यास सर्वात अगोदर हात-पाय धुवा.
2.तोंडाला,नाकाला,डोळ्याला न धुतलेले हात न लावणे
3.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
4. अनोळखी व्यक्तिंपासून सुरक्षित अंतर बाळगा.
5. खोकलनाऱ्या,शिकणाऱ्या व्यक्तींपासून दुर रहा.
6. वारंवार वापरातल्या वस्तूंना स्वच्छ पुसून घ्या.

*प्रश्न 20. हात कश्याने व कसे धुवावेत ?*

उत्तर = हात साबणाने किंवा हॅण्डवॉशने स्वच्छ धुवावेत. किमान 30 सेकंद तरी हात धुवावेत (100 % रोगाणू मरतात).हात धुण्याची वैज्ञानिक पद्धत खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

https://youtu.be/IisgnbMfKvI

*प्रश्न 21. फेस मास्क वापरावेत का ?*

उत्तर = योग्य पद्धतीने वापरले तर काहीच हरकत नाही. पण नाक किंवा तोंड कुठून उघडे आहे का ? याची काळजी घ्यावी. रुमाल देखील चालतो पण तो रोज किमान दोनदा धुवा.

*प्रश्न 22. प्रवास करावा की नाही ?*

उत्तर = नाही अजिबात नाही............कितीही अडचण असेल (दवाखाना व्यतिरिक्त) तरी प्रवास टाळा. आपण स्वतः तर बळी पडताल आणि सोबत इतरांना देखील घेऊन जाताल.

*प्रश्न 23. जनता कर्फ्यु ने खरंच कोरोना व्हायरस मरेल का ?*

उत्तर = काही प्रमाणात. पण जेंव्हा लोकं एकत्र येतील तेंव्हा हा पुन्हा वाढेल म्हणून आपले सर्वच कामे (जिवापेक्षा कमीच महत्वाची) टाळावी.उगाच मला काही होणार नाही म्हणून बाहेर पडून इतरांचा जीव धोक्यात घालू नका. कृपा करून सरकारला त्यांचे काम करुद्या.

*प्रश्न 24. खरा कर्फ्यु लागण्याच्या अगोदर सर्व आवश्यक वस्तू जमा कराव्यात का ?*

उत्तर = नाही. कितीही झाले तरी आवश्यक दुकानं बंद होणार नाहीत(उदा. किराणा,मेडिकल,दवाखाना).म्हणून उगीच घाई करू नका आणि वस्तूंची जमवा जमवी करू नये.

🙏🙏 *लक्षात ठेवा : प्रतिबंध हाच उपाय* 🙏🙏

Proper hand hygiene is the most important thing you can do to prevent the spread of germs and to protect yourself and others from illnesses. When not done ca...

20/03/2020

*महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा*

1)दुधाची पिशवी हातात घेतली की लगेच धुवा आणि लगेच आपले हातसुद्धा.

2)वर्तमान पत्र शक्यतो बंद ठेवा. त्यावरसुद्धा इन्फेकशन असू शकते.

3)कुरियर साठी ट्रे ठेवा. लगेच हात न लावता 24 तासानंतर लावा.

4)कामवाली बाई ला सूचना द्या की मुख्य दरवाजा च्या हॅन्डल ला हात लावू नका. घरात येताच त्यांना हात स्वच्छ धुवायला सांगा.

5)डोअरबेल चं बटण स्वच्छ पुसून काढा.

6)स्विगी, ऍमेझॉन इ.कडून ऑर्डर करणे बंद करा.

7)सर्व भाज्या, फळं स्वच्छ धुवून घ्या.

8)रिमोट कंट्रोल, फोन, कीबोर्ड चाव्या हे सगळ्यात जास्त दूषित असतात. दिवसातून कमीत कमी एकदा स्वच्छ पुसा.

9)घरी किंवा ऑफिस प्रत्येक तासात किमान एकदा हात धुवा.
10)सार्वजनिक वाहतुकीची साधनं शक्यतो टाळा. अपरिहार्य असल्यास आपलीच गाडी वापरा.

11)जिम, तरणतलाव आणि गर्दीची ठिकाणं, जिथे स्पर्श केल्याने इन्फेकशन होण्याची शक्यता जास्त, अशा ठिकाणी जाणं टाळा.

12)ट्युशन, डान्स, म्युझिक, कराटे क्लास बंद ठेवा.

13)ऑफिस किंवा बाहेरून घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावे आणि अंगावरील कपडे पुन्हा धुवूनच वापरावे.

14)आपल्या किंवा कोणाच्याही चेहऱ्यावर हात फिरवू नये. हे लहान मुलांना आणि आजी आजोबांना सांगा.

15)ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडणे पूर्णपणे बंद करावे.

16)सार्वजनिक ठिकाणी दरवाजे, जिने, टेबलं खुर्च्या, विजेची बटणं इ. ना शक्यतो स्पर्श करूच नये. तोंडावर हात न ठेवता शिंकणाऱ्यांना *स्पष्ट बोला* आणि आपणसुद्धा तसें वागू नका.

17)हात मिळवणे पूर्ण बंद. कोणाचाही मोबाईल हातात घेऊ नये.

🙏

19/03/2020

डॉक्टरांवर हल्ले करून सुद्दा तितक्याच आत्मीयतेने सेवा करत आहे ....करत राहणार शेवटी #समाजभान

19/03/2020

#कोरोनाचे_अती_गंभीर_सावट
१ ली स्टेज,२ री स्टेज, ३ री स्टेज आणि ४ थी स्टेज म्हणजे काय.

कोरोनाचे अती गंभीर सावट आपल्या देशावर आले आहे. आपली 137 कोटी लोकसंख्या आहे. कमी लोकसंख्या व श्रीमंत देशांनी सुद्धा हात टेकले आहेत.
इटलीने कर्फ्यु लावण्यात खुप उशीर केला. 80 चे वर रुग्ण सोडून दिलेत. ज्या प्रमाणे चीनने केले ते इटलीने केले नाही. म्हणून इतके बळी नाहक गेलेत.
चीन नंतर इटली व इतर युरोपियन देश, इराण आता याच्या विळख्यात आहेत.
इटली मध्ये सध्या यातील ३ री स्टेज आहे, तर अमेरिकेत २ री स्टेज आहे. या स्टेजेस अशा की,
ी_स्टेज - बाहेरून लागण होऊन केसेस येतात
ी_स्टेज - स्थानिक लागण सुरू होते
ी_स्टेज - कम्युनिटी (समाजात) लागण
ी_स्टेज - संपूर्ण साथ

आता भारतात बघू या: भारतात आपण १ ल्या स्टेज मधून २ ऱ्या स्टेज मध्ये जात आहोत. ३ री स्टेज म्हणजे महाभयंकर अशी साथ पसरणे. (भारत सरकारचा प्रयत्न आहे की २ -या स्टेजलाच प्रसार थांबला पाहिजे.)
परंतु बेशिस्त भारतीय नागरिक साथ देत नाहीत.

चीनने जगाला दाखवून दिले आहे की हा आजार फक्त आणि फक्त कर्फ्यु लावला तरच रोखला जाऊ शकतो. भारतात काय चालू आहे ? अजूनही सर्व शहरे सुरू आहेत, येणे जाणे, दळणवळण चालू आहे. ज्यांना लागण झाली आहेत असले पेशंट हॉस्पिटल मधून पळून जात आहेत आणि मग इतरांना त्याची लागण करीत आहेत. आपण अजूनही भेटीगाठी, समारंभ, जयंत्या, सोहळे साजरे करणे सोडलेले नाहीत.
लक्षात घ्या ही #राष्ट्रीय_आपत्ती आहे. देशाच्या व तुमच्या भविष्याचा विषय आहे. कृपया हे पण समजून घ्या की लसूण, कापूर, तपकीर, गोमूत्र,याने हे विषाणू नष्ट होत नाहीत. ह्या विषाणूला जास्त तापमानात सुध्दा काहीच होत नाही *दुबई, सौदी अरेबिया मधून लागण होऊन लोक आपल्याकडे आले आहेत. तिथे काय कमी तापमान आहे ?* आणि इतर अफवा ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. स्वतःची योग्य काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. बाहेर न फिरणे हाच एकमेव उपाय आहे.
*सुट्ट्या जाहीर केल्या याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसणे अपेक्षित आहे.* *भारतासाठी पुढील ३०-४५ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. युद्धाचा प्रसंग आहे हा.* घरातच थांबून रहा. हात धुणे, तोंडाला रुमाल बांधणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे नाही. *सरकार व जागतिक आरोग्य संघटना सांगेल ते पाळणे. तुम्हाला किंवा कोणाला लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टर चे निदर्शनास आणून द्या.* स्वत:ला घरी किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये अलगी करण / विलगी करण कक्षात दाखल व्हा.
हे गंभीर संकट आहार तरी काळजीपूर्वक वागा व हा मेसेज सर्वा पर्यन्त पोहचवा .तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात हे लक्षात घ्या.

डॉ. गोविंद अनिल तापडिया (जळगाव)

17/03/2020

Please have a safe mode for next few days, avoid going public places, cover mouth and nose while traveling 🙏🏻

Address

Jalgaon
425001

Telephone

+919422777756

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tapdiya Clinic - Nursing Home Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Tapdiya Clinic - Nursing Home Jalgaon:

Share

Nearby clinics