07/05/2023
#कौटुंबिक_सहवास_हुकुनही_गंभीर_रूग्णाचे_आरोग्यरक्षण_हा_आनंददायी_अनुभूति देणारा, #व्यावसायिकदृष्ट्या_उन्नत करणारा अनुभव ठरला.
काल रात्री आई-बापूंना भेटायला गावी गेलो.रात्री गप्पा मारता मारता उशिरा झोपलो.सकाळी हॅास्पिटलमधुन असिस्टंट डॅाक्टरांच्या फोनने झोप उघडली.
एक आदिवासी भिल्ल समुदायाची भगिनी,आठव्या महिन्याच्या जुळ्या गर्भारणासह एकमेव जुन्या रिपोर्टसहित रक्तस्त्राव व पोटदूखीच्या तक्रारीसह दाखल झालीय,रक्तात प्रमाण फार कमी वाटत असा असिस्टंट डॅा चा फोनवर निरोप होता.
सहकारी प्रसुतितज्ञांना असिस्टंटने बोलावून रूग्ण तपासणी केल्यावर त्यांचाही अभिप्राय टेंशन वाढवणारा होता.प्रसुति थांबणे अशक्य वाटत असुन,एका बाळाचे ह्दयाचे ठोके ऐकू नसुन पेंशंटचे रक्ताचे प्रमाण फार कमी वाटते.एकंदरीत रूग्ण गंभीर स्थितीत होता.
अनेक गुंतागुंत,अडचणी एकत्र आल्याने रूग्णाची तब्येत गंभीर आहे,जीवाला धोका आहे म्हणून शासकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला तर ते जाण्यास तयार नव्हते.”जे काही होईल ते होवू द्या पण इथेच प्रयत्न करा,आमचा तुमच्यावर विश्वास आहे,डॅाक्टरांना सांगा.”
तासभर हे सुरू असतांना
बापू-आईंसोबत रविवार निवांत गावाकडे घालवण्याच्या प्लॅन धोक्यात आलेला वाटत होता.
आई म्हटली लवकर जेवण तयार करते,जेवून निघ.मी म्हटलो,पेशंट अशा स्थितीत आहे कि २-३ तास विलंब घातक ठरू शकतो.मग बापू म्हटले,”चहा घे अन् तातडीने निघ..आमच्यापेक्षा त्या रूग्णाला तुझी जास्त आवश्यकता आहे.”
पटकन आंघोळही न करता निघालो,दिड तासात पोहोचलो.पेशंट तपासला.जुळ्यांपैकी एक बाळ पोटातच वारल होत,गर्भाशयात वार सुटून आतच मोठा रक्तस्त्राव झालेला वाटत होता,रक्तदाब वाढलेला होता,रूग्णाचे डोळे फिके दिसत होते ,बाह्यरक्तस्त्राव ही सुरू होता.(Diagnosis-Primi:Twins with First IUFD,Second Breech-32weeks-PIH-Abruptio placenta-Severe Anaemia) पुन्हा नातेवाईकांना रूग्णांची तब्येत गंभीर असुन पहिल मृत बाळ सरळ तर दुसर बाळ पायाळू आहे,रक्त द्याव लागेल,कोणत्याही परिणामांना तयार रहा,प्रयत्न शर्थीने करू म्हणत कामाला लागलो.
उपचार सुरू होते,हिमोग्लोबीन ६% असल्याचा रिपोर्ट आला,रक्ताच्या पिशव्या ही #गोळवलकर_रक्तपेढीद्वारा तात्काळ हॅास्पिटलला पोहोच मिळाल्या.दोन सहकार्यांना मदतीसाठी पूर्व कल्पना दिली.
दोन तासानंतर पहिल मृत बाळ नैसर्गिक प्रसुति मार्गाद्वारे जन्मल.२०-२५ मिनीटांच्या प्रतिक्षेने दुसर पायाळू बाळही जन्मल,रक्त देण सुरू होत..औषधेपचारास अपेक्षेप्रमाणे रूग्ण प्रतिसाद देत होती..दोन्हीही वारं,त्याखालच्या साधारणत: ४५० ग्रॅम रक्ताच्या गुठळ्यांसह बाहेर आल्या होत्या ,रक्तस्त्राव नियंत्रणात वाटत होता.जगण्यासाठी धडपडणार्या,कन्हणार्या बाळास नवजात अतिदक्षता विभागात शिफ्ट केले…दोन रक्ताच्या बॅग दिल्यावर रूग्ण स्थिराल्यासारखी वाटत होते.
डॅाक्टरांच्या आयुष्यात #कुटूंब_कि_रूग्ण,निवांतपणा कि धावपळ-स्ट्रेस…असे परिक्षेचे क्षण अनेकदा येत असतात. #सर्वच_डॅाक्टर_रूग्णाच्या_आरोग्यरक्षणास_प्राधान्य देत असतात अस मी मानतो.
आईच्या हातच आवडत जेवण सुटल होत,रविवार बापूंसोबत गप्पा मारत,गावाकडे शेतात घालवण्याचा मानस कोलमडला होता .पण धावपळ करून रूग्णाच्या नातेवाईकांच विश्वासपात्र होत केलेल आरोग्यरक्षण यातून मिळालेल समाधानही त्या सर्व भावनांवर भारी पडलेल जाणवत होत..
सकाळी ५ ते १२ वाजेपर्यंतच्या या घडामोडीत कुटूंब,गाव,घर आदिंचा विसर पडून सारा क्षीण नाहीसा झालेला होता.साडे १२ वाजता मग भूक जाणवत होती.
रूग्णसेवेद्वारे अशा गंभीर रूग्णाच्या यशस्वी उपचारातून मिळणार्या समाधानाच ,आनंदाच,कर्तव्यपूर्तीच मोल ,मोजदाद कशानेही होवू शकत नाही हे मात्र खरं!!
धन्यवाद.
डॅा राधेश्याम चौधरी,
सृष्टी हॅास्पिटल,जळगाव.