18/12/2022
*फो रप्ले म्हणजे काय ? हे करणे किती महत्वाचे असते ?…यामुळे कोणते फायदे होतात? जोडप्यांनी एकदा नक्की वाचा*
नमस्कार मित्रांनो.काम जीवन हा अनुभव प्रत्येक सजीवासाठी खूप खास असतो. विशेषतः लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा आपल्या जोडीदारासोबत काम क्रीडा करत असाल तर तुम्हाला एकमेकांविषयी त्यांच्या भावनांविषयी जाणून घेणे खूप गरजेचे आहे, नाहीतर आपल्या जोडीदाराची इच्छा नसताना सुद्धा काम क्रीडा केल्यास कदाचित त्या जोडीदाराची निराशा होऊ शकते.
तर आपल्याला माहित असेल कि काम क्रीडा करताना महिलांच्या तुलनेत पुरुष खूप लवकर उत्तेजित होतात. मात्र महिलांना उत्तेजित होण्यास थोडा वेळ लागतो. अशा वेळी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिचा आदर ठेवून तिच्या मनाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे तिच्याशी काम क्रीडा करावी.
अशावेळी पुरुषाने अतिघाई न करता योग्य त्या पद्धतीने महिलांना उत्तेजित केल्यास त्यांनाही काम क्रीडे चा आनंद घेता येतो. अशा वेळी कामी येते ते म्हणजे फॉरप्ले…आता आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे हेच अनेकींना माहिती नसतं किंवा त्याबाबात बोलण्याचा संकोच असतो.
आणि त्यातून मग असमाधान, नात्यातले ताण आणि अनेकदा आजार असेही चक्र सुरु होते. सुखी लैगिंक जीवनासाठी फोरप्ले का आवश्यक असतो? चावट चर्चेपलिकडे त्याची शरीर सुखात काय भूमिका असते?
फोरप्लेम्हणजे काय? – काम क्रीडा किंवा तत्पूर्वीची शारीरिक जवळीक यासाठी दोन्ही जोडीदारांची संमती आहे का हे सर्वात महत्त्वाचे असते, एकाची इच्छा दुसऱ्याची बळजबरी असं होता कामा नये. दोघांनाही तेव्हढीच ओढ वाटते का याचा विचार करायला हवा. त्या सोबतच लैंगिकज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास पूरक ठरतात.
फोरप्लेही काम क्रीडेची सुरुवात असते. जसं की कोणताही खेळ सुरू करण्यापूर्वी वॉर्म अप करणे खूप महत्त्वाचे असते. तसे काम क्रीडा यासंदर्भातही फोरप्लेहा त्याआधी वॉर्मअप आहे.
यासाठी चुंबन करणे, अलीगनं करणे, हात फिरवणे असे अनेक भाग येतात. तसेच लैंगिक कृतीबाबतची आपल्या समाजात अनेकांची समज खूपच यांत्रिक आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की काम क्रीडा म्हणजे पेनिट्रेशन.
याउलट नात्यात शारीरिक ओढ, शरीर सुखासाठी दोघांची तयारी, जवळीक अर्थात फोरप्ले जोडल्याने तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे संबंध अधिक दृढ होऊन, हार्मोन्सट्रिगर होऊन जवळ येण्यास मदत होऊ शकते. तर फोरप्लेमुळे काय होते? काम क्रीडाकरण्या आगोदर स्त्री आणि पुरुषाने किमान अर्धा तास फोरप्लेकरणे आवश्यक असते. त्यामुळे स्त्री अधिक उत्तेजित होते आणि योनीभागामध्ये एक प्रकारचा चिकटस्त्राव निर्माण होतो.
यामुळे महिलांना काम सुखासाठी हा फोरप्ले महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यासाठी काम क्रीडेच्या कृतीपेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे. जर फोरप्लेमध्ये जास्त वेळ दिला नाही तर महिलेच्या खाजगी भागामध्ये ओलसरपणा येत नाही आणि अशावेळी महिलेला काम क्रीडेवेळी वेदना होतात. कधी कधी त्याला कामोत्तेजनाचा अनुभवही येत नाही. म्हणूनच फोरप्लेसाठी जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे.
फोरप्ले का महत्वाचा असतो ?- स्त्रियांसाठी फोरप्ले जास्त महत्त्वाचा असतो कारण त्यांच्या चेतनाना वाव मिळून सुखाच्या भावनेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची आवश्यकता असते. अनेकदा पुरुषांना संबंधाबाबत काही ऐकले तरी त्यांच्या मनात भावना चेतावतात. पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र केवळ हा विचार पुरेसा नसतो तर त्यांना प्रत्यक्ष कृती केल्यावर त्यातून आनंद मिळतो.
फोरप्लेमुळे मन आणि शरीर हे दोन्ही शारीरिक संबंधसाठी तयार करण्याची पहिली पायरी आहे. हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे .प्रत्यक्ष काम क्रीडा जितकी महत्त्वाची आहे तितकाच किंवा त्याहूनही अधिक फोरप्ले महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवायला हवे.
फोरप्ले हा स्त्रियांना उत्तेजित करण्यासाठी, कामक्रीडे ला तयार होण्यासाठी महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे योग्य पद्धतीने फोरप्ले केल्यानंतर स्त्री काम क्रीडेसाठी पूर्णपणे तयार होते आणि पुरेसा आनंद देऊ आणि घेऊ शकते. यासाठी चुंबन, अलिंगन, कुरवाळणे अशा गोष्टींची स्त्रियांना आवश्यकता असते.
पुरुषांपेक्षा स्त्रियांना भावनिक हमी आणि खात्री हवी असते. ज्या व्यक्तीसोबत ती शारी रिकसंबंध करणार आहे त्या व्यक्तीला त्या स्त्री सोबत राहण्यास रस आहे हाच संदेश फोरप्ले करण्यातून स्त्रीला मिळतो. त्यामुळे त्या अर्थानेही फोरप्लेला विशेष महत्त्व आहे .
भारतातील 70 टक्के स्त्रियांना शारीरिक संबंधातील आनंद म्हणजे काय हे समजत नाही. मात्र स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यासाठी हे चांगले नाही. त्यामुळे याबाबत आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद असणे.
आपल्या आनंदाच्या जागांबाबत जोडीदाराला माहिती देणे गरजेचे असते. त्यामध्ये काहीही गैर नाही. शारीरिक संबंधांना फोरप्ले ची जोड असेल तर ही क्रिया स्त्रियांसाठी आणि पर्यायाने पुरुषांसाठी अधिक आनंदाची आणि समाधान देणारी ठरू शकते.
Thank you