06/07/2018
व्यवसाय हा कोणत्या लबाड घरचा उद्योग नाही ज्याला कुणीही येऊन "काय शेठ किती माल छापलात "असे म्हणावे....!तो नफा मिळवण्यासाठी न जाणो त्याला काय सहन करावे लागत असेल त्याचे त्यालाच ठाऊक...?
घरी कुणी आजारी आहे तरी दुकानावर..! कुणी ऍडमिट आहे तरी दुकानावर....!लग्न सोहळे बस्ते पूजा अर्चा काही काही नाही त्याच्या वाट्याला...!महाभारतातल्या दानशूर करणा सारखं सुख दान करून आपल्या आयुष्याची गाडी ओढण्यासाठी त्याला उभं रहावंच लागतं...!कित्येक छोटे मोठे दुकानदार पाहिलेत कुणी स्वतः च्या जागेत कुणी भाड्याने कुणी रस्त्यावर कुणी फिरती विक्री करत हा व्यवसाय करत असत...!एक आहे ह्या व्यवसायात जोवर नीतिमत्ता आहे तोवर याला मरण नाही...!कुणीही यावं या दुकानात गेलो होतो तिथं तुमच्यापेक्षा स्वस्त आहे असं म्हणावं याला काय अर्थ आहे असे लोक असं म्हणतात कारण हे ज्या दुकानात जाऊन आले तिथून त्यांना पिटाळून लावलेलं असतं पण हे आपल्या ध्यानात येत नाही आपण बळी पडतो आणि रेट तोडून मोकळे होतो...!माझा हाच प्रश्न आहे का तोडावा रेट..?का करावी कमी पैशात विक्री...?का हिरावून घ्यावा आपल्याच घरातल्या लहान लेकरा बाळांच्या तोंडचा घास..?माझ्या सुजाण ज्येष्ठ व्यापारी बांधवांनो काही चुकले असेल तर माफ करा पण रेट तोडून व्यवसाय करू नका...!मी वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही काही निरव मोदी मल्ल्या सारखं माल छापत नाही आहात तर तुमचाच हक्काचा पैसा सनदशीर मार्गाने कमवत आहात...! उद्या जर धंदा स्लॅक चालला तर तुम्हाला कुणी 7 वा आयोग लागू करणार नाही आजारी पडून दुकान बंद राहिले तर भत्ते देणार नाही..
शेवटी विचार तुमचा कार्य तुमचे....!!
एकच लक्षात ठेवा
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार....!!!