
20/02/2024
माझे सहयोगी मित्र #डॉ_सुयोग_चौधरी यांच्या नवीन वास्तुमध्ये स्थलांतरित झालेल्या #मंगलमूर्ती_हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने उपस्थिती दिली.
जळगाव शहरामध्ये अनेक निष्णात तज्ञ डॉक्टर माझे मित्र आहेत त्यापैकीच एक डॉ. सुयोग चौधरी हे आहेत.
रुग्णाला बरे होण्यासाठी सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल व उत्तम ज्ञानाच्या आधारावर चांगल्या उपचारांची आवश्यकता असते. त्याच्याबरोबरच सर्वाधिक आवश्यकता असते शांत, संयमी, मितभाषी व दयाळू स्वभावाच्या डॉक्टरांची.
एक निष्णात डॉक्टर म्हणून सर्व गुण संपन्न असलेले माझे मित्र डॉ.सुयोग चौधरी यांनी शून्यातून विश्व निर्माण करून स्वप्नवत साकार केलेल्या अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी भेट देऊन भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Prashant Patil Prashant Bhimrao Patil