24/07/2017
👉 _*जेनेरिक औषधे एवढी स्वस्त का?*_
सद्यस्थितीत जेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या तुलनेत अवघी 10 ते 12 टक्केच विकली जातात. कारण जेनेरिक औषधांमुळे मिळणारा कमी नफा आणि कमिशन यांमुळे औषध कंपन्या, मेडिकल स्टोअर आणि डॉक्टर यांपैकी कोणालाच जेनेरिक औषधांची मागणी वाढावी असे वाटत नाही.
तसं पहायला गेलं तर आज बाजारात जवळपास सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी असून गरीब माणूस देखील ही औषधे सहज विकत घेऊ शकतो. डॉक्टर्सने जेनेरिक औषधे लिहून दिली असतील तरी सुद्धा मेडिकल स्टोर्स रुग्णाला दुसऱ्या महागड्या कंपनीची औषधे देतात. का तर केवळ जास्त फायदा मिळण्यासाठी. म्हणून आज जेनेरिक औषधांविषयी सविस्तर जाणून घेऊयात...
👉 _*जेनेरिक औषधे कशाला म्हणतात?*_
जेनेरिक औषधांना ‘इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन’ देखील म्हटले जाते. ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधांसारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘एसेंशियल ड्रग’लिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात. ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.
👉 _*जेनेरिक औषधे स्वस्त का?*_
ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते. तुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्याच स्लॉट मधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात. महाग औषधे आणि त्याच स्लॉट मधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी 5 ते 10 पट अंतर असते. काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये 90% फरक असतो.
जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते. जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा होते व या औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या औषधांची जाहिरात करत नाहीत, त्यामुळे जेनेरिक औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात.
👉 _*कोणत्या आजारांची जेनेरिक औषधे स्वस्त?*_
काही खास आजार आहेत ज्यांची जेनेरिक औषधे उपलब्ध असतात परंतु त्याच स्लॉटची ब्रँडेड औषधे महाग असतात. जसे - न्युरोलोजी, युरीन, हार्ट डिजीस, किडनी, डायबिटीज, बर्न प्रोब्लेम, या आजारांच्या जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमध्ये खूप जास्त अंतर दिसून येते. एकाच स्लॉटच्या दोन औषधांच्या किंमतीमधील मोठा फरकच जेनेरिक औषधांचा पुरावा आहे.
👉 _*जेनेरिक औषधे कशी प्राप्त करू शकता?*_
जेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोअर्सवर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा.
☺☺☺☺