23/08/2025
लहानपणीची गोष्ट..
आमचे लहानपणी टी.व्ही. नव्हते.
वर्तमानपत्र ही मोजकीच होती.रेडिओ मात्र होता.
मराठवाडातील अग्रलेख आवर्जून वाचावे वाटायचे,तसेच श्री. ग.वा.बेहरेंचे एक 'सोबत'नावाचे साप्ताहिक होते.त्याची व 'मार्मिक' या साप्ताहिकाची आम्ही वाट बघत असू.
तेव्हा वर्तमानपत्रामधे नकारात्मक ता फार कमी आढळायची.
भडकपणा तर नव्हताच.
भाषा सुद्धा सांस्कृतिक वाटायची.
(अपवादात्मक काही राजकीय साप्ताहिके ही होती..ज्या खमंग भाषा दिसायची)
रेडिओ बाबत बोलायचे तर ठरलेल्या वेळी बातम्या ऐकायची सवय लागली होती.उठसूट त्याच त्याच बातम्या नसायच्या.
पांचट तर मुळीच नसायच्या.
करमणुकीबखबत सांगायचे तर दर बुधवारी रात्री आठ ते नऊ श्री अमीन सयानी यांच्या प्रास्ताविका सकट 'बिनाका गीतमाला'असायची.पुढे ती 'सिबाका गीत माला' झाली.
रेडिओ कानाजवळ ठेऊन क्रिकेट कामेंट्री ऐकायची मजा कुछ औरच होती.
क्षेत्ररक्षण कसे असते माहिती नव्हते ,
तरीही मिडऔन, मिडाफ,सिलीपाईंट असले शब्द ऐकताना धन्य वाटायचे..।
गेले ते दिवस....
डॉ. प्रताप जाधव