07/08/2025
जीवनदाता
उगाच या माणसाला "जालना जिल्ह्याचे हृदय" म्हटल्या जात नाही..
डॉक्टर साहेब सलाम तुमच्या कर्तुत्वाला आणि जिद्दीला 🙏
विसी मधला एक तरुण मुलगा छाती दुखल्याकारणाने कलावती हॉस्पिटल जालना येथे आला व डॉक्टर कृष्णा कोरडे यांच्या केबिनमध्ये असतानाच हृदय बंद होऊन कोसळला. नाव,गाव,पत्ता,नातेवाईक याचा काहीही विचार न करता डॉक्टर कृष्णा कोरडे व कलावती हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने शर्तीचे प्रयत्न करून त्याला जीवनदान दिले. मेजर हार्ट अटॅक मध्ये अचानक हृदय बंद पडते परंतु वेळेवर हृदयाला इलेक्ट्रिक शॉक, अँजिओग्राफी, एन्जोप्लास्टी अशा सर्व उपचार योग्य वेळेवर भेटल्यामुळे आज तो तरुण ठणठणीत होऊन घरी जात आहे. रुग्णाचे वय कमी असल्यामुळे त्यांची ओळख व फोटो दाखवला नाही.
तात्काळ मदत करण्याची तत्परता, उपचारादरम्यान दाखवलेला संयम, योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय आणि स्वतःच्या टीमवर असलेला विश्वास कोरडे सरांना अशा अनेक रुग्णांचा #जीवनदाता बनवून गेला.