11/12/2023
मित्रांनो , ज्यांना कोणताही सांध्याचा , हाडांच्या दुखण्याचा त्रास आहे , त्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो -
माझ्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालं आहे का ? डॉक्टर ही कॅल्शियम सप्लीमेंटस देतात , ती आपण वर्षानुवर्षे खात राहतो .
मग एकदा जाणून घ्यायला काय हरकत आहे की आपल्याला किती कॅल्शियम ची गरज आहे ? आपल्या शरीरात ते पुरेस आहे का ? त्यासाठी काय तपासण्या कराव्या लागतात ? कमतरता भरून काढायसाठी गोळ्या , इंजेक्शन हाच उपाय आहे का ? आपल्या जेवणामध्ये काय खाता येईल ज्यामुळे आपल्याला कॅल्शियम मिळेल ? मांसाहार केल्याशिवाय कॅल्शियम मिळणारंच नाही का ?
तर आपण या एकेका प्रश्नांचे उत्तरं शोधुया . पहिला प्रश्न मला किती कॅल्शियम ची गरज आहे ? तर उत्तर या चार्ट प्रमाणे पहा .
वय लिंग दररोज लागणारे कॅल्शियम
जन्मापासून सहा महिने पुरूष / स्त्री ४००मि ग्रॅ
६ महिने ते एक वर्ष पुरूष / स्त्री ६००मि ग्रॅ
१ वर्ष ते १० वर्ष पुरूष / स्त्री ८०० ते १२०० मि ग्रॅ
११ वर्ष ते २४ वर्ष पुरूष / स्त्री १२००- १५०० मि ग्रॅ
२५ ते ५० वर्ष पुरूष / स्त्री १००० मि ग्रॅ
५१ वर्ष आणि पुढे स्त्री १५०० मि ग्रॅ
५१ वर्ष ते ६४ वर्ष पुरूष १००० मि ग्रॅ
६५ वर्ष आणि पुढे पुरूष १५०० मि ग्रॅ
तर हे झालं रोज लागणारं कॅल्शियम च प्रमाण . आता माझ्या शरीरात ते कमी आहे की पुरेसं हे कसं शोधायचं ?
तर त्यासाठी रक्तातील कॅल्शियम ची तपासणी करतात . ८.६ ते १०.२ मि ग्रॅ दर शंभर मि ली हे योग्य प्रमाण आहे .
यापेक्षा कमी असेल तर ? लगेच गोळ्या सुरू कराव्या का ? अरे थांबा , आपल्या खाण्यामधून आपण काही कॅल्शियम वाढवू शकतो का हे पहा . ठीक आहे .
खाण्यातून कॅल्शियम मिळवण्यासाठी आपण प्रथम मांसाहारी खाद्य पदार्थ पाहू .
याचे प्रमाण १०० ग्रॅम खाल तर किती कॅल्शियम मिळेल असे आहे .
चिकन ३० मि ग्रॅ , मटन १५० मि ग्रॅ , झिंगा ( PRAWN ) ३२० मि ग्रॅ
बांगडा ( MACKEREL ) 430 मि ग्रॅ , रोहू ६५० मि ग्रॅ , अंडे ६० मि ग्रॅ
आता कांही लोक्स म्हणतील , अरे बापरे , हे काय आहे ? आम्ही तर मांसाहार करतंच नाही , तरी हे वाचायला , ऐकायला लावलं ? तर नका ताण घेऊ .
हे मांसाहारी पदार्थ झाले आता सर्व शाकाहारीचं आहे .
तर शाकाहारात काय असतं आपलं खाणं ? सकाळी नाष्टा , दुपारचं जेवण , रात्रीचं जेवण . आता यात काय करता येईल ते पाहू .
पोळी , भाकरी , भात , वरण - आपले मराठी पदार्थ . यात कशात किती कॅल्शियम असतं पाहू .
हे सर्व प्रमाण प्रती १०० ग्रॅ आहे हे लक्षात असू द्या .
बाजरी कॅल्शियम ५० मि ग्रॅ , रागी ३३० मि ग्रॅ , पुर्ण गहू ५० मि ग्रॅ ,
रिफाइंन्ड गहू २० मि ग्रॅ , तांदूळ १० ते २० मि ग्रॅ , सोयाबीन २४० मि ग्रॅ ,
दाळ १६० मि ग्रॅ , काळी दाळ २०० मि ग्रॅ
हे झालं पोळी , भाकरी , भात , वरण , ईडली , दोसा वगैरे बद्दल .
आता आपण भाज्या आणि फळं पाहू .
हे प्रमाण सुद्धा १०० ग्रॅम वापरल्यावर आहे .
तर
फुलगोबी कॅल्शियम १४० मि ग्रॅ , मेथी ४७० मि ग्रॅ ,
पालक ६० मि ग्रॅ , भेंडी ९० मि ग्रॅ , बीट २०० मि ग्रॅ ,
पत्ता गोबी ८० मि ग्रॅ , अंजीर ६० मि ग्रॅ , द्रांक्षे ३० मि ग्रॅ ,
खजूर ७० मि ग्रॅ , ऑरेंज ५० मि ग्रॅ ,
किसमीस १०० मि ग्रॅ , सफरचंद १० मि ग्रॅ ,
केळं १० मि ग्रॅ , पपई १० मि ग्रॅ
याप्रमाणे कोणत्या भाज्या , कशा , किती वापरायच्या तुम्ही ठरवू शकता .
आतापर्यंत आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याबद्दल नाही विचार केला . तर आता तेही पाहू . हे ही प्रती १०० ग्रॅ वापराबद्दल आहे .
गाईचे दूध कॅल्शियम असते १२० मि ग्रॅ , म्हशीचे दूध २१० मि ग्रॅ ,
गायीच्या दुधाचे दही १२० मि ग्रॅ , चीज ७९० मि ग्रॅ ,
दुध पावडर स्कीम्ड १३७० मि ग्रॅ , दुध पावडर पुर्ण ९१० मि ग्रॅ
या सर्व चर्चेमध्ये आपण सुकामेवा किंवा ड्राय फ्रु्टस बद्दल बोललो नाही .
तर आता ते पाहू .
बदाम १०० ग्रॅम खाल्ले तर २३० मि ग्रॅ कॅल्शियम मिळेल ,
शेंगदाणे ५० मि ग्रॅम , पिस्ता १४० मि ग्रॅ
तर हे आपल्याला लागणारं कॅल्शियम आणि ते कसं मिळवणार या बद्दल बोलणं झालं .
आपण आपल्या आवडीप्रमाणे जर रेसीपी तयार केल्या तर सोप्या पद्धतीने आपण आपली कॅल्शियम ची गरज पुर्ण करू शकू .
ज्यांना गोळ्या घ्यायची आवड , किंवा गरज आहे ते लोक्स वगळा , पण जर तुम्हाला या माहितीतून वेगवेगळ्या रेसिपी , प्रमाण याबद्दल कांही माहिती मिळाली , तर एक सोपं सोल्युशन सांगतो .
या माहितीतून , नाष्ट्यासाठी , लंच साठी , डिनर साठी एक रेसिपी तयार करा . एकंच एक आपण नाही खाऊ शकणार . मग यात आवश्यक ते हेल्दी बदल करा .
थिंक हेल्दी , स्टे हेल्दी , ईट हेल्दी , फॉलो हेल्दी
DR PRASHANT KASHIKAR
Shri Samarth Netralaya & Pain Clinic
098222 54406