26/04/2025
“५० वर्षांची सेवा, विश्वास आणि समर्पणाचा प्रवास”
आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या " महेश क्लिनिक " ने आपल्या कार्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे.
१९७५ साली एक छोटं पाऊल म्हणून Dr. V. Y. Kulkarni सरांनी सुरू केलेला हा प्रवास, आज हजारो रुग्णांचा विश्वास संपादन करणाऱ्या एका मान्यताप्राप्त रुग्णालयात रूपांतरित झाला आहे.
गेल्या ५० वर्षांत केवळ रुग्णसेवाच नाही, तर त्यांच्यासोबत आशा, आधार आणि आत्मविश्वास यांचाही पाठिंबा दिला.
महेश क्लिनिक मधील प्रत्येक डॉक्टरांचे कुशल मार्गदर्शन, परिचारिकांची निःस्वार्थ सेवा, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या परिश्रमामुळे हा प्रवास शक्य झाला आहे तसेच आमच्या आई सौ. सुलभा कुलकर्णी म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सुलभा ताई यांच्या पाठिंब्याने आणि खंबीर साथीने सर्व काही शक्य झाले. Dr. V. Y. Kulkarni सरांनी जालना शहर आणि शहराजवळी 16 गाव खेडी येथे जाऊन रुग्णसेवा केलेली आहे , कधी गर्मीत तर कधी पावसात कधी पुरात तर कधी कार नी तर कधी अक्षरशः घोड्यावर जाऊन 1 दिवसाच्या अर्भकापासून ते वयोवृध पर्यंत रुग्ण बरे केले आहेत असे कित्येक परिवाराचे फॅमिली डॉक्टर असे Dr. Kulkarni sir म्हणजेच आपले " अण्णा " यांना सलाम .
आजच्या या विशेष दिवशी आम्ही Dr. V. Y. Kulkarni , Dr. Mahesh Kulkarni अणि Dr. Amruta Kulkarni सर्व जुन्या व सध्याच्या कर्मचारी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आणि समाजातील सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानतो.
तुमच्याच विश्वासावर आणि पाठिंब्यावर आमचे कार्य अधिक सक्षम होत गेले आहे.
हा सुवर्णमहोत्सव आमच्यासाठी केवळ एक उत्सव नाही, तर पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणा आहे.
आरोग्यसेवेत नाविन्य, गुणवत्तेची वचनबद्धता आणि मानवतेची भावना यांचा अविरत प्रवाह आम्ही पुढेही सुरू ठेवू.
महेश क्लिनिक
कसबा
जालना.