24/09/2022
आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की “कमल ऑर्थोपेडीक अँड मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आणि जत सी टी स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर दोन्हीही युनिटना वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च NABH (राष्ट्रीय मानांकन) द्वारा नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे. म्हणूनच कमल ऑर्थोपेडीक अँड मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल आणि जत सी टी स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर आता गुणवत्ता मूल्यांकनानुसार राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. आम्ही रूग्णांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी आमच्या रुग्णालयात NABH चे प्रोटोकॉल पाळून जत सारख्या शहरात एक मैलाचा दगड गाठला आहे.
जत सी टी स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर आणि कमल ऑर्थोपेडीक अँड मल्टिस्पेसिएलिटी हॉस्पिटल हे जत तालुक्यातील पहिलेच व एकमेव NABH मान्यता प्राप्त हॉस्पिटलआहे.
आमच्या हॉस्पिटल मध्ये सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे. 50 बेडचे हॉस्पिटल ..अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आयसीयु सेवा उपलब्ध आहे...
मेडिसिन विभागात डॉ. के नांगेंद्र प्रसाद यांच्या मार्फत हृद्यविकार,मेंदूविकार,पोटविकार व इतर आजार तपासणी व उपचार उपलब्ध आहेत.
ऑर्थोपेडिक विभागात "अस्थिरोग व रुग्णांवर उपचार 'करून 'हाडांचा उत्कृष्ठ डॉक्टर' अशी ख्याती मिळवलेले डॉ.कैलास सनमडीकर यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर योग्य उपचार, योग्य वेळेत आणि योग्य पध्दतीने व्हावे यासाठीअत्याधुनिक वैद्यकिय यंत्रसामुग्री, मशनिरीसह दोन अदयावत ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी आपलेपणाने आपली सेवा करणारे तंज्ञ कुशल स्टाफ उपलब्ध आहे...
रेडियॉलॉजि विभाग:-
डॉ रवी जानकर (MD Radiologist)यांच्या मार्गदर्शनाखाली जत सी टी स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर येथे पोटाची सोनोग्राफी/स्त्रियांची गरोदर पणातील सोनोग्राफी /सर्व प्रकारचे एक्स-रे (X-Ray) केले जातात. तसेच डोके/पोट व इतर सर्व अवयवांचे सिटी स्कॅन केले जाते..व रेडिओलाॅजिस्ट कडून त्वरीत रिपोर्टींग केले जाते.
त्याचबरोबर या रुग्णालयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू करण्यात आली आहे याद्वारे रुग्णांना मोफत व माफक दरात उपचार केले जातात यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली आहे या रुग्णालयात डॉक्टर रवी जानकर व डॉक्टर के प्रसाद हे देखील डॉक्टर कैलास सनमडीकर यांच्याबरोबर काम करीत आहेत.
या रूग्णालयात न्यूरो सर्जन,युरो सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, गुडघा जॉइंट सर्जन, चेहऱ्याचे व तोंडाचे आघात सर्जन, स्पाईन सर्जन असे एम. डी. एस डॉकटर मिरज व सांगली येथील तज्ञ डॉक्टर भेटी देऊन ऑपरेशन करत असल्याचे डॉ. सनमडीकर यांनी सांगितले.
२४ तास रुग्ण सेवेत असणारे डॉ. कैलास सनमडीकर यांनी गेली २४ वर्षे अथक परिश्रमातून हॉस्पिटलची उभारणी केली आहे. जतच नव्हे तर तालुक्या बाहेरील मंगळवेढा, सांगोला, कर्नाटकातील अथणी व विजयपुर जिल्ह्यात प्रमुख अस्थितज्ञ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
आपुलकीची रुग्ण सेवा हे ब्रीद वाक्य ठरवून मागील 24 वर्ष्यापासून आम्ही अहोरात्र रुग्ण सेवा करीत असून रुग्णांना निरंतर सेवा प्रदान करीत आहोत.
यापुढेही रूग्णांना दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व त्याकरिता आपल्या सतत पाठिंब्याची अपेक्षा आम्ही करतो.
धन्यवाद...!!!