21/12/2025
अविरत रुग्णसेवेची 28 गौरवशाली वर्षे पूर्ण…
सतत उत्कृष्ट, तत्पर व रुग्णकेंद्रित सेवा देण्याचा ध्यास मनाशी बाळगून सुरू केलेल्या या सेवायात्रेला आज 28 वर्षे पूर्ण होत आहेत. या यशस्वी प्रवासात रुग्णांनी, नातेवाईकांनी व आपण सर्वांनी आमच्यावर टाकलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे.
कोणतेही कार्य पूर्णत्वास जात असताना त्यामागे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अनेकांचे सहकार्य, पाठबळ व आशीर्वाद लाभलेले असतात. या सेवायज्ञात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी, हितचिंतक व शुभेच्छुकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
यापुढेही अधिक जबाबदारी, समर्पण व निष्ठेने रुग्णसेवेचे हे व्रत अखंडपणे जपण्याचा आम्ही दृढ संकल्प करीत असून, आपण दिलेल्या विश्वासास सदैव पात्र राहू, अशी ग्वाही देतो.
– टीम “कमल ऑर्थोपेडिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जत.”