29/06/2024
२६ जून “अमली पदार्थांचे गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस “
दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित , नवजीवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र , कागल यांच्यामार्फत २६ जून निमित्त “अमली पदार्थांचे गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस “ वाय. डी . माने इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मध्ये २५ व २६ जून रोजी साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवजीवन व्यसनमुक्तीचे केंद्रचे प्रकल्प समन्वयक श्री. सचिन हिरेमठ व अध्यक्ष म्हणून वाय .डी . माने. इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे प्राचार्य मा. श्री . अवधूत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री. अक्षय साळुंके (चिकित्सक व पुनर्वसन मानसतज्ज्ञ) उपस्थित होते. कार्यक्रमाचा सुरवातीस राजर्षी शाहू महाराज यांचा प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे अध्यक्ष व वक्ते यांचा हस्ते करण्यात आले . या नंतर प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यांनी आपल्या मनोगतामध्ये अमली पदार्थाचे सेवन केल्यानंतर निर्माण होणाऱ्या आरोग्य आणि आर्थिक समस्या या बदल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांनी २६ जून अमली पदार्थांचे गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त मार्गदर्शन केले . यामध्ये त्यांनी अमली पदार्थ म्हणजे काय ? अमली पदार्थाचे सेवन करण्याची आकडेवारी , नशेमुळे गुन्ह्यामध्ये होणारी वाढ , व्यसनाची लक्षणे ,करिअर पासून विभक्त झालेली आणि वाढत्या तणावामुळे व्यसनाधीन तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच युवकांमध्ये स्वतः विषयी , कुटुंबाविषयी ,समाजाविषयी आणि देशाविषयी प्रेमभावना निर्माण व्हावी त्यासोबतच आपले स्वतःचे एक आदर्श व्यक्तिमत्व कसे तयार करता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .
२६ जून रोजी सकाळी छ. शाहू महाराज प्रतिनेच पूजन रुग्ण मित्रांकडून करून घेतले .त्यांना अंमली पदार्थ बद्दल दुष्परिणाम सांगितले. त्यानंतर शपथ विधी कार्यक्रम घेतला त्यावरील उपचार व्यसनमुक्ती मध्ये च राहून घ्यावे लागेल याचे महत्तव पटवून दिले . त्यानंतर शपथ विधी कार्यक्रम घेतला.
तसेच २६ जून जागतिक ‘’अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त ‘’कागल शहरात रॅली काढण्यात आली . या रॅली मध्ये वाय .डी .माने बालगृहातील मुले उपस्थित होती. या रॅली मध्ये ‘’अमली पदार्थ सेवन विरोधी’’ बॅनर तसेच घोषणा देण्यात आल्या . २६ जून ‘’अमली पदार्थ सेवन विरोधी दिना’'चे निमित्तने अमली पदार्थ सेवन विरोधी जनमानसात जाणीव जागृती व्हावी म्हणून या रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये नवजीवन व्यसन मुक्तीचे कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे सेक्रेटरी भैय्या ऊर्फ प्रताप माने सर, उपाध्यक्ष श्री . सुनिल माने सर , संचालक श्री. बिपीन माने , कॅम्पस संचालिका सौ. शिल्पा पाटील मॅडम या कार्य्रक्रमास मोलाचे मार्गदर्शन लाभले.