
29/05/2025
आज दिनांक 27/ 5 /2025 रोजी अंगणवाडी क्रमांक 21 मधील MAM मध्ये असणारी कु. अद्विका सुनील कुंभार या बालिकेच्या घरी सहाय्यक गट विकास अधिकारी माननीय तारळकर साहेब यांनी भेट दिली व फूड बास्केट चा बॉक्स दिला. यावेळी साहेबांनी माता पालकांना वजन वाढीसाठी व उंची वाढीसाठी मार्गदर्शन केले.तसेच दिलेल्या सर्व खाऊ योग्य वेळेत व योग्य पद्धतीने देण्यास सांगितले.छान प्रकारे त्यांनी अद्विकाशी गप्पा गोष्टी सुद्धा केल्या.यावेळी ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक चौगुले साहेब तसेच क्लार्क श्री. तोडकर व श्री. पाटील उपस्थित होते. तसेच अंगणवाडी क्रमांक 21 व 255 मधील मदतनीस सौ. तोडकर व सौ. बारड मॅडम उपस्थित होत्या. माननीय तारळकर साहेबांचे अंगणवाडी क्र. 21 व पालक खूप खूप आभारी आहेत.🙏🙏🙏🙏