03/06/2025
१जून बहुजन विकास संघाचे वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम एकच दिवसांमध्ये मुंबईचे वेगवेगळ्या १० ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ठाण्यामध्ये हा उपक्रम वाल्मिकी समाज सभाग्रह वाल्मिकी चौक जव्हार बाग इथे आयोजित करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज भासते. ही गरज ओळखून बहुजन विकास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अरून चौहान यांचे मार्गदर्शन हा उपक्रम राबवला आलं.यावेळी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव मा.श्री.नरेश भगवाने, राष्ट्रीय सल्लागार मा.श्री. नरेश बोहित, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.सुजीत भाल, ठाणे शहर जिला उपाध्यक्ष श्री.अफसर मंगवाना ठाणे शहर अध्यक्ष श्री.दिनेश महरोल, ठाणे सर अध्यक्ष महिला संघटक सौ.सोनाली मंगवाना, क्रीडा अध्यक्ष ठाणे शहर श्री.अजय राठोड,समाजसेवक श्री विशाल वाघ व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहुजन विकास संस्था एक धोरण आहे शिक्षित बना संघटित व्हा संघर्ष करा...
जय वाल्मीकी जय भीम 🚩🏹