Soham counselling & Hypnotism Center

Soham counselling & Hypnotism Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Soham counselling & Hypnotism Center, Alternative & holistic health service, sarvamangal apt beturkar pada kalyan west, Kalyan West.

15/12/2018
09/10/2018
03/04/2018

हल्ली बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की वयस्कर आई वडील दोघेच घरी असतात आणि मुले नोकरी साठी बाहेरगावी किंवा परदेशी. म्हातारे आई वडील खूप दुःखी आहेत अशा बऱ्याच कविता आहेत. पण दोघे मजेत आहेत अशी एक कविता नुकतीच whatsapp वर वाचली तीच फॉरवर्ड करत आहे.

आम्ही दोघे

मुलगी आमची युरोपात असते
आणि मुलगा यूएस मध्ये असतो
इथे मात्र आम्ही दोघेच असतो

जावई आॅफिसात राब राब राबतो
सुनेचा ही कामाने पिट्टया पडतो
मदतीला या मदतीला या
दोघांचाही आग्रह असतो
चतुराईने टाळतो कारण
इथे मात्र आम्ही एन्जाँय करत असतो !

हिच्या खूप हाँबीज आहेत
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो
मला कसलीच आवड नाही
मी राहिलेल्या झोपा पूर्ण करून धेतो..
कारण आम्ही दोघेच असतो !

संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो
येताना बाहेरच जेवून येतो
बिल्डिंगमागे सूर्य डुबतो
मग आम्ही वाईनचे ग्लासेस काढतो
कारण आम्ही दोघेच असतो !

एकदा मुलाचा फोन येतो
एकदा मुलीचा फोन येतो
वेळ नाही अशी तक्रार करतात
आमचाही उर भरून येतो
तुम्हीही नंतर एन्जाँय कराल
असा त्यांना धीर देतो
कारण आम्ही दोघेच असतो !

नव्या नवलाईन जाऊनही आलो
स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो
इकडचं - तिकडचं
दोन्ही जगं एन्जाँय करतो
कारण आम्ही दोघेच असतो !

नाही जबाबदारी नाही कसलीच इथे
आणि नाही कसली तक्रार तिथे
नाही कसली अडचण सुखाची
सेकंड हनीमून एन्जाँय करतो
कारण आम्ही दोघेच असतो !

भांडण तंटे आमचे खूप होतात
नसते तिला स्मरण नि मला आठवण
खरे तर काहीच नसते वादाचे कारण
वाद विसरून चीअर्स करतो
कारण आम्ही दोघेच असतो !

तिला चिकन बिर्याणी आवडते
ती ही ठराविकच हाँटेलात मिळते
नेहमीच ती मिळते असे नाही
पण ती आली की मी नक्की आणतो
घरच्या स्वैपाकाची कटकट नाही
कारण आम्ही दोघेच असतो !

मरणाच्या गोष्टी आम्ही करत नाही
पार्ट्या करतो ट्रिपा काढतो
हाताशी आता पैसे आहेत
वेळ अन मित्रही भरपूर आहेत
मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले
हे जाणून मनोमनी खूश होतो
कारण आम्ही दोघेच असतो

मुलांना हेवा वाटायला नको
त्यांच्यापासून ही मौजमस्ती लपवून ठेवतो
संगममताने तीही हसते .. साथ देऊन मीही हसतो
कारण आम्ही दोघेच असतो !
कारण आम्ही दोघेच असतो !!

18/03/2018

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजचा आरोग्य विचार
१६ मार्च २०१८
भाग त्रेचाळीस

१०९.तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट काय असा प्रश्न जर एखाद्या पाश्चात्याला विचारला तर त्याचे उत्तर त्याला माहित नसते. कारण ते त्याच्या संस्कृतीमधेच नाही. पण भारतीय माणसाला जर विचारले तर ? तो चटकन सांगेल, मोक्ष मिळवण्यासाठी ! माणसाचा जीवन प्रवास हा जन्मोजन्मीच्या जन्ममरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी आहे. हेच तर उद्दिष्ट आहे आपल्या जगण्याचे !
पण आज मात्र जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. मोठे होण्यासाठी, काहीतरी करून दाखवण्यासाठी, संसार करण्यासाठी, वंशवृद्धी करण्यासाठी अशी अनेक उत्तरे मिळतील. पण मोक्ष ही संकल्पना फक्त आपल्या भारतीय शास्त्रामधेच मिळते.

मोक्ष म्हणजे नेमके काय ?
तीन शब्दात सांगायचे झाले तर, मोक्ष म्हणजे आनंद ! हा आनंद जीवनातल्या प्रत्येक क्षणाला मिळवायचाय. अनुभवायचाय.

११०. जगायचं कशासाठी तर पुरुषार्थ प्राप्तीसाठी ! असेही उत्तर भारतीय दर्शन शास्त्रात लिहिले आहे. चार पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ, काम आणि मोक्ष.
आणि धर्मार्थ काममोक्षाणां आरोग्यमूलमुत्तमम् ।
चारही पुरुषार्थ मिळवण्यासाठी आरोग्य चांगले पाहिजे, हे वचन फक्त भारतातच !
म्हणजे आरोग्य मिळाल्यावर त्याचा विनियोग या चार गोष्टींच्या प्राप्तीसाठीच करावयाचा आहे.

नीतीच्या बंधनात राहून, धर्मपालन, धर्माच्या बंधनामधे राहून अर्थप्राप्ती, मिळवलेली संपत्ती ही सुप्रजानिर्माण करून समर्थ भारत घडवायला, त्यासाठी कामप्राप्ती, आणि पहिले तीन पुरुषार्थ मिळवले तरच मोक्ष ! सतत वर्तमानामध्ये राहून आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद अनुभवण्यासाठी मोक्ष मिळवणे.

आरोग्य संकल्पनेचा एवढा उदात्त विचार फक्त भारतातच !

१६ मार्च २०१८

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

17/10/2017

The ancient way to say 'HAPPY DOCTORS DAY'
Today is Dhanvantari Jayanti, Dhantrayodashi, the day of the incarnation of Lord Dhanvantari, the god of health and medicine. Dhanvantari emerged from the Ocean of Milk and appeared with the pot of amrita (elixer for immortality) during the story of the Samudra (or) Sagara Mathana whilst the ocean was being churned by the Devas and Asuras, using the Mandara mountain and the serpent Vasuki. He is regarded as the physician to the gods. He is often shown with a leech in his hand rather than the scriptures. He is worshipped widely as the blessing deity by all medical professionals, traditional and modern; and his anniversary is celebrated as an informal Doctors’ Day in the country.
As per Ayurveda legends, Divodas, the ascetic king of Varanasi from around year 1500 BCE, is also considered an incarnation of Lord Dhanvantari. He taught Ayurveda to his disciples including Sushrut (the all time greatest surgeon), Nimi (the best known ophthalmic and ENT surgeon) and Kaankaayan, the scholar coming from the Balkans who spread Ayurveda far and wide. These disciples became the first batch of specialist surgeons in Ayurveda, who were also a first in using many ahead-of-the-time practices, including sterilization, anaesthesia, absorbable sutures and a lot more.
So wishing all , a happy and healthy year ahead!
Stay Healthy, stay Happy
सर्वे सन्तु निरामया:

23/07/2017

*अपने आप में शराब में कोई खराबी नहीं है,
लेकिन .....*
तुमने खयाल किया?
शराबी मस्त मौला मालूम होता है। ऐसा लगता है जैसे आनंदित है। बस लगता है, भीतर सारे दुःख का अंबार है। ऊपर से शराब ने थोड़ीसी देर को मूर्छा दे दी है; सुबह होगी, मूर्छा टूट जाएगी। और अपने को और भी दुःख के गढ्ढे में गहरा पाएगा।
और भी अंधकार की गर्तो में उतर जाएगा। क्योंकि चिंताएं जब वह शराब पी कर बेहोश पड़ा था तब उसके भीतर बढ़ रही थीं, बड़ी हो रही थीं, फैल रही थीं।

_जैसे कैंसर फैलता रहता है भीतर, तुम्हें पता न भी हो, वैसे ही चिंताएं फैलती रहती हैं भीतर।_

_और चिंताओं और कैंसर का बड़ा जोर भी है। चिंताएं शायद मानसिक कैंसर का नाम है और कैंसर शायद शारीरिक चिंता का नाम है। आज नहीं कल इसका उद्घाटन होने ही वाला है। क्योंकि जैसे जैसे चिंताएं बढ़ती हैं समाज में वैसे वैसे कैंसर बढ़ता है।_

कैंसर शारीरिक बीमारी कम मालूम होता है,
मानसिक बीमारी ज्यादा मालूम होता है। शायद मन में ही उसका सूत्रपात है।
अति चिंता, अति संताप, अति उद्विग्नता, अति तनाव, देह को भी ज़राजीर्ण कर जाता है; तोड़ जाता है। ऐसा तोड़ जाता है कि अभी तक उसका कोई इलाज नहीं, उपाय नहीं, औषधि नहीं।

लेकिन तुम रात जब सोए हो तब भी कैंसर बढ़ रहा है, फैल रहा है। ऐसे ही चिंता फैल रही है।
तुम शराब पी कर पड़े हो, ऊपर से देखने में चाहे तुम मस्त भी मालूम पड़ो, मगर मस्ती झूठी है, सुबह होते होते उतर जाएगी।

शराब पी कर आदमी पीछे गिरने की कोशिश कर रहा है, समय को झुठलाने की कोशिश कर रहा है। यह कोशिश सफल नहीं हो सकती।
मैं शराब का विरोधी नहीं हूं, मैं इस कोशिश का विरोधी हूं। यह कोशिश सफल नहीं हो सकती, यह तुम समय गंवा रहे हो।
शराब में क्या रखा है? अंगूर की बेटी है।
शराब में ऐसा कुछ बहुत बुरा नहीं है, शराब में ऐसा कुछ पाप नहीं है। और कभी कभार घूंट भर पी ली चार मित्रों के बीच तो कुछ नरक नहीं चले जाओगे। जब स्वमूत्र पीने वाले नरक नहीं जा रहे, तो ज़रा अंगूर का रस पी लिया, इसमें कहीं नरक चले जाओगे?

लेकिन शराब के पीछे जो आकांक्षा है, मैं उसका जरूर विरोध करता हूं। वह आकांक्षा गलत है। वह पूरी नहीं हो सकती।

इसी तरह और भी उपाय आदमी खोजता है।
धन की दौड़ में, पद की दौड़ में अपने को भुलाने की कोशिश करता है। याद न रहे अपनी, ऐसा अपने को उलझा लेना चाहता है। राजनीति के दांव पेंचों में पड़ जाता है।
ऐसे चक्करों में पड़ जाता है कि अपनी याद न आए।
यह भी शराब है। और यह ज्यादा खतरनाक शराब है। क्योंकि शराब तो सुबह उतर जाएगी,
मगर यह जिंदगीभर चढ़ी रह सकती है।

राम दुवारे जो मरे

ओशो

21/07/2017

"Be Thankful For The Struggles You Go Though. They Make You Stronger And Wiser. Don't Let Them Break You. Let Them Make You."
Good Morning & make a Wonderful day 😊

19/07/2017

कालच्या म्हैसेकर यांच्या घटनेवर एका महिला अधिका-याची बोलकी प्रतिक्रिया ,,,,,,,,,,,,,

कालच्या घटनेने मुलांच्या संगोपनाविषयी पुन्हा एकवार विचार करायला लावले. विषेशत: अधिका-यांची मुले आणि जबाबदार पालकत्व हा कळीचा मुद्दा आहे म्हणून आज खास आपल्या या ग्रुपवर लिहीत आहे. आज मुलांचे एकाकीपण ही एक खूप मोठी समस्या बनली आहे, त्यातही एकुलती एक मुलं ही येत्या काही काळात खूप मोठी सामाजिक समस्या असणार आहे आणि त्याला जबाबदार त्यांचे पालकच आहेत हे नाकारता येणार नाही त्यामुळे केवळ कुटुंब नव्हे तर आपली मुलं ही आपली priority असली पाहीजेत. पण ही गोष्ट समजून घेण्यात आपली फार मोठी गल्लत होते आहे. मुलं priority असणं म्हणजे मुलांना भरमसाठ चैनीच्या वस्तू, गॅझेटस , महागडी खेळणी, फाइव्ह स्टार ट्रिटस हे सगळं उपलब्ध करून देणं . त्यांनी न मागताही त्यांना सर्व सुखसोयी त्याही तुमच्याच दृष्टीकोनातून उपलब्ध करून देणं . त्यांना भरपूर पैसे खर्च करून देशविदेशी फिरायला नेणं अशा गोष्टी करता आल्या की आपण खूप चांगले पालक झालो असा एक गोड गैरसमज आहे.
आजकालची मुलं आपल्या व्यस्त जीवनशैलीचा आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रचंड मानसिक ताण सहन करत आहेत , हे किती लोकांना माहीत आहे? हा ताण व्यक्त करण्यासाठी त्यातून मुक्त होण्यासाठी त्यांना ख-याखु-या जीवंत सोबतीची गरज असताना तुम्ही त्यांना निर्जीव जगात ढकलून रिकामे होता. अधिका-यांची मुलं म्हणून असणा-या त्यांच्या वेगळ्या ओळखीमुळे दुर्दैवाने हा स्पेस त्यांना बाहेरच्या समाजातही सहजासहजी मिळत नाही जो इतर मुलांना एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्यातून , वागण्यातून सहज उपलब्ध असतो. आपल्याला कल्पनाच नसते पण मुलांचंही विश्व प्रचंड ताणतणावांचं असतं . आपल्या दृष्टीने त्या गोष्टी क्षुल्लक असतात त्यामुळे आपण त्याचं ऐकून घ्यायला वेळच देत नाही. तर काही बाबतीत आपला अतिरेकी हस्तक्षेपही चालू असतो. जसे त्यांच्या शालेय गोष्टीत उगीच नाक खुपसणे , त्यांचे होमवर्क पूर्ण करून देणे, त्यांच्या वस्तू सांभाळायला माणसं सोबत देणे ........ही यादी बरीच मोठी आहे. त्यांना जे हवं असतं ते सोडून आपण सगळं देत असतो आणि वर स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणार 'मी माझ्या मुलाला काही कमी पडून दिले नाही' !
कधी कधी असं होतं की मुलं तुम्हाला सहज म्हणतात , 'पप्पा तुम्ही लवकर या नाही आला तर मग मी तुमच्याकडून कॅडबरी/ खेळणं / आणखी काही वस्तू घेईन. ' त्यावेळी आपण काय करतो? माझं एक उदाहरण सांगते मी आत्ता मुलांपासून लांब राहते तेव्हा कधी कधी माझा मुलगा मला असंच काहीतरी अटी घालतो. ब-याच वेळा अवघडच असतं जाणं पण तशा वेळी आवर्जून मी कुठलीही 'वस्तू' त्याला 'देत नाही ' कारण आपल्या आईला / वडीलांना वस्तू हा पर्याय नाही हे त्याला जाणवलं पाहीजे. जास्तीत जास्त वेळा मी जाण्याचाच प्रयत्न करते कारण तशा वेळी मुलांना फक्त आपणच हवे असतो पण त्याऐवजी वस्तू मागणं हा त्यांच्या बालबुद्धीचा पर्याय असतो.
खरं तर सुजाण पालक किंवा जबाबदार पालक होणं ही उत्कृष्ट अधिकारी होण्यापेक्षा अवघड बाब आहे. पण होता होईल तेवढी ही जबाबदारी समजपूर्वक आपणच सांभाळली पाहीजे कारण our child is not our asset it is a liability. आपल्याला सव्याज हे देणं समाजाला द्यायचं आहे. आज नुसतं सुरक्षित ( अनावश्यक) कवच देत राहण्यापेक्षा उद्या व्यवहारी जगात वावरण्यासाठी आवश्यक ते सगळे गुणअवगुण त्याच्यात येतील यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. उद्या स्वत: कमावायला लागल्यावर सगळ्या वस्तू सहज , न मागता मिळत नाहीत हे वास्तव कळाल्यावर हेलपटून जावू नयेत ती. कुठेही नकार किंवा अपयश आले तर आयुष्याकडून निराश होवून जावू नयेत ती. नाहीतर भविष्यात अशा अनेक घटनांना तोंड द्यायची वेळ येवू शकते !!!
👌🏿👌🏿👌🏿

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.
त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले.
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.

चालून चपला झीझवणारी हि शेवटची पिढी.
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी.
लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी.
रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी.
ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी.
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.

कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता.
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.
संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या.
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो.
तुटलेल्या क्यासेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून आमच्यातले काही इंजिनियर झाले.
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या.

तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणस माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.

पण आता मात्र....
गाव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.

रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
बघता बघता पिढी फोरजी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढार्यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.

आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण.
या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.

दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.

(कुठेतरी छानसं वाचलेलं....)

Address

Sarvamangal Apt Beturkar Pada Kalyan West
Kalyan West
421301

Opening Hours

Monday 2am - 3am
Tuesday 2am - 3am
Wednesday 2am - 3am
Thursday 2am - 3am
Friday 2am - 3am
Saturday 2am - 3am
Sunday 2am - 3am

Telephone

+919819215165

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham counselling & Hypnotism Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Soham counselling & Hypnotism Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram