Siddhi Clinic

Siddhi Clinic when you choose Homoeopathy, you choose better Health. Homoeopathy tackles the cause of ill health r

26/07/2024

*नेहमी शुद्ध देशी गाईचे तूपच वापरा.....*

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. या पाठीमागचे त्यांचे कारण तुप खाल्ल्यामुळे वजन वाढते. पण तसे बिलकूल नाही. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही. आज तुम्हाला देशी तुप खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

*देशी तुपाचे आरोगयदायी- फायदे...*

*देशी तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते.

*यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपलब्ध असतात.

*देशी तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

*देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते.

*रोज शुद्ध तुप खाल्ल्याने वात आणि पित्त शांत राहण्यास मदत होते.

*शुद्ध तुप खाण्याने पचन क्रिया उत्तम राहते.

*मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते. त्यासाठी शुद्ध तुप खाल्ले पाहिजे.

*हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते.

*गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदशीर आहे.

*उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे.

*डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

*तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

*त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त...*

*शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट जातात आणि त्वचा मॉयश्चराइज होते.

*स्किन नरिश करण्याबरोबर त्वचेतील ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. शुद्ध तुपाने चेह-याचे मसाज करणे उत्तम असते.

*केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.

*भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खुण कमी करते.

*हृदयासाठी...*

*शुद्ध तुपाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

*शुद्ध तुपामध्ये व्हिटॅमिन के2 असते. यामुळे ब्लड सेलमध्ये जमलेले कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करते. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते.

*शुद्ध तुपाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. यामुळे इन्फेक्शनमुळे होणा-या आजारांशी लढण्यास ताकद मिळते.

*शुद्ध तुपामध्ये सूक्ष्म जीवाणु, ऍन्टी-कॅंन्सर आणि ऍंटी-व्हायरल एजेंट उपलब्ध असते. यामुळे अनेक आजारांशी लढा देण्यास मदत होते.

*डायजेस्टिव्ह सिस्टीम उत्तम करण्यास मदत करते.

*शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरात जमा फॅट पातळ करून त्याचे व्हिटॅमिनमध्ये रूपांतरण करण्याचे काम करते.

*यामुळे खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते आणि मेटाबॉल्जिम उत्तम राहण्यास मदत होते.

*आहारामध्ये शुद्ध तुप एकत्र करून खाण्याने खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते.

*अल्सर, गॅस आणि पचन क्रियेमध्ये असलेल्या अडचणी यामुळे कमी होण्यास मदत मिळते.

*वजन कमी करण्यासाठी...*

*शुद्ध तुपामध्ये सीएलए (CLA) उपलब्ध असते. ज्यामुळे मेटाबॉल्जिम उत्तम राहते व वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

*सीएलए इंसुलिनची मात्रा कमी ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे वजन वाढणे आणि साखर वाढण्याचा धोका कमी होतो.

*शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

*हाडांसाठी लुब्रिकेंट म्हणून काम करते, गुडघेदुखी साठी उपयुक्त.

*तुप दिवसभरात दोन चमचे खावे. भात, भाजी, आमटी यावर घेतले तरी चालते
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*(कॉपी पेस्ट)*

23/07/2024

*तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे !!*

लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. लसणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.

*हृदयासाठी चांगले आहे*

लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

*श्वसनासंबंधित रोग चांगले होतात*

लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.

*पचनासाठी चांगले*

लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.

*प्रतिकारशक्ती वाढते*

तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.

*हाडे मजबूत होतात*

लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी संजीवनी मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*

*(कॉपी पेस्ट)

30/06/2024

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*हृदयविकार कोणाला होतो ?*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार असं सर्वसाधारणरीत्या म्हटलं जातं.

आपण बराच काळ सतत वेगानं चालत असलो की पाय दुखु लागतात किंवा जड वजन उचलल्यामुळं हात दुखु लागतात. याचं कारण म्हणजे पायांच्या किंवा हाताच्या स्नायूंना काम करण्यासाठी ज्या वेगानं ऑक्सिजनचा वापर करावा लागतो त्या वेगानं त्यांना तो मिळत नाही.

हृदय हाही एक स्रायूच असल्यामुळे त्यालाही जर योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर तोही दुखू लागतो. जस तेल वाहून नेणार्‍या टँकरच्या इंजिनाला त्या टैंकरमधल्या तेलाचा काहीच उपयोग होत नाही तसंच हृदयाच्या आत कितीही रक्त असलं तरी त्याचा वापर त्या स्नायूंना करता येत नाही. त्यासाठी त्याच्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे विराजमान झालेल्या रक्तवाहिन्यांकडून त्याला रक्ताचा योग्य तितका पुरवठा व्हावा लागतो.

जर काही कारणानं या वाहिन्या चोंदल्या तर त्यांच्या मधून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मग त्या वाहिन्या हृदयाच्या स्नायूला योग्य तितकं रक्त पुरवू शकत नाहीत. या वाहिन्या चोंदण्याची अनेक कारणं आहेत. ज्यांच्या शरीरात ही कारणं निर्माण होण्याची शक्यता जास्ती आहे अशांना मग हृदयविकार होण्याची शक्यताही वाढीस लागते.

ज्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडलेला आहे त्यांना हृदयविकारही जडण्याची शक्यता जास्ती असते. रक्तदाब वाढण्याचीही अनेक कारणं आहेत. अतिधुम्रपान, लठ्ठपणा तसंच शरीराची फारशी हालचाल न करणं यामुळं रक्तदाब वाढीस लागतो. काहींच्या आनुवंशिक गुणधर्मामुळे रक्तदाब वाढलेला असतो. तसंच अतितणावग्रस्त परिस्थितीही रक्तदाब वाढण्यास कारणीभूत होते.

पण त्याहूनही अधिक घोकादायक आहे ते रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण. हे वाढलेलं असेल तर मग हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्या कोंडण्याची शक्यताही वाढीस लागते. मांसजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे तसंच संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड चरबी सेवनही याला कारणीभूत असतं. आपल्या जेवणात तळणासाठी सॅच्युरेटेड फैट्स ज्याच्यात कमी प्रमाणात आहेत अशा सूर्यफूल, करडई यासारख्या तेलांचा वापर केल्यास कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाला काही प्रमाणात आळा घालता येतो.

मधुमेह असणाऱ्या मंडळींनाही हृदयविकार होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच लठ्ठपणा, मेदवृद्धी हीही हृदयविकाराला पोषक परिस्थिती निर्माण करतात. बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वजन आणि उंची यांचं गुणोत्तर हे लठ्ठपणा मोजण्याचं एक एकक आहे.

ज्यांचा बॉडी मास इंडेक्स पेक्षा जास्ती आहे अशांना हृदयविकार होण्याची शक्यताही जास्ती असते. अति धूम्रपान किंवा अति मद्यपान हेही हृदयविकाराला कारणीभूत असतात.

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹

*(कॉपी पेस्ट)*

23/06/2024

*काही घरगुती उपाय.*

♦️ घशाला त्रास होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावे

♦️ पोटात गॅसचा त्रास झाला असेल तर लिंबाच्या रसासोबत ओवा खाल्ला तर त्रास की कमाई होतो.

♦️ जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ, दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो

♦️ कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा.

♦️ सर्दी- कफ झाला असेल तर जेष्ठमध खावे

♦️ सतत खोकला येत असेल १ ते २ चमचे मध घ्यावे किंवा खडीसाखर चघळावी.

♦️ तोंड आले असेल तर जाईच्या पानांचा रस लावावा.

♦️ लघवी करताना जळजळ होत असेल तर धान्याचे पाणी प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो.

♦️ भाजलं किंवा पोळलं असेल तर त्यावर तूप लावावे

♦️ पित्त झालं असेल तर आमसुलाचे पाणी प्यावे.

*(कॉपी पेस्ट)*

22/06/2024

*शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग हा अत्यंत योग्य उपाय आहे.*

नियमित योग केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही *आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योग हा नक्कीच चांगला उपाय आहे.*

🧘‍♂️ *योग करण्याचे फायदे*

1) *ताणतणावपासून मुक्ती* आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगा केल्यास, या ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो

2) *शरीरातील साखरेवर नियंत्रण*
आजकाल लहान वयातदेखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो. शरीरामधील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

3) *वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी*
आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदलल्या आहेत की, त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर होत असतो. बऱ्याच जणांना ही समस्या असते. पण योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.

4) *रक्ताभिसरण चांगलं होतं* योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तऱ्हेने घेतला जातो आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अप्रतिम होते.

5) *म्हातारपणात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी*
तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे *तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरं जावं लागतं.*

🙏🌹🧘‍♀️🧘‍♂️😷🇮🇳
*करा योग राहा निरोग*🧎‍♂️

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*(कॉपी पेस्ट)*

14/05/2024

*होमिओपॅथी ची ट्रीटमेंट का घ्यावी?*

🔸पूर्ण उपचार - होमिओपॅथी मध्ये फक्त लक्षणांवर नाही तर शारीरिक मानसिक आणि भावनात्मक स्तरावर जाऊन व्यक्तीवर उपचार केले जातात त्यामुळे आजार पूर्णपणे बरा होण्यास मदत होते.

🔸नैसर्गिकरीत्या उपचार - निसर्गातीलच विविध घटकांचा वापर करून होमिओपॅथीची औषधे बनवलेली असतात. त्यामुळे ती अतिशय सौम्य असतात.आणि शरीराला अपाय करणारी नसतात.

🔸व्यक्तिगत ट्रीटमेंट - जशी हाताची बोटे एकसारखी नसतात तसेच प्रत्येक व्यक्ती हा एक सारखा नसतो. म्हणूनच होमिओपॅथी मध्ये प्रत्येक व्यक्तीची पूर्ण विचारपूस करून व संपूर्ण माहिती घेऊनच त्या व्यक्तीला उपचार दिले जातात. म्हणूनच औषध लवकर लागू होते व त्रासातून कायमची मुक्तता होते.

🔸 साईड इफेक्ट शिवाय उपचार - होमिओपॅथीची औषधे ही निसर्गातील घटकापासून बनवलेले असल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. व आपली नैसर्गिकरित्या रोगापासून मुक्तता होते.

🔸 रोगप्रतिकारक शक्ती वाढते - होमिओपॅथीच्या उपचारांनी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते व आपल्याला ज्ञात असलेले नसलेले सर्व रोग नाहीसे होतात व आपण सहसा जास्त आजारी पडत नाही, हा होमिओपॅथिक उपचार पद्धती मधील खूप मोठा फायदा आहे.

🔸विविध कारणांसाठी उपचार - होमिओपॅथी उपचार पद्धतीने सर्व प्रकारचे आजार जसे की जुनाट आजार, अचानक उद्भवलेले आजार, मानसिक आजार, भीतीमुळे होणारे आजार, लहान मुलांमधील आजार या सर्वांवर अतिशय प्रभावी औषधे आहेत. होमिओपॅथिक औषधे व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि भावनात्मक स्तरावर स्टेबल करून जीवनाचे स्वातंत्र्य मिळवून देते

🔸 खर्च कमी - इतर उपचार पद्धतींच्या तुलनेत होमिओपॅथीक उपचार हा कमी खर्चामध्ये होतो. यामध्ये आपल्याला खूप जास्त तपासण्या करण्याची गरज भासत नाही किंवा अनेक वेळा ऑपरेशन करण्याची सुद्धा गरज पडत नाही. म्हणूनच आपला खूप मोठ्या प्रमाणात खर्च वाचतो.

🔸 व्यक्तिगत उपचार - प्रत्येक व्यक्तीला उपचारासाठी वैयक्तिक वेळ देऊन त्या व्यक्तीची पूर्ण माहिती विचारून घेतले जाते, व्यक्तीचा आजार, व्यक्तीची शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, सर्व प्रकारची लक्षणे अशाच अनेक गोष्टी विचारून मग त्यावर उपचार केले जातात. त्यामुळे खात्रीशीरपणे रिझल्ट येतोच.

*What is Eye Flu?* Eye flu, or conjunctivitis, is an inflammation of the conjunctiva, the thin and transparent layer cov...
16/08/2023

*What is Eye Flu?*
Eye flu, or conjunctivitis, is an inflammation of the conjunctiva, the thin and transparent layer covering the eye's white part and the eyelids' inner surface. The condition can be caused by viruses, bacteria, allergies, or even irritants like smoke and dust. The most common types are viral and bacterial conjunctivitis, with viral being highly contagious and bacterial requiring prompt treatment to prevent complications.

*Signs and Symptoms*
Eye flu manifests through a range of symptoms, which may vary depending on the cause. Some of the common signs include:

Redness in the whites of the eyes
Itchy or burning sensation
Excessive tearing
Sensitivity to light
Discharge from the eyes, which can be watery or thick and colored (yellow or green)
Crusty eyelids upon waking up (common in bacterial conjunctivitis)
Blurred vision (rare but possible)
How Does Eye Flu Spread?
Eye flu is highly contagious and can spread through direct or indirect contact with infected eye secretions. This means that touching or rubbing your eyes after being in contact with an infected person or using contaminated objects like towels, can transmit the infection. The virus or bacteria can also be transferred through respiratory droplets from coughs and sneezes. The causes of viral conjunctivitis can be acknowledged to the monsoon, change in temperature owing to the hot and humid climate that invites virus growth, and lack of eye hygiene.

*Prevention Tips*
To protect yourself and others from eye flu, follow these simple prevention tips:

Practice Good Hygiene: Wash your hands frequently with soap and water for at least 20 seconds, especially after touching your face, blowing your nose, or interacting with someone who has eye flu.
Avoid Touching Your Eyes: Refrain from touching or rubbing your eyes, as it can introduce infections into the delicate eye area.
Personal Items: Avoid sharing personal items like towels, pillowcases, and eye makeup with others.
Stay Home: If you have eye flu, stay home from work, school, or public places until you are no longer contagious to prevent spreading the infection.
Disinfect Surfaces: Regularly clean and disinfect frequently-touched surfaces in your home and workplace.
Use Protective Eyewear: If you work in environments with potential eye irritants, wear protective eyewear to reduce the risk of infections.

Homoeopathic Treatment

There are many homoeopathic medicines for eyeflu that gives best results...n get 100% cure

*We wish you much happiness and smiles in your life....Happy Doctor’s Day Dr. HEMANGI RAKHONDESIDDHI  CLINIC....KALYAN W...
01/07/2023

*We wish you much happiness and smiles in your life....

Happy Doctor’s Day Dr. HEMANGI RAKHONDE

SIDDHI CLINIC....KALYAN WEST

17/01/2022
27/04/2021

One day on the news channels we will see *'No Cases of covid reported today across the country'*

One day we will read the headlines *'No covid deaths reported today'*

One day we will see ourselves flocking with *Long ques at the Airports.*

One day we will see off *Our Kids in School Van.*

One day we will see the board of *'HouseFull' at the Cinema Hall.*

One day we will *Freely Hug and Dance at the Wedding together.*

We all are waiting for that *ONE DAY...*

We are facing one of the toughest times in human history ever,
but *This too shall pass, its just a Phase...*

Lets keep Ourselves *Motivated*, back ourselves up and look forward to *Help others in whatever way we can*.

I would like to end with a quote by Fàiź Ahmèd...

*दिल नाउमीद तो नहीं नाकाम ही तो है,*
*लंबी है ग़म की शाम मगर शाम ही तो है*

Address

Vasant Vally Road
Kalyan
421301

Opening Hours

Monday 7pm - 9pm
Tuesday 7pm - 9pm
Wednesday 7pm - 9pm
Thursday 7pm - 9pm
Friday 7pm - 9pm
Saturday 7pm - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhi Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Siddhi Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category