15/03/2023
सोर्बीट्रेट.....
(लेख सर्वांना महितीकरता कॉपी पेस्ट केला आहे ,पण असे उपचार आपल्या doctors ना विचारून करावे .विनंती)
गेल्या तीन वर्षात माझ्या जवळच्या पाच व्यक्तींनी हृदय विकाराच्या झटक्यांनी जीव गमावला. सर्वांची कारणे बरिचशी मिळती जुळती; छातीत जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगाला दरदरून घाम येणे, इतका की अगदी बनियन ओला होणे, मळमळणे, उलटी सदृश जाणीव होणे, पाठीत डाव्या बाजूला, डाव्या हातात, किव्वा जबड्यात विचित्र दुखणे, वगैरे या पैकी काही कारणे एकाच वेळेस भासू लागल्यास, समस्या गंभीर आहे हे ताबडतोब लक्षात येणे आवश्यक आहे.
या पाच व्यक्तींच्या शिवाय इतरही काही व्यक्ती, ज्यांचे निधन झाले, त्याबद्दल मुद्दाम लिहितो. यातील कुणालाच कसलाच त्रास आधी न्हवता, असे मी मुळीच म्हणणार नाही, केवळ त्यांनी तो त्रास अंगावर काढला, म्हणजे काय, "छे हो मला काय होतंय, आपण आज पर्यंत डॉक्टरांच्या दाराची पायरी चढलो नाही, अश्या किरकोळ शारीरिक तक्रारी मी घरीच सोडवतो, मी दोन तास व्यायाम करतो, दररोज 15 किमी सायकल चालवतो, पाच किमी दररोज चालतो, पोहतो, काही बहाद्दर म्हणतात चार पेग घेतल्याने हृदयाचे स्नायू लवचिक राहतात म्हणून दररोज पितो, वगैरे कारणे देत, फुशारकी मारत हृदयाने दिलेल्या धोक्याच्या सुचनेकडे कानाडोळा केला. या सो कॉल्ड "धट्टेकट्टे" ना आता जेव्हा झटका बसला, त्यानंतर विद्युत चपळाईने त्यांना जी मदत मिळायला हवी होती ती मिळाली नाही, व अकस्मात किव्वा दवाखान्यात घेऊन जाई पर्यंत, तोंडातून फेस येत शरीर कोसळले, व प्राण ज्योत मावळली.
विषय अतिशय साधा पण महत्वाचा आहे, तो हा ही यातील जवळपास सर्व जण नक्की वाचलेच असते, जर त्यांनी *सोर्बीट्रेट* नावाची गोळी त्वरित जिभेखाली ठेऊन , डॉक्टरकडे गेले असते. *सोर्बीट्रेट* हे (लाईफ सेविंग ड्रॅग,) जीवन वाचविण्याचे औषध आहे, व किंमत रुपये दोन पेक्षाही कमी, म्हणजे रावा पासून रंकापर्यंत प्रत्येकाला परवडू शकणारे औषध.
ज्या लोकांना हृदयाच्या त्रास आहे हे माहीत आहे, अश्या व्यक्ती, नियमित औषधे घेत असल्याने त्यांना झटका होण्याचा धोका कमी किव्वा नसल्यागत दिसून आला आहे. या व्यक्ती हृदय विकाराच्या झटक्याने अचानक मरणे पाहण्यात येत नाही. केवळ त्याच व्यक्ती अचानक मरतात ज्यांचा आजारी असण्याचा, व्याधी असण्याचा इतिहास कोरा असल्याचा त्यांना व त्यांच्या जवळच्या लोकांना भ्रम असतो.
आजकालचे बैठे जीवनमान त्यात चमचमीत तेलकट खाणे, यामुळे वयाच्या तिशी पासूनच आपल्या देशात लोकांना हृदयाशी निगडित व्याधी दिसू लागतात. प्रश्न आहे तो हा की त्या वेळीच ओळखणे, व उपाय म्हणून नियमित औषध घेणे. ज्यांना औषधाची आवश्यकता नाही, थोडक्यात जे "धट्टेकट्टे," या श्रेणीत स्वतःला बसवतात, त्यांच्यासाठी हा लेख लिहिण्याचा प्रपंच आहे.
सोर्बीट्रेट ही गोळी प्रत्येक घरात हवी. अश्या किमान आठ ते दहा गोळ्या घरात अश्या ठिकाणी ठेवाव्यात की आवश्यकता भासल्यास काही सेकंदात उपलब्ध होऊ शकली पाहिजे. घरात जितक्या खोल्या असतील तिथे सहज सापडतील अश्या ठिकाणी किमान दोन गोळ्या ठेवा. दरवर्षी जुन्या टाकून नवीन गोळ्या त्या जागी ठेवा, म्हणतात ना "भूक नको पण शिदोरी हवी," अगदी तसेच काहीसे हे आहे, तुम्हाला याची गरज नाही या भ्रमात राहू नका, कारण असे म्हणणारेच हा हा म्हणता इहलोक सोडून गेले आहेत.
महिलांनी व पुरुषांनी किमान दोन सोर्बीट्रेट गोळ्या पर्स व पाकिटात विशेष कप्यात ठेवाव्या. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात किंवा तस्संम कार्यक्रमात ही द्याव्या. ही लाख मोलाची वस्तू आहे, हे लक्षात घ्या.
सोर्बीट्रेट गोळीचे महत्व घरातील अबाल वृद्धांना माहीत असायला हवे, तसेच गोळी कुणाच्याही हाताशी तात्काळ लागली पाहिजे, तरच जीव वाचविणे शक्य होईल.
मी डॉक्टर नाही, हा लेख नामवंत डॉक्टरांनी मला दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिलेला आहे. यात काही शंका असल्यास आपल्या नजीकच्या डॉक्टरांचा, किंवा फॅमिली फिजिशियनचा सल्ला घ्यावा.💯🤞✨
कॉपी पेस्ट करून टाकले.
Facebook वरून साभार 🙏