01/07/2022
अलख निरंजन आदेश बंधुंनो 🙏
वास्तू संरक्षक यंत्र !
या विश्वात शेकडो वर्षांपासून भारत देशासहित इतर देशातील संस्कृतींनी सुद्धा शास्त्रीय वास्तू रचनेला फार महत्त्व दिलेले आढळते. या प्राचीन वास्तू शास्त्र संमत रचना असलेले राजवाडे, महाल, किल्ला, पुल, स्मारक, तुरुंग इत्यादी जगातल्या अनेक आश्चर्यानमध्ये गणल्या जातात. इजिप्त मधील पिरॅमिड, आग्रा येथील ताजमहाल, केरळ येथील पद्मनाभ स्वामी मंदिर इत्यादी ही त्याची उदाहरणें आहेत.
या वास्तू निर्माण करताना मुख्य अष्ठ दिशा, वास्तू रचनेसाठी वापरली जाणारी वाळू,माती, धातू इत्यादींचा विचार केला जायचा. सोबतच त्या काळातल्या उन्नत तांत्रिकाकडून वास्तूचे बंधन केले जायचे, जेणेकरून त्या वास्तूतील सात्विक ऊर्जा, धन संपत्ती, आरोग्य कायम टिकून राहावे.
हे वास्तू संरक्षक बंधन वास्तूच्या पायाभरणी वेळी अनेक दुर्मिळ वनस्पती, सामग्री, धातू, रत्ने, यंत्र वगैरे ठेवून आणि यज्ञ अनुष्ठान करून पुढील वास्तू निर्माण कार्य केले जायचे.
आजच्या काळात नवीन घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कोणी फ्लॅट घेण्यास इच्छुक असतात तर कोणी प्लॉट घेऊन बंगला बांधण्याची इच्छा ठेवतात, पण ज्या वास्तूत आपण राहायला जाणार आहोत ती वास्तू योग्य जागेत बांधली गेली आहे का ??? याला फार महत्त्व आहे.
पूर्वीच्या काळी काही ठिकाणी स्मशान व्यवस्था नसल्याने मृत पावलेले मनुष्य, पशू ठराविक जागीचपुरले जायचे व त्यांचा अंत्यविधी त्याच जागी केला जायचा. अश्या जागा दूषित आणि बाधित असतात. अलीकडच्या काळात शहरीकरण झाल्यामुळे या बाधित जागेवर सुद्धा लोकांनी फ्लॅट / बंगले बांधले. ह्या लोकांना तिथे सतत आजारपण, दारिद्र्य, पारिवारिक क्लेशाला सामोरे जावे लागले असा अनेकांचा अनुभव आहे.
आजच्या युगात पारंपरिक वास्तूशास्त्र खेरीज वास्तू संरक्षक बंधन सारख्या विधीकडे कोणी लक्ष देत नाहीत.
वैदिक वास्तूशांती प्रमाणेच नाथ पंथीय साधनेत सुद्धा वास्तू शांती, वास्तू संरक्षण बंधन सारख्या साधना विधी नाथांनी निर्माण केल्या आहेत व आजही गुरू शिष्य परंपरा प्रमाणे साधकांकडे जीवित आहेत.
या वास्तू संरक्षक साधना विधी द्वारे घरातील समस्त नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्तींचा वास, अभीचार प्रयोग इत्यादी हळू हळू नष्ट होतात आणि घरात चैतन्य, सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदते.
सदर वास्तू संरक्षक यंत्र साधना विधी ""अनामिक आत्मनुभुती केंद्र"" च्या साधकांद्वारे अनुष्ठान करून सिद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संपन्न केली जाते.
# ही संरक्षक यंत्र साधना विधी कोणत्याही पद्धतीत बांधलेले घर, ऑफिस, दुकान इत्यादीसाठी केली जाऊ शकते.
# या विधीला यजमानाने कुठलेही पूजा साहित्य आणण्याची किंवा पूजा करण्याची गरज नाही अथवा कुठेही येण्या जाण्याची गरज नाही.
# या वास्तू संरक्षक यंत्र साधनेला कोणतेही खान पान, मासिक धर्म, सोयर सुतक पाळण्याची गरज नाही.
टीप :- सदर वास्तू संरक्षक यंत्र साधना विधी ही नाथ पंथीय गुरू शिष्य परंपरेतील शुद्ध आणि सात्विक पद्धतीने संपन्न केली जाते. आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेचे समर्थन करीत नाही. वास्तूतील विविध समस्येने ग्रस्त व्यक्तींनीच कृपया संपर्क करावा, उगाच फालतू टाईमपास म्हणून आमचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नये, स्वतःच्या कल्याणाकडे लक्ष द्यावे 🙏
© अनामिक आत्मनुभुती केंद्र
(Anamik Paranormal Research Centre)
संपर्क - 9970706573 सायं 6 ते 10
® ०१/०७/२०२२
कृपया आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा:-
https://www.facebook.com/anamiksadhak/
आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा:-
https://www.instagram.com/p/CemDCfUvvwqhaVjRo7KZ_6RPF2Wu_H3DW0fRCU0/?igshid=YmMyMTA2M2Y=