06/02/2025
श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॅास्पिटल ,कामोठे तर्फे आयोजित
आयुर्वेदिय शरिरशुद्धी – वमन उपचार शिबिर
शरिरात आजार निर्माण कसे होतात ?-
वेळेवर जेवण न करणे , भुक नसताना केवळ समोर आवडीचा पदार्थ आहे म्हणुन भरपुर प्रमाणात खाणे , चहा चपाती, चहा बरोबर नमकिन बिस्किट्स /फरसाण खाणे, मलई चिकन ,बटर चिकन फ्रुट मिल्क शेक्स खाणे , जेवण झाल्यावर आईस्क्रिम्स खाणे , केळाचे शिकरण , दररोज दही , लोणचे ,दह्याचे ताक इ विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्रित खाणे, मैद्याचे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स , विनाकारण एलॉपीथिक औषधे ( डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय) खुप दिवस घेणे, सतत पॅकिंग अन्न /हॉटेलमधील अन्न खाणे ,व्यायाम न करणे , दिवसा जेवल्यानंतर झोपणे , रात्री विनाकारण जागणे , सतत गाडीवर लांबचा प्रवास करणे , सतत थंड पाण्याने स्नान करणे इ. विविध कारणांनी शरिरात विषारी पदार्थांची निर्मिती होऊन विकृत कफस्वरुपात वा पित्तस्वरुपात साठायला सुरुवात होते . हे विषारी पदार्थ शरिरात प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास शरिराचे नैसर्गिक पचनक्रिया वा चयापचय क्रिया बिघडवायला सुरुवात करतात . त्याचा दुष्परिणाम आतड्यांच्या मधील पचनव्यापारावर होऊन भुक मंदावते व पोट साफ होण्याच्या तक्रारी सुरु होतात . त्यातुन गॅसेस ,मलावष्ट्म्भ , पोटदुखी आम्लपित्त ,मुळव्याध यांसारखी लक्षणे निर्माण होतात. वेळिच या विषारांचा शरिराबाहेर निचरा न झाल्याने आजारांची निर्मिति होण्यास सुरुवात होते .
हे विषारी पदार्थ शरिराबाहेर काढुन टाकण्यासाठी आयुर्वेदामध्ये पाच प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्यांनाच “पंचकर्म” संबोधले जाते . त्यापैकी उलटीद्वारे हे विषारी पदार्थ वाहेर काढुन टाकण्याच्या प्रक्रियेला “वमन” असे म्हणतात .
वमन पंचकर्म ही आयुर्वेदातील एक महत्त्वपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शरीरातील कफदोष तोंडावाटे बाहेर काढला जातो. ही प्रक्रिया विशेषतः कफवृद्धीजन्य आजारांमध्ये उपयुक्त ठरते.
वमन पंचकर्माची प्रक्रिया:
1. पूर्वकर्म (तयारी):
• स्नेहन (तेल लावणे): रुग्णाच्या प्रकृतीनुसार ३ ते ७ दिवस औषधीयुक्त तूप किंवा तेल पाजले जाते. यामुळे शरीरातील दोष मृदू होतात.
• स्वेदन (शेक): स्नेहनानंतर संपूर्ण शरीराला औषधीयुक्त वाफेने शेक दिला जातो, ज्यामुळे दोषांचे संचय जठराकडे (पोटाकडे) सरकतात.
2. प्रधानकर्म (मुख्य प्रक्रिया):
• वमनाच्या दिवशी सकाळी रुग्णाला उलटी आणण्यासाठी योग्य औषध दिले जाते. हे औषध वैद्यांच्या देखरेखीखाली दिले जाते.
3. पश्चात्कर्म (नंतरची काळजी):
• वमनानंतर रुग्णाला काही दिवस विशेष आहार आणि पथ्यांचे पालन करावे लागते, ज्यामुळे शरीराची पुनर्बांधणी होते.
वमन पंचकर्माचे फायदे:
• सतत होणारी सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, दमा (अस्थमा) यांसारख्या कफवृद्धीजन्य आजारांमध्ये उपयुक्त.
• साइनसचा त्रास, डोकेदुखी, सतत सर्दी होणे, ॲलर्जी कमी करण्यासाठी मदत करते.
• सतत होणारे अपचन, अजीर्ण, आम्लपित्त यांसारख्या पचनासंबंधी तक्रारींमध्ये लाभदायक.
• त्वचारोग, सोरायसिस, पांढरे कोड यांसारख्या त्वचेच्या आजारांमध्ये उपयुक्त.
• स्थूलता कमी करण्यासाठी मदत करते. वंध्यत्व / मुल न होणे , ट्युब ब्लॉक असणे , पिसीओडी इ. विकारात उपयोगी
• प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सहाय्य करते.
वमन पंचकर्माची प्रक्रिया तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावी. स्वतः करण्याचा प्रयत्न केल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे, आपल्या आजारानुसार आणि प्रकृतीनुसार वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आम्ही आमच्या श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारची पंचकर्म चिकित्सा मागील २३ वर्षांपासुन करित आहोत .
सर्वसाधारणपणे वसंतऋतु सुरु झाल्यावर म्हणजेच फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान हे वमन कर्म केले जाते .
आपणही हे वमन कर्म करण्यास उत्सुक असल्यास आम्हाला खालील पत्त्यावर संपर्क करु शकता. तसेच प्रथम नावनोंदणी केलेल्या २५ रुग्णांसाठी ही वमन चिकित्सा रु. १८०००/- ऐवजी २५% सुट मध्ये म्हणजेच रु.१३५००/- ( रु.५००/- नोंदणी शुल्क व रु.१३०००/- प्रक्रिया शुल्क ) मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.
संपर्कासाठी पत्ता :-
श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल
Dr Nitin Thorat MD(Ayu)
shop no. 4,5 & 6, Pushp Corner society,
plot number 76,77, sector 12, near Krishna hotel Kamothe Navi Mumbai Mobile 9867980769
9221596970.
Timings- morning 9.30-1.30 & at evening 5:30 to 9:30pm
(Sunday by prior appointment)
https://maps.app.goo.gl/bxACcMDe7dfZP5zY8