27/07/2023
*संजीवन मेडिकल सेंटर व रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने "बालिका जन्मोत्सव सोहळा" खूपच उत्साहात संपन्न झाला. स्त्री जन्माचे स्वागत म्हणजेच "बालिका जन्मोत्सव सोहळा" हा आज दुपारी 'संजीवन हॉस्पिटल' येथे खूप उत्साहात संपन्न झाला.*
*स्त्री भ्रूणहत्या ही समस्या कायमची आणि ताबडतोब बंद झाली पाहिजे यासाठी बालिका जन्मोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये 11 नवजात बालिका, त्यांच्या माता व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. त्यांची ओटी भरली, ड्रायफ्रुट्स दिले व रो अभय पवार आणि रो जगदीश वाघ यांच्या तर्फे सकस नाचणी सत्त्व देण्यात आले. यामध्ये मी स्त्री भ्रूणहत्या करणार नाही, आणि करू ही देणार नाही. तसेच मी हुंडा घेणार नाही, आणि देणार ही नाही. अशी शपथ घेण्यात आली. मुलींच्या जन्माचे स्वागत केक कापून करण्यात आले.*
*या बालिका जन्मोत्सव सोहळ्यासाठी संजीवन हॉस्पिटलचे रो डॉ. विजयसिंह पाटील, डॉ. योगिता पाटील, रो डॉ. भाग्यश्री पाटील व त्यांचे आई वडील असा संपूर्ण परिवार उपस्थित होता.संजीवन हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफचे खूप सहकार्य लाभले.त्यांचे खुप खूप आभार. या सोहळ्यासाठी कराड शहर पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे , हजारमाची PHC च्या मेडिकल ऑफिसर डॉ सुनिता पाटील , लायन्स क्लबच्या विद्या मोरे , इंनरव्हील क्लब ऑफ कराडच्या प्रेसिडेंट सीमा पुरोहित व सेक्रेटरी डॉ. अर्चना औताडे , इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंट तरुणा मोहिरे , सेक्रेटरी छाया पवार , व्हॉइस प्रेसिडेंट माहेश्वरी जाधव, श्रुती जोशी , उद्योगिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनल भोसेकर , सारिका पाटील , प्रेमल शहा , यांची प्रमुख उपस्थिती होती. क्लब चे सदस्य रो. डॉ श्रुती शहा, रो. चंद्रकुमार डांगे, रो गजानन माने,रो राजू खलीपे,रो.आनंदा थोरात आणि मी रो बद्रीनाथ धस्के उपस्थित होतो. सूत्रसंचालन रो.किरण जाधव यांनी केले तर आभार रो.शिवराज माने यांनी मांडले.*