
30/12/2024
#पॅरालीसीस/ #अर्धांगवायू/ #पक्ष्याघात
वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार पॅरालीसीस/अर्धांगवायू/पक्षाघात त्रास हा प्रामुख्याने मेंदूचा आजार आहे. ह्रदयातून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अतिरक्तदाबामुळे फुटल्या किंवा शरिरातील चरबीमुळे बंद झाल्या की मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो. अशावेळी रक्तपुरवठा बंद झालेला मेंदूचा भाग निकामी होऊन त्याचा संपूर्ण शरिराच्या कार्यावर घातक परिणाम होतो. शरिराचा संबंधित भागाला काही प्रमाणात अपंगत्व येते. यालाच वैद्यकीय भाषेत पॅरालीसीस/अर्धांगवायू/पक्षाघात म्हणतात.
पॅरालीसीस/अर्धांगवायू/पक्षाघात हा भारतातील मृत्यू व अपंगत्वासाठी कारणीभूत आजारांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर २५ वर्षांवरील ४ पैकी एका प्रौढ व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये पक्षाघाताचा झटका आलेला आहे. दरवर्षाला १.८ दशलक्षाहून अधिक लोकांना पॅरालीसीस/अर्धांगवायू /पक्षाघाताचा झटका येतो आणि अलीकडील काळामध्ये देशात या आजाराच्या प्रमाणात ७० ते ८०टक्के वाढ झाली आहे. या आजारामध्ये रक्ताच्या गाठी किंवा रक्तस्रावामुळे मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येतो, यामुळे मेंदूला दुखापत होत पॅरालिसीस आणि इतर परिणाम होऊ शकतात.
पॅरालीसीस/अर्धांगवायू/ पक्षाघाताचा झटक्यादरम्यान वेळ अत्यंत महत्त्वाची असते. या स्थितीमध्ये असंतुलन किंवा चक्कर येऊ शकते, यामुळे स्थिती बिकट होऊ शकते. जलद हस्तक्षेपामुळे व्यक्तीच्या जगण्याची शक्यता वाढू शकते आणि दीर्घकाळापर्यंत अपंगत्व येण्याचा धोका कमी होऊ शकतो. जीव वाचवण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे पक्षाघाताचा झटक्याची लक्षणं आणि चिन्हं ओळखणं.
पॅरालीसीस/अर्धांगवायू/पक्षाघाताची लक्षणं
पॅरालीसीस/अर्धांगवायू /पक्षाघाताच्या तीव्रतेनुसार लक्षणं सूक्ष्म किंवा गंभीर असू शकतात. मदत करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या लक्षणांकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे हे माहीत असलं पाहिजे.पॅरालीसीस/पक्षाघाताची चेतावणी देणारी लक्षणं तपासण्यासाठी या पद्धतीचा वापर करा. ही पद्धत पुढीलप्रमाणे आहे...
चेहरा- चेहरा सुन्न झाला आहे का किंवा एका बाजूला झुकला आहे का?
हात- एक हात दुसऱ्या हातापेक्षा सुन्न किंवा कमकुवत झाला आहे का? दोन्ही हात उचलताना एक हात दुसऱ्यापेक्षा खाली राहत आहे का?
बोलणं- बोलणं अस्पष्ट झालं आहे का किंवा बोलताना अडखळत आहे का?
वेळ- यापैकी एका प्रश्नाचं उत्तर होय असेल तर त्वरित आपत्कालीन सेवांना बोलवण्याची वेळ आली आहे.
इतर लक्षणं
अस्पष्ट दिसणं, दृष्टी अधू होणं किंवा दृष्टी जाणं, विशेषत: एका डोळ्याची
शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणं, अशक्तपणा किंवा बधीरपणा
मळमळ-मूत्राशय किंवा आतड्यांवरील नियंत्रण कमी होणं
डोकेदुखी -चक्कर येणं किंवा हलक्या स्वरूपात डोकेदुखी,संतुलन किंवा चेतना गमावणं
तुम्हाला किंवा आसपासच्या व्यक्तीला
पॅरालीसीस/पक्षाघाताचा झटका आल्यास...
#रूग्णवाहिका बोलवा. #
रूग्णाला आरामदायी व सुरक्षित स्थितीमध्ये ठेवा.
त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू आहे की नाही हे तपासा. जर श्वासोच्छ्वास सुरू नसेल तर सीपीआर करा. त्यांना श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल तर टाय किंवा स्कार्फ यासारखे घट्ट कपडे सैल करा.
शांतपणे व आश्वासक पद्धतीनं बोला.
त्यांना खाण्यास किंवा पिण्यास काही देऊ नका.
जर व्यक्तीला शरीरामध्ये अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांना चालवू नका.
व्यक्तीचं काळजीपूर्वक निरीक्षण करून स्थितीमधील कोणत्याही बदलाची तपासणी करा. आपत्कालीन सेवांना त्यांची लक्षणं सांगा आणि व्यक्ती चक्कर येऊन पडली असेल किंवा डोक्याला मार लागला असेल तर त्याबाबतदेखील सांगा.
पॅरालीसीस/पक्षाघाताचा झटका येत असताना लक्षणं सौम्य किंवा टाळता येऊ शकतील अशी असली तरी वेट-अँड-वॉचची भूमिका घेऊ नका. स्ट्रोकमुळे एका मिनिटात मेंदूतील दोन दशलक्ष पेशी मृत पावतात. प्रतितास मेंदूचं वय ३.६ वर्षांनी वाढतं. जवळपास ८५ टक्के पक्षाघाताचे झटके मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये अचानक अडथळा आल्यामुळे होतात. याला अक्यूट इस्केमिक स्ट्रोक्स (एआयएस) म्हणतात. म्हणून जलद कृती करणं आवश्यक आहे, कारण एआयएसने पीडित रूग्णांवर झटका आल्यानंतर ३ ते ४.५ तासांच्या 'विंडो पीरियड'मध्ये उपचार करणं आवश्यक आहे.
पॅरालीसीस/अर्धांगवायूचा त्रास होऊ नये म्हणून दैनंदिन जगण्यात काय करावे?
1. दररोज कमीत कमी 30 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करावा
2. जेवणात अजिबात वरुन मीठ घेऊ नये
3. दररोज कमीत कमी एक तरी फळ खावं
4. जेवणात दररोज एक तरी हिरवी भाजी खावी
5. कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन करु नये
6. अजिबात दारू पिऊ नये
वाढलेल्या वयासोबत आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवतात. त्यामुळे अशास्थितीत आजारांचं शरिरावरील आक्रमण अधिक वेगानं होतं. म्हणूनच वरील गोष्टीसह अन्य काही गोष्टी करणे देखील आवश्यक आहे. त्यानुसार नियमित रक्तदाब (Blood Pressure-BP) तपासायला हवा. जर रक्तदाबाचा त्रास असेल तर त्याचं रुपांतर अर्धांगवायूमध्ये होण्याचा धोकाही वाढतो. म्हणूनच अशावेळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित न चुकता, न विसरता वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे रक्तदाबावरील औषधे घ्यावीत.
पॅरालीसीस/अर्धांगवायूचा धोका कमी करण्यासाठी काय करावं?
1. नियमितपणे शरिरातील साखरेचं प्रमाण तपासावं
2. साखरेचा त्रास आढळ्यास त्याला नियंत्रित करणारी औषधे नियमितपणे घ्यावीत
3. नियमीत रक्तदाब (Blood Pressure) बीपी तपासावे
4. रक्तदाब सामान्य पेक्षा जास्त असेल तर त्वरीत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जर एखाद्या रुग्णाला
पॅरालीसीस/ अर्धांगवायूचा त्रास आधी झाला असेल तर त्यांनी पुन्हा होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे हा धोका कमी करणारी औषधे नियमित घेणे अत्यावश्यक आहे
पॅरालीसीस/अर्धांगवायू/पक्ष्याघात/लकवा चा झटका येवून गेल्यावर बऱ्याच रुग्णामध्ये
एक हाथ,एक पाया मधील ताकत कमी होणे
दोन्ही हाथ,दोन्ही पाया मधील ताकत कमी होणे
तोंड वाकडे होणे
या सारखी लक्षणे दिसतात, वरील पैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यावर त्वरीत उपचार करावे लागतात कारण वरील लक्षणे पूर्ववत् होण्यासाठी मिळणारा अवधी हा सरासरी तीन महिन्याच्या असतो नंतर मात्र लक्षणे पूर्ववत् होण्यास फार वेळ लागतो.
वरील लक्षणे पूर्ववत् करण्यास व दीर्घकाळापर्यंत येणारे अपंगत्व टाळण्यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा फार फायदा होतो, तसेच आयुर्वेद उपचारा बरोबर ॲक्कुप्रेशर, ॲक्कुपंक्चर, होमिपॅथिक औषधे यांचा तज्ञ डॉक्टरांच्या मारगदर्शनाखाली संयुक्त उपचार केल्यास वरील लक्षणे पूर्ववत् होण्यासाठी फायदा होतो
*पॅरालीसीस/अर्धांगवायू वर संपूर्ण सुरक्षीत आयुर्वेदिक व संयुक्त उपचार करणारे एकमेव सेंटर..*
जीवनज्योत "डॉ पाटील" स्पाईन व पॅरालीसीस केअर सेंटर, मसूर किवळ रोड, मसूर ता कराड जि सातारा 415106
अधिक माहितीसाठी संपर्क
961 351 3333 / 961 451 096135 13333