Ganga Ayurvedic

Ganga Ayurvedic बेस्ट आयुर्वेदिक प्रॉडक्ट

निरोगी टाळू आणि चमकदार केसांसाठी उपयुक्त (Promotes healthy scalp and shiny hair)नैसर्गिक कंडिशनर म्हणून एरंडेल तेल वापरल...
29/07/2024

निरोगी टाळू आणि चमकदार केसांसाठी उपयुक्त
(Promotes healthy scalp and shiny hair)
नैसर्गिक कंडिशनर म्हणून एरंडेल तेल वापरल्याने कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना मॉइश्चरायझर प्रदान करते. बहुतेक लोक नियमितपणे केसांना एरंडेल तेल लावतात.
हे केसांच्या शाफ्टला मजबूत करते. परिणामी केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. जर तुमच्या केसांत कोंडा होत असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा एरंडेल तेलाने मसाज करणे फायद्याचे ठरेल. हे टाळूला मॉइश्चरायझ करून जळजळ आणि फ्लॅकिंग कमी करण्यास उपयुक्त ठरते.

मधमाशीपालकांना प्रोत्सहन मिळावे यासाठी  मधुमित्र पुरस्कार महाराष्ट्र शासन खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई मध संचनालयाच्या ...
28/06/2024

मधमाशीपालकांना प्रोत्सहन मिळावे यासाठी मधुमित्र पुरस्कार महाराष्ट्र शासन खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई मध संचनालयाच्या वतीने देण्यात येतात या वर्षाचा राज्यस्तरीय मधु मित्र पुरस्कार मला दिनांक 25 जून ला मंडळाचे सभापती राज्यमंत्री रवींद्र साठे साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला मॅडम (भा प्र से ) यांच्या हस्ते साखर संकुल पुणे येथे देण्यात आले. तरी या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल खादी व ग्राम उद्योग मंडळ महाराष्ट्र शासन मुंबई यांचे खूप खूप आभार

🪔 *लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश*, 🪔 *होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश*, *मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश*, *अस...
12/11/2023

🪔 *लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश*, 🪔 *होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश*, *मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश*, *असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास*. *दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.* 🙏🏻🏮🪷🪔🎉🎊🙏🏻

निरोगी टाळू आणि चमकदार केसांसाठी उपयुक्त (Promotes healthy scalp and shiny hair)नैसर्गिक कंडिशनर म्हणून एरंडेल तेल वापरल...
26/06/2023

निरोगी टाळू आणि चमकदार केसांसाठी उपयुक्त
(Promotes healthy scalp and shiny hair)

नैसर्गिक कंडिशनर म्हणून एरंडेल तेल वापरल्याने कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना मॉइश्चरायझर प्रदान करते. बहुतेक लोक नियमितपणे केसांना एरंडेल तेल लावतात.

हे केसांच्या शाफ्टला मजबूत करते. परिणामी केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. जर तुमच्या केसांत कोंडा होत असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा एरंडेल तेलाने मसाज करणे फायद्याचे ठरेल. हे टाळूला मॉइश्चरायझ करून जळजळ आणि फ्लॅकिंग कमी करण्यास उपयुक्त ठरते.

कडुलिंब ही औषधी वनस्पती आहे. आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा वर्षानुवर्षे उपयोग केला जातो. त्वचेशी स...
23/06/2023

कडुलिंब ही औषधी वनस्पती आहे. आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा वर्षानुवर्षे उपयोग केला जातो. त्वचेशी संबंधित विकार कडुलिंबामुळे कमी होतात. चेहऱ्यावरील मुरुम, सोरायसिस, खाज सुटणे इत्यादी समस्या कमी करण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरणे हा रामबाण उपाय आहे. या तेलामुळे केसांची वाढ देखील चांगली होते.
असंख्य लाभ मिळवण्यासाठी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये कडुलिंबाच्या तेलाचा समावेश करावा. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अमिनो अ‍ॅसिड आणि फॅटी अ‍ॅसिडचा समावेश आहे. या घटकांमुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. कडुलिंबातील औषधी गुणधर्मामुळे त्वचेवरील बॅक्टेरियांचा खात्मा होण्यात मदत मिळते.

मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे. Fuller's Earth Face Pack : मुलतानी माती नुकसानकारक बॅक्टेरि...
15/06/2023

मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे. Fuller's Earth Face Pack : मुलतानी माती नुकसानकारक बॅक्टेरिया, त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ-माती हटवण्यास मदत करतात. नियमितपणे मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्येवर मुलतानी उत्तम उपाय आहे.

तसं पाहायला गेलं तर केसांची काळजी 12 महिने घ्यावी लागते. पण उन्हाळ्यामध्ये केसांची खास काळजी घ्यावी लागते. कारण वातावरणा...
09/06/2023

तसं पाहायला गेलं तर केसांची काळजी 12 महिने घ्यावी लागते. पण उन्हाळ्यामध्ये केसांची खास काळजी घ्यावी लागते. कारण वातावरणातील उष्णतेमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेतला जातो. त्यामुळे केस रूक्ष होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे आपल्या स्काल्पवर असणाऱ्या तैल ग्रंथीमधून ज्यादा तेल बाहेर येते. यामुळे केसांच्या मुळांना इजा पोहोचण्याची दाट शक्यता असते.
स्काल्पवर या निर्माण होणाऱ्या अतिरिक्त तेलामुळेच आपले केस चिपचिप दिसू लागतात. त्याचप्रमाणे तेलकट केसांवर धूळ जमा होऊन कोंडा निर्माण होणे सारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. केसात कोंडा झाल्यास तुमचे केस कमजोर होतात आणि केसांचे तुटण्याचे प्रमाण देखील वाढते.
#100%natural

नाचणीचे सत्व अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच देण्यात येते. नाचणीतील अमिनो असिड आणि अँटीऑक्सिडंट गुण हे न...
07/06/2023

नाचणीचे सत्व अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच देण्यात येते. नाचणीतील अमिनो असिड आणि अँटीऑक्सिडंट गुण हे नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम देतात. तसंच मेंदूमध्ये होणाऱ्या चिंता, डोकेदुखी, अनिद्रा यासारख्या समस्यांवर नाचणी उपयुक्त ठरते.

चंदनमधील गुणधर्मांमुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. नियमित स्वरुपात चेहऱ्यावर चंदन पॅक लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्यानं च...
04/06/2023

चंदनमधील गुणधर्मांमुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. नियमित स्वरुपात चेहऱ्यावर चंदन पॅक लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि काळे डाग देखील दूर होतील. चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येण्यासाठी चंदनाचा (Chandan Benefits) फार पूर्वीपासून वापर केला जातो.

करंज तेल फायदे-करंज तेलाचे फायदे benefits of karnj oil1)बियांपासून निघणारे तेल करंजतेल प्रसिद्ध आहेत.2)करंज तेल जंतूनाशक...
31/05/2023

करंज तेल फायदे-करंज तेलाचे फायदे benefits of karnj oil
1)बियांपासून निघणारे तेल करंजतेल प्रसिद्ध आहेत.

2)करंज तेल जंतूनाशक गुणधर्म आहेत.

3)करंजीन व पॉन्गेमॉल’ जंतू नाशक द्रव्ये आहेत.

4)त्वचारोग, सर्पदंश, कृमी व दूषित जखमा भरून येण्यासाठी करंज तेल वापरले जाते.

5)साबण बनविण्यासाठीही आणि वंगण म्हणूनही याचा वापर तेलाचा करतात.

6)करंजाचे तेल कातडे कमाविण्यासाठी, वंगणासाठी व मेणबत्या बनविण्यासाठी वापरतात

7)तेलाचा उग्र गंध असून ते कडू असते.

मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे फायदे अनके आहेत. केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशी...
27/05/2023

मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे फायदे अनके आहेत. केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यासाठी उपयोग होतो. केसांची वाढ होण्यासाठी मोहरीच्या तेलातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा-3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिडचा उपयोग होतो. याशिवाय यामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल प्रभाव असतो जो केसातील कोंडा मिटविण्यासाठी उपयोगी ठरतो. यामुळे स्काल्पमध्ये येणारी खाजेच्या समस्येपासूनही सुटका मिळते. केसांसाठी मोहरीच्या तेलाचा खूपच फायदा होतो.

शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज...
25/05/2023

शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी

शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.

Address

Karad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganga Ayurvedic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ganga Ayurvedic:

Share