20/07/2024
#निरोगी #जीवनाची #पुष्टी
एखादा आजार ठीक होत नसेल किव्हा आजाराने आपण ग्रस्त असेल तर आपण सकारात्मक विचार मनात निर्माण न करता जास्तसे नकारात्मक विचार, आणि त्या आजाराच्या छायेत चिंताग्रस्त, त्या आजाराला कवटाळून बसतो. नेहमी डॉक्टराची औषधें शरीराला देत राहतो. या शिवाय आपण आणखीन काय करतो.?
हो!
कंटाळून कधी कुटूंबाला, कधी आपल्याला, कधी देवाला,तर कधी आजाराला दोष देतो.
याने या नकारात्मक वागण्याने आपल्या आजारात काही फरक पडतो का?
नाही.!
उलट आजार वाढतो, औषधे लागू पडत नाहीत.
का?
तरआपण या जीवनाशी आजाराशी सहमत न होता होतील तितके जास्त नकारात्मक विचार अवचेतन मनाकडे पाठवू लागतो. आणि तुम्ही जे पण अवचेतन मनात रजिस्टर करता तसेच ते तुम्हाला देत राहते.
यात दोषी आपणच असतो. आपण प्रत्येक वेळी संकटात, चांगल्या कामात, किव्हा जीवनाला फक्त नकारात्मक विचाराने भरत जातो.
असे करू नका.
जेव्हा तुम्हीच तुमचे जीवन मानसिक रित्या रोगग्रस्त करता त्यास देव कितीही करा, डॉक्टर कितीही करा, तांत्रिक भगत कितीही करा किव्हा संपूर्ण जग उलटवून टाका. सारे निष्फळ.
यास फक्त तुम्हीच ठीक करू शकता. कुठेही जाण्याची गरज नाही. जरी तो मानसिक विचाराने निर्माण झालेला असो की नैसर्गिक शारीरिक आजार असो. सर्वात पहिले आपले विचार पॉजिटीव्ह ठेवा, दृष्टी पॉजिटीव्ह ठेवा.म्हणजे अंतरमन पण तुम्हाला तसेच बहाल करीत जाईल.
आता दुसरे आपले महत्वाचे काम असो, ध्यान असो की डॉक्टर चें औषध यांची सुरवात करताना श्रद्धा आणि आत्मविश्वास पण महत्वाचा असतो.
एखादे औषध घेताना श्रद्धा पूर्वक हाच विचार मनात आणावा की या औषधाने मी ठीक होईनच. आणि आत्मविश्वास पण हाच ठेवावा की माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊन मी ठीक पण होईन.
आपल्या मनात जे नकारात्मक विचार येत असतात यांना डिलीट करत सकारात्मक विचार पेरावे. म्हणजे जे तुम्ही पेराल तेच तुम्हच्या मनाच्या शेतात उगवून तुम्हाला सुख शांती निरोगी पणाचे भरघोस पीक मिळेल.
सदैव पॉजिटीव्हच विचार करा. पॉजिटीव्ह विचारांना कवटाळून बसा. आणि त्याचाच दिवसभर विचार करा. म्हणजे अंतरमनातं जे निगेटिव्ह विचाराची घाण तुम्ही साठवून ठेवलेली आहे ती आपणहून नष्ट होत जावून मनाचा गाभारा शुद्ध होत जावून त्या पासून तुम्हाला दिव्य अनुभव मिळतील.
👉आजचे हे अफिरमेशन त्या लोकांसाठी आहेत. जे सदैव आजाराला घेऊन बसून सुखाला दूर ठेवत आहेत.
👉खरं तर डॉक्टर ची औषधे आपला आजार ठीक करत नसतात. ती फक्त आपला आजार रोखण्याचे बँकटेरिया रोखण्याचे काम करतात. बाकी आजार अवचेतन मन ठीक करत असते. पण त्यास काम करण्यास आपल्याला विश्रांती ची गरज असते. माणसाला आठ तास झोप यांचसाठी गरजेची असते. या आठ तासाच्या झोपेत अंतरमन शरीर रिपेरिंग चें काम करते. तिच्या फार्मशी मध्ये विष पण आहे. आणि डोपोमाईन, सेरेटोनीन सारखी अमृत हार्मोन्स पण आहेत.
खालील सात किव्हा आठ किव्हा आवडत असेल तर जास्त वाक्ये निवडून प्रत्येक वाक्य तीन वेळा सकाळी व रात्री21दिवस किव्हा नेहमी म्हणावे.
हो!
हा आफिरमेशन मंत्र जप सूरू केल्यावर निगेटिव्ह विचार मनात बिलकुल आणू नये. तसें केल्यास तुम्ही परत नकारात्मक विचार अंतर मनात स्टोर करता असाच अर्थ होईल. असे केल्यास आफिरमेशन चा काहीही फायदा होणार नाही.
#पुष्ठी affirmation 👇👇👇👇
मी प्रेम आणि समर्थनाने वेढलेला आहे.
मी राग आणि संताप सोडून देणे निवडतो.
माझ्या भावना वैध आणि महत्वाच्या आहेत.
या उपचार प्रक्रियेदरम्यान मी स्वतःशी सहमत आहे.
मी माझ्या आरोग्याच्या प्रवासावर विश्वास ठेवतो.
मी आनंद आणि आनंदासाठी पात्र आहे.
मी दररोज अधिकाधिक बरे होत आहे.
मी बरे होत असताना मी स्वतःवर धीर धरतो.
🌹
माझे आजार बरे होत आहे आणि मजबूत होत आहे.
मी नवीन निरोगी जीवनाच्या सुरुवातीसाठी खुला आहे.
मी माझ्यातील प्रेम आणि करुणा स्वीकारतो.
माझ्या सभोवतालच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.
मी माझ्या भावनांचा आदर करतो आणि त्यांना वाहू देतो.
मी सकारात्मक आणि मजबूत आहे.
मी भावनिक वेदनांपासून मुक्त आहे.
मी सुरक्षित आणि निरोगी आहे.
मी भीती सोडतो आणि शांततेचे स्वागत करतो.
🌹
मी सकारात्मक उर्जेने वेढलेला आहे.
मी माझ्या भावनिक जखमा भरत आहे.
मी प्रेम प्राप्त करण्यास तयार आहे.
मी सहानुभूती आणि समजून घेण्यास पात्र आहे.
मला माझ्या भावनिक वाढीचा अभिमान आहे.
मी भूतकाळ सोडून वर्तमानात जगतो.
मी शांत आणि प्रेमळ जीवनासाठी पात्र आहे.
मी भावनिकदृष्ट्या संतुलित आणि स्थिर आहे.
मी प्रेम आणि आशेचा किरण आहे.
मी माझ्या भावना व्यक्त करायला मोकळा आहे.
🌹
मी भावनिक वेदनातून बरे होत आहे.
मी भीतीपेक्षा प्रेम निवडतो.
मी जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे.
मला भावनिक उपचार प्रक्रियेवर विश्वास आहे.
मी सुखी आहे, मी निरोगी आहे.
मी बळकट आहे, मी पॉजिटीव्ह ऊर्जेने वेढलेलो आहे.
मी शांत आहे., मी आरोग्यवान आहे.
वरील वाक्ये तुम्हाला आवडतील तेवढी निवडा आणि ती वहीवर लिहून नेहमी वाचा.
Ashok Naik