
12/01/2025
भारतात रक्त कमी असण्याचे प्रमाण स्त्री व पुरुष दोघांमध्येही आहे. त्यात स्त्रिया आघाडीवर असण्याचे कारण म्हणजे अति कष्टाची कामे, बाळंतपणं, विविध शस्त्रक्रिया, मासिक पाळी. त्यातही स्वतःच्या शरीराकडे लक्ष कमी देणे, पुरेसा आहार न घेणे हेही जोडीला आहे. पुरुषांचे ही अतिकष्टाची कामे, पुरेसा आहार न घेणे हे आहेच. या व्यतिरिक्त काही जणांना मूळव्याध, विविध अल्सर, संधिवात, प्रतिकार शक्ती कमी असणे अशा कारणांमुळे देखील रक्त कमी होत असते.
रक्त कमी असल्यामुळे सतत अशक्तपणा, चक्कर येणे, धाप लागणे, जखम लवकर भरून न येणे असे त्रास होतात. त्याकरिता नियमित आपले रक्त तपासून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. देसाई हॉस्पिटलमध्ये हिमोग्लोबिन तपासणी शिबीर बुधवारी, १५ जानेवारी २०२५ रोजी दु. १२ ते ४ या वेळेत आहे. सर्वांनी या शिबिराचा नक्की फायदा घ्यावा व आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.