
26/04/2025
*Rotary International's Mega surgical camp at Jammu and Kashmir*
*जवळपास 700 च्या दरम्यान मोफत शस्त्रक्रिया या शिबिरात करण्यात आल्या*....
🚑🏥🕶️🩺💊💉🩸
यामध्ये मोतीबिंदूच्या 🕶️ शस्त्रक्रिया सर्वात जास्त करण्यात आल्या, त्याचबरोबर पित्ताशयाच्या खड्याच्या, गर्भाशयाच्या पिशवीचे, हर्निया, अपेंडिक्स, त्याचबरोबर काही गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया ही करण्यात आल्या....🩸🚑
देशभरातून जवळपास 24 डॉक्टर्स 🩺व काही volunteers या प्रकल्पामध्ये सहभागी झाले होते...
*जम्मू कश्मीर चे राज्यपाल महामहिम आदरणीय श्री मनोज जी सिन्हा साहेब* यांच्या आमंत्रणावरून व जम्मू अँड काश्मीरच्या आरोग्य विभागाच्या 🏥 तसेच संपूर्ण प्रशासनाच्या मदतीने हा मेगा सर्जिकल कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण झाला.
Doda, Bhadarwah and Ksh*twar या तीन ठिकाणी विभागून ही ऑपरेशन 💉 करण्यात आली.
सोलापूर चे PDG रो.डॉ. राजीव प्रधान व पनवेलचे PDG रो.डॉ. गिरीश गुणे
यांनी जम्मू येथील काही रोटरी सदस्यांच्या मदतीने जम्मू अँड काश्मीरच्या प्रशासनाला सोबत घेऊन या सर्वांच्या सहकार्याने हा मेगा सर्जिकल कॅम्प यशस्वी करण्यात आला....
*पहेलगाम येथील हल्ला सुरू असताना देखील आम्ही डॉक्टर्स ऑपरेशन थेटर मध्ये आमचं काम करत होतो* आम्हाला याची काहीही कल्पना नव्हती.....
हल्ला झाल्यानंतर आम्ही काही नागरिकांची प्रतिक्रिया देखील घेतली , आमच्या सोबत असणारे काही ड्रायव्हर्स यांनी देखील बोलून दाखवलं की अशा प्रकारचे भ्याड हल्ले ☹️अतिशय चुकीचे आहेत. आत्तापर्यंत आम्ही याच्यात भरडले आहोतच आणखी किती दिवस भरडले जाणार आहोत?😞 हा सवाल त्यांनी आम्हालाच केला ....हे लोक देखील अशा भ्याड हल्ल्यांमुळे पुन्हा पुन्हा दारिद्र्याच्या दरीत ढकलले जात आहेत.....😳
एक ही *बारा वर्षांची मुलगी 👆🏻.... आज पर्यंत तीनं शाळा 📘📚 बघितली सुद्धा नाही*.. रानावनात, पहाडांमध्ये , फिरत असताना तिच्या डोळ्याला इजा लागून तिला मोतीबिंदू झाला 👀...पूर्ण पिकलेला होता... आम्ही जर तिथे पोचलो नसतो तर ही बिचारी त्या डोळ्यांनी पूर्णपणे अंध झाली असती...
एका गृहस्थांना पहिल्यापासून एकच डोळा आहे आणि त्या डोळ्याला देखील गेली तीन वर्ष दिसत नव्हतं... केवळ ते या आशेवर होते की कोणीतरी इथे येईल आणि शासनाच्या माध्यमातून आम्हाला मोफत शस्त्रक्रिया करून पुन्हा दृष्टी प्रधान करेल..
शस्त्रक्रिया 💉 झाल्यावर जेव्हा त्यांना पुन्हा दृष्टी 🕶️आली , तेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या डोळ्यातिल आनंदाश्रू तरळले ते मन हेलावणारे होते...😔
असे एक ना अनेक मान हलवणारे प्रकार आम्हाला गेल्या चार वर्षांमध्ये आढळून आले आहेत....😔😳
भारताच्या एकात्मकेसाठी आणि जम्मु-काश्मिरमधील जनतेला मुख्य विकासाच्या प्रवाहात सामावुन घेण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातुन तेथे जावुन आमच्या डॉक्टरांच्या टीमने ७०० हुन अधिक शस्त्रक्रीया केल्या. मात्र त्याचदरम्यान तेथे दहशतवादी हल्ला होवुन आपले अनेक बांधव मारले गेले....😰
आम्ही एकीकडे माणुसकीची बीजे रोवुन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणत असताना असा दहशतवादी हल्ला झाल्याने मनाला खुप वेदना झाल्या.....
*या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली*🙏🏻🙏🏻
जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳