
02/08/2022
गडावर गेल्यावर सरबत - २० रुपये , काकडी - २० रुपये हे ऐकलं की काही जणांचे डोळे पांढरे होतात ( स्वानुभव )
बरं का हीच मंडळी ADIDAS ची बूट घालून आलेली असतात. ( सगळ्यांनी मनाला लावून घेऊ नये 😊 )
कधी MAcd , Dominoz मध्ये गेल्यावर
' अरे , इतकं महाग का आहे ? ५ रुपये कमी कर ना ' अस कधी बोलला आहात का शेट तुम्ही?
बरं सह्याद्रीत आल्यावरच हे सगळं तुम्हाला कसं सुचत ओ
कोथळीगडावरचा हा फोटो आहे ही लेकरं भर पावसात लिंबू सरबत इकत हुती पावसात लिंबू सरबत कोण पितय का सांगा आता 😜 , पण बळबळ ४ ग्लास घेतल.
कारण , एकच ' ही लेकरं फक्त जगत नाहीयेत ओ , बाकीच्या सोयी सुविधा सोडाच निव्वळ जगण्यासाठी ह्या कोवळ्या वयात ह्यांचा अविरत प्रयत्न सुरूय '
आता इतकं वाचलं असेल तर गडावर गेल्यावर काय करावं हे वेगळं सांगायची गरज नाहीये 😎
हो आणि ते चार ग्लास सरबत पिण्यासाठी नाही फोटोत तुम्ही बघतात ना गोंडस हसू त्यासाठी घेतले होते 😍
( फोटोतील चिमुकली लपवून काकडी खात होती. कॅमेरा समोर पण येत नव्हती , पण ५-१० मिनिटे तिच्याशी बोलल्यावर मग खुलू लागली. अग हस,अग हस अस ५-६ वेळा बोलल्यावर मग तिने ही गोड स्माईल दिली 😍😘)
#कोकणस्थ
Nitin More NM