17/05/2023
शारदा क्लिनीक एरम हॉस्पीटल, कऱ्हाड येथे ८२ वर्षाच्या वृध्द महिलेला चालताना दम लागत असल्याची तक्रार घेऊन रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांची तपासणी केली असता हृदयाची एक झडप खराब झाली होती. ही झडप बदलण्याची गरज होती मात्र त्याकरिता रुग्ण व त्याचे कुटुंबिय तयार नव्हते. या रुग्णाला पारंपारीक शस्त्रक्रिया न करता मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेचा पर्याय सुचविण्याच आला. मिनिमल इन्व्हेसिव्ह ही हृदयाची शस्त्रक्रिया हा विविध प्रकारच्या हृदयरोगाशी सामना करण्यासाठी व्यापकपणे वापरला जाणारा सुरक्षित असा पर्याय आहे.
पारंपारीक शस्त्रक्रियेशी तुलना करता, कमीत कमी आक्रमक (किमान छेद) हृदय शस्त्रक्रिया कमी वेदना आणि रुग्णांना जलद दैनंदिन आयुष्य सुरुवात करण्यात मदत करते. रुग्णाचे वाढते वय पाहता मिनिमल इन्व्हेसिव्ह हा सुरक्षित पर्याय असल्याचे कऱ्हाड येथील शारदा क्लिनीक एरम हॉस्पीटलचे कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ किशोर देवरे यांनी स्पष्ट केले. केवळ चार सेंटीमीटरचा छेद घेऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या दोन दिवसातच या रुग्णाने स्वतःच्या पायावर उभा राहिल्याचे डॉ किशोर देवरे यांनी स्पष्ट केले.