10/12/2022
आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी आयोजित केलेला सन्मान सोहळा. श्री. संत कचरनाथ स्वामी कार्यगौरव पुरस्कार सोहळा- 2022-23
-- दत्त जयंती च्या पावन प्रसंगी हजारो लोकांच्या उपस्थिती मध्ये हा सन्मान सोहळा रंगला. आजपर्यंत च्या निस्पृह पणे सामाजिक(शिक्षण) व संगीत क्षेत्रात काम करणारे श्री. दामोदर दिनकर अडसुळ व संगीत विशारद गोरख (आण्णा) तुपे यांना एकत्रित पणे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्याचे नियोजन आदरणीय गुरुवर्य अमृत (अण्णा) यांनी माझ्यावर टाकले आहे. हा पुरस्कार सोहळा संपन्न होत असताना ज्यांना हा पुरस्कार प्रदान केला त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह पाहून मला आपण निश्चित काही योग्य करू शकलो आहे ही भावना निर्माण झाली. आध्यात्मिक क्षेत्राने- सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रेरणा देणे, त्यांच्या कार्याच कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविण्याचे जे कार्य कचरनाथ सेवा मंडळ करत ते कौतुकास पात्र असल्याची भावना मा.आ. रोहित(दादा)पवार यांनी मंचावर व नंतर जेवणासाठी बसल्यावर दोन्ही ठिकाणी बोलून दाखवली. निश्चित आपल्या सद्गुरू च्या विचारांची कीर्ती सर्वदूर पोहचविण्यासाठी संत कचरनाथ स्वामी कार्यगौरव पुरस्कार हे माध्यम होईल. ह्यावर मला विश्वास आहेच. त्याचबरोबर आजपर्यंत सन्मानित केलेल्या व्यक्तींच्या कार्याला सामाजिक स्तरावर अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे मोठं काम याच माध्यमाने केले आहे व करत राहील. कोणत्याही कॉर्पोरेट सोहळ्यात टेबलामागून काही देऊन मंचावर कौतुक अस काही आमच्याकडे नसतं समाजात जे दिसत त्यावर कचरनाथ सेवा मंडळाचे सहकारी लक्ष ठेऊन असतात. त्या लोकांना शोधून त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांची मुलाखत, त्याचा Biodata घेऊन नंतर त्यावर अण्णांच्या मार्गदर्शनात एकत्र बसून व्यक्ती योग्य आहे का यावर विचार करून हा सन्मान केला जातो. त्यामुळेच आजवर सन्मान केलेल्या व्यक्तीचा कामाचा आलेख हा उंचावलेला व कर्तृत्व संपन्न जाणवतो. एकूणच ह्या सुंदर सोहळ्याला दत्तजयंती उत्सवाच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमात शेवटी आ. रोहित(दादा) पवार सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून पोहचले. भारावून गेलेल्या क्षणी हा पुरस्कार सोहळा लोकांची प्रचंड गर्दी अण्णांच्या भेटीसाठी झालेली गर्दी या सगळ्यात सन्मानित व्यक्तीचे मनोगत आम्ही व्यक्त करायला संधीही देऊ शकलो नाहीत . परंतु चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जात होता....!!!
असो एकूणच भगवान दत्तगुरु चा जन्म सोहळा, भजन व पुरस्कार प्रदान सोहळा असा सामाजिक व आध्यत्मिक मिलाप असणारा कार्यक्रम आनंददायी पद्धतीने संपन्न झाला. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी कचरनाथ सेवा मंडळाच्या प्रत्येक सेवा भावी सदस्यांनी अपार कष्ट घेतले, प्रसाद बनविणारे, मंदिरातील व्यवस्था पाहणारे , त्यानंतर वाढण्याची सेवा करणारे अशी असंख्य लोक हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटतात. अश्या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी ऐनवेळी माझ्यावर आली. सद्गुरू अमृत(आण्णा) व बाबांच्या कृपाशीर्वादाने अत्यंत उत्तम निवेदन केल्याची भावना लोकांनी बोलून दाखवली.
असो.
मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु।
म्हणऊनि विशेष *अत्यादरू | विवेकावरी ॥
या संत ज्ञानोबा नी गुरुकृपा झाल्यावर काय होते . या संदर्भात ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख केलेल्या ओळींचा प्रत्येय मला येऊन गेला हे नक्की.......!!!
या कार्यक्रमास अडसूळ सर यांचे कुटूंबीय व शिक्षण क्षेत्रातील असंख्य सहकारी सुना, नातवंडे, जावई, चिरंजीव डॉ. सुजित अडसुळ, श्री . तुपे साहेबांसोबत त्यांच्या गावचे सरपंच व संपूर्ण परिवार संगीत क्षेत्रातील मान्यवर , सरपंच माधुरीताई पाटील, संग्राम पाटील,प. समिती सदस्य राजेंद्र गुंड यांच्यासोबत राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्तिथ होते.
🙏 जय भगवान🙏
अमृत संजीवनी ग्रामिण विकास प्रतिष्ठाण जामदारवाडा