Karjat Ayurved Research Centre

Karjat Ayurved Research Centre Cming soon

19/07/2023
03/03/2021
15/11/2020
26/05/2020

कोविड १९ संक्रमण काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद व्यासपीठ रायगड आणि जनकल्याण समिती (रा.स्व.सं)तर्फे देण्यात येणाऱ्या वासागुडुच्यादि वटीचे सेवन कसे करावे त्याचे मार्गदर्शन करणारा व्हिडिओ.

11/05/2020

Thought for the day:

During World War II, numerous fighter planes were getting hit by anti-aircraft guns.

Air Force officers wante he bed to add some protective armor/shield to the planes. The question was "where"?

The planes could only support few more kilos of weight. A group of mathematicians and engineers were called for a short consulting project.

Fighter planes returning from missions were analysed for bullet holes per square foot. They found 1.93 bullet holes/sq. foot near the tail of the planes whereas only 1.11 bullet holes/sq. foot close to the engine.

The Air Force officers thought that since the tail portion had the greatest density of bullets, that would be the logical location for putting an anti-bullet shield.

A mathematician named Abraham Wald said exactly the opposite; more protection is needed where the bullet holes aren't - that is -around the engines.

His judgement surprised everyone. He said *We are counting the planes that returned from a mission. Planes with lots of bullet holes in the engine did not return at all*.

*Debrief*

If you go to the recovery room at the hospital, you’ll see a lot more people with bullet holes in their legs than people with bullet holes in their chests. That’s not because people don’t get shot in the chest; it’s because the people who get shot in the chest don’t recover.

*Remember* the words of Einstein-
*Not everything that counts can be counted, and not everything that can be counted, counts*.

Source:
From the book -
*How Not To Be Wrong*, by Jordan Ellenberg.

Count how Safe we are at Home.
*After relaxations of lockdown, remember our engines will be exposed*.
🙏🏻

20/04/2020

विदेशी झाडे का नकोत ? -
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस , सप्तपर्णी , रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे .... दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला .... आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो .... पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली .... अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे ...
या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे ... या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत ... या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही ... रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे ... एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी / अन्नसाखळी कमकुवत होतेय ... परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळीसुद्धा खात नाहीत .... माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत ... या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत ...
ग्लिरिसिडीया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तरी ते अपंग होतात ... मरतात ... या झाडाखालुन चालताना धाप लागते ... या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .... जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत ... १९७० च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले... तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे ... फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही ... जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .... इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे ....
आता देशी झाडेच का लावायची ? याबद्दल
अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।
कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।
अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही. हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे ... वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय ....
देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते.... या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात.... पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो ... देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो... विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात.... विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते.... ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते ... ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे ... त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे ....
देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात.... साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते.... यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते .... मुक्या प्राण्यांना हे कळते मग माणसाला कधी कळणार ...
पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कवठ, बेल,कडुनिंब ,मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे.... अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही ...
चला तर सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस , सप्तपर्णी , रेन ट्री ही परदेशी वृक्षसंपदा नष्ट करून आपले पर्यावरण पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यात हातभार लावू या...

13/09/2019

*छद्मचर*
एक व्हाॅट्सॅप् युनिव्हर्सिटी मधे फिरणारा लेख वाचनात आला.ज्यात औषधात शिसं असण्यावरून आयुर्वेदाची नालस्ती करण्यात आली आहे. तेंव्हा आम्ही शिकलेल्या ख-या आयुर्वेदातील 'छद्मचर' ह्या संज्ञेची आठवण झाली. छद्मचर म्हणजे सोप्या भाषेत खोटा वैद्य. (Quack)

*भिषग्द्रव्याण्युपस्थाता रोगी पादचतुष्टयम्!!*

चिकित्सा यशस्वी होण्यासाठी वैद्य,औषधी,परिचारक,आणि स्वत: रूग्ण हे चार महत्त्वाचे घटक आहेत. वैद्य तर सर्वात महत्त्वाचे.

स्वत:ला ज्ञानी समजणारा, औषधोपचाराची कुठलीही माहिती नसताना थातूरमातूर वाचून औषधे देणारा, कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेता रूग्णांवर उपचार करणारा, स्वताला ज्या शास्त्रातील ज्ञान नाही त्यातील औषधे वापरून रूग्णाचा जीव धोक्यात घालणारा तो छद्मचर.

ह्या छद्मचरांमुळे वैद्यकीय शास्त्राची बदनामी होत आहे.बाह्योपचार करण्यासाठी निसर्गोपचाराचे शिक्षण घेतलेले ही सर्रास अभ्यंतर औषधे द्यायला लागले आहेत निव्वळ पैसा कमावण्यासाठी.

दीर्घंजीवितीय अध्यायात चरकाचार्यांनी सांगितले आहे की अशा लोकांशी धन, अन्न यांची देवाणघेवाण तर सोडाच संभाषणही करू नये.

कलियुग असे आहे की ह्या छद्मचरांकडे एवढी गर्दी होते की त्यांची हाजी हाजी करुन पेशंट मिळवणारे मोठे मोठे कन्सल्टंटही त्यांना संरक्षण देतात‌.

स्वत:हून औषधे घेणारे अर्धवट ज्ञानी रूग्णही आत्मघातकीच.
मिडियात फिरणा-या लेखात सिंदूर सारखे विषारी औषध पोटात घ्यायला सांगणारा किंवा ते कित्येक दिवस स्वताहून चालू ठेवणारा लेड पाॅयझनिंग होण्यासाठी तितकाच जबाबदार आहे. ह्यात आयुर्वेद शास्त्र दोषी कसे?

*योगाद्पिविषं तिक्ष्णम् उत्तमम् भेषजं भवेत्!! चरक१-१२७*

विषसुध्दा योग्य मात्रेत दिल्यावर औषधांचे काम करते असे चरकाचार्य सांगतात.

पारा गंधक आणि धातूंचे भस्म औषधात वापरण्याची पद्धत आयुर्वेदात खूप उशीरा आली. ज्याचा त्या काळातही विरोध झाला.परंतु योग्य पध्दतीने प्रमाणात उपयोग केल्यावर रूग्णांवर चांगले परिणाम दिसून आले. आणि लोकप्रिय झाले.पण अजुनही काही वैद्य वनौषधींचा वापर करण्यावर अधिक भर देतात, फार कमी कालावधीसाठी ही रासायनिक औषधे वापरली जातात.

अज्ञानाने ही औषधे वापरली गेली तर त्याचे दुष्परिणामही दिसणारच ना. जसे ते अॅलोपॅथीतील औषधांच्या बाबतीतही आहे. अॅलोपॅथीतीतही संधीवात,त्वचारोग आणि अनेक रोगांवर स्टिराॅईड, वेदनाशामक औषधे वापरली जातात. पण योग्य पध्दतीने. पण मी असे पेशंट बघितले आहेत जे कुणालाही न विचारता वर्षानुवर्षे ही औषधे घेऊन किडनी इत्यादीचे विकार होऊन दगावले आहेत. म्हणून काय पूर्ण अॅलोपॅथी शास्त्र टाकावू आहे का?

ह्या दुष्परिणामांना मेडिकल स्टोअर्स पण तितकीच जबाबदार आहेत. ह्याविषयी कधी बोलणार?

मान्य आहे आयुर्वेदातील कंपन्यांची परिस्थिती भयावह आहे.कंपन्या पैशासाठी वाटेल ते विकतात, त्यांचे प्रमाणिकरण करणारी संस्था गलितगात्र आहे.
म्हणूनच नीरक्षीर न्यायाने उत्तम कंपनीची औषधे वापरून चिकित्सा करणा-या वैद्यांचा अनुभव कामी येतो. आयुर्वेद हा वाटतो तेवढा सोपा नाही.

सोशल मिडिया वर फिरणा-या लेखाचा एक फायदा झालाय.आयुर्वेदिक औषधांचा साईड इफेक्ट नाही म्हणणारे आणि येताजाता स्वत:हून औषधे घेणारे जरा शहाणे होतील.

असे लेख अॅलोपॅथीक औषधांविषयी लिहीण्याचा पण मानस आहे.

*वैद्य आशुतोष कुळकर्णी*
कर्जत रायगड

नाचणी डोसासाहित्य- २ वाट्या नाचणी,१/२ वाटी हरभरा,१/४ वाटी चणाडाळ,१/४   वाटी मुगडाळ,१ वाटी उडीदडाळ,१/४ वाटी रवा.कृती- नाच...
28/08/2019

नाचणी डोसा

साहित्य- २ वाट्या नाचणी,१/२ वाटी हरभरा,१/४ वाटी चणाडाळ,१/४ वाटी मुगडाळ,१ वाटी उडीदडाळ,१/४ वाटी रवा.

कृती- नाचणी स्वच्छ धुवून १२ तास भिजत घालावी. रवा वगळून बाकी धान्ये एकत्रित धुवून ५-६ तास भिजवावे. प्रथम भिजवलेल्या नाचणीतील पाणी बाजूला काढून मिक्सरमध्ये थोडे थोडे पाणी घालत गुळगुळीत वाटावी.त्यानंतर डाळी वाटाव्यात, दोन्ही मिश्रण एकत्र करून चांगले एका दिशेने ढवळावे. पीठ पातळ करू नये. त्यातच रवा घालावा व नीट ढवळून मिश्रण ५-६ तास झाकून ठेवावे. पीठ छान फुगुन वर येते.चवीप्रमाणे मीठ घालून डोसे काढावेत. चटणी,दही,लोणी ह्यासोबत वाढावेत.

ज्यांना नाचणीची भाकरी आवडत नाही त्यांना हे डोसे नक्की आवडतील. करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
-डॉ शर्वाणी कुळकर्णी-
कर्जत , रायगड

27/08/2019

लवकरच आपल्यासाठी घेऊन येतोय अनेक नविन उपक्रम
१) आरोग्यदायी सोप्या पाककृती
२) आयुर्वेदातील अद्भुत कथा
आणि बरंच काही...वाचा, अनुभवा आणि प्रतिक्रिया अवश्य कळवा.

Address

Purva Apartment Karjat
Karjat
410201

Telephone

02148221345

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karjat Ayurved Research Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Karjat Ayurved Research Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category