07/09/2021
◆आपल्या जगण्याचा सुर सकारात्मक कसा ठेवता येईल ?
जस प्रत्येक दिवसात प्रत्येक क्षणात काहीना काही घडतच असते. कधी दुःख तर कधी आनंद .. पण कोणतीच वेळ ही कधी स्थिर राहत नसते. जसा सूर्य उगवायचा विसरत नाही, जस झाड सावली द्यायचं सोडत नाही. मग आपण का आपलं सकारात्मक विचार करायचं थांबवतो.
काही मनासारखं घडलं नाही की आपण दुःखी होतो आणि जेव्हा दुःखी होतो त्यावेळी आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्वाचा.. पण आपण आनंदी असताना सकारात्मक विचार करतो आणि थोड दुःख झालं की लगेच नकारात्मक विचार करायला सुरु करतो. किंबहुना आपण ज्याप्रकारे मेंदूला सवय लावलेली असते, ते लगेचच दाटून येतं.
आणि त्यामध्ये शक्यतो नकारात्मक विचारांचाच भडीमार असतो. त्यामुळे अशाही स्थितीत आपण ते विचार रिलॅक्स करू शकतो. ती वाया जाणारी ऊर्जा आपल्या ठिकाणी वापरू शकतो.
१) वेळ ही कायम सारखी नसते.
कोणतीच वेळ ही कायम एकसारखी नसते. जस ऊन सावली हा खेळ कायम चालूच असतो अगदी तसचं आपल्या आयुष्यात सुद्धा चढ उतार चालूच असतात हे स्वीकारायचं यामुळे आपल्या आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तर, ही वेळ सुद्धा जाईल ही सकारात्मकता आपल्यासोबत राहते.
२) महत्त्व कशाला द्यायचं हे कळलं पाहिजे
कोणत्याही अडचणीत असताना फक्त विचार करून उपयोग नसतो कारण त्यामुळे नकारात्मकता वाढते तर त्यावेळी सुद्धा मार्ग शोधून काढणे म्हणजेच सकारात्मकता आपल्यात आहे. म्हणून आलेल्या समस्येचा विचार करण्याला महत्त्व द्यायचं की त्यावर उपाय शोधायला वेळ द्यायचा हे आपण ठरवायचं. आणि जर आपल्याला सकारात्मक राहायचं आहे तर नक्कीच त्यावर उपाय शोधायचा आपण प्रयत्न करू.
३) पळ काढू नका
आपल्यासमोर जी सुद्धा वेळ येईल त्यावेळेचा, प्रसंगाचा स्वीकार करायचा. पण आपण बहुतेक वेळा त्यापासून पळ काढायचा प्रयत्न करतो. आनंदाच्या ठिकाणी जरी तुम्ही गेलात तरी जिथून तुम्ही पळ काढलेला आहे, तेच विचार मनात घोंघावत असतात. आलेल्या समस्येला सामोरे गेले तर आपल्यातील भिती कमी होऊन मी यातून सुद्धा बाहेर पडू शकतो ही सकारात्मकता वाढते.
४) आव्हान समजा
येणाऱ्या अडचणी ही कायम आपल्याला दुःख घेऊन येतात असा विचार करण्यापेक्षा आपल्यातील जिद्द आणि सकारात्मकता वाढवण्याच काम करतात हा विचार करा. आणि येणाऱ्या अडचणींना आव्हान समजून त्यातून पुढे जायचं म्हणजे नक्कीच आपल्यातील अडचण म्हणजे दुःख ही नकारात्मक भावना दूर होईल.
५) आभार माना
तुम्हाला अडचणीत टाकणाऱ्या प्रत्येक दुःखांना, व्यक्तींना, प्रसंगांना थँक यु म्हणा. कारण त्यांनी तुमचा इतरांसारखा फार वेळ घेतला नाही आणि जरी घेतला असेल तरी इतरांचाही माझ्यापेक्षा जास्त गेलेला आहे, म्हणून त्यांचे आभार माना. असे केल्याने पुढच्या अडचणींचा सामना करायला तुम्हाला जास्त जड जाणार नाही.
६) फ्लेक्सिबल रहा
तुमचे विचार हे कोणत्याही परिस्थितीत मिळते-जुळते ठेवा. मानसिक समस्या निर्माण होण्याहची बहुसंख्य कारणे हीच आहेत कि, तुमच्यातील ताठरता, निगरगठ्ठपणा. असे व्यक्तिमत्व तुम्हाला कायम निगेटिव्ह रोलमध्ये ठेवतील आणि जग सुद्धा तुम्हाला तसेच दिसेल.
७) जगण्याचं ध्येय
वरील ६ पॉईंट्स तुमच्यामध्ये असून उपयोग नाही, जर तुमच काही विशिष्ट जगण्याचं ध्येयच नसेल. अगदी मोठा माणूस, श्रीमंत माणूस अशीच कायम ध्येय ठेवावी असेही नाही. तुम्ही लहान - सहान ध्येयापासून सुरुवात करू शकता. जसं कि, इतकं वजन कमी करायचं, याठिकाणी फिरायला जायचं, मित्रांना - मैत्रिणींना भेटायचंय वगैरे. अशी ध्येय तुम्हाला निगेटिव्हिटी पासून दूर ठेवतील.