Sant gadgebaba generic medicine

Sant gadgebaba generic medicine This is Generic Medicine Store

11/05/2021
Generic Medicines....
15/01/2021

Generic Medicines....

जेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य काय?वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार,डॉक्टर्स जर रुग...
02/10/2019

जेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य काय?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार,
डॉक्टर्स जर रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यायला लागले तर विकसित देशांमध्ये आरोग्य खर्च ७०% ने आणि विकसनशील देशांमध्ये त्याहूनही कमी होऊ शकतो.
जेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या तुलनेत १० ते १२ टक्केच विकली जातात. जेनेरिक औषधांमुळे मिळणारा कमी नफा आणि कमिशन यांमुळे औषध कंपन्या, मेडिकल स्टोर आणि डॉक्टर यांपैकी कोणालाच जेनेरिक औषधांची मागणी वाढावी असे वाटत नाही.
*आज बाजारात जवळपास सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी असून गरीब माणूस देखील सहज ही औषधे विकत घेऊ शकतो.*
*जेनेरिक औषधे कशाला म्हणतात?*
जेनेरिक औषधांना ‘इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन’ देखील म्हटले जाते, ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधांसारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘एसेंशियल ड्रग’लिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात.
ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.
एखाद्या आजाराच्या उपचारासाठी रिसर्च आणि स्टडी केल्यानंतर एक रसायन (साल्ट) बनवले जाते. जे सहजरीत्या उपलब्ध करण्यासाठी त्यांना औषधांचे रूप दिले जाते. ह्या औषधांना प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या नावाने विकते. काही कंपन्या महाग किंमतीत विकतात तर काही कंपन्या स्वस्त दरात विकतात.
*जेनेरिक औषधे स्वस्त का असतात?*
ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. पण या कंपन्या जेनेरिक औषधांची किंमत कशीही ठरवू शकत नाही. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते.
*तुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्याच साल्ट मधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात. महाग औषधे आणि त्याच साल्ट मधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी पाच ते दहा पट अंतर असते. काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये ९०% फरक असतो.*
जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते. हे देखील कारण आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा होते त्या कारणाने सुद्धा किंमत कमी होते.
सर्वात मोठे कारण हे आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या या औषधांची जाहिरात करत नाहीत. त्यामुळे ह्या औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात.
*या आजारांची जेनेरिक औषधे स्वस्त असतात*
काहीवेळा डॉक्टर फक्त साल्टचे नाव लिहून देतात, तर कधी कधी फक्त ब्रँडेड औषधांचे नाव लिहून देतात. काही खास आजार आहेत ज्यांची जेनेरिक औषधे उपलब्ध असतात परंतु त्याच साल्टची ब्रँडेड औषधे महाग असतात.
*जसे – न्युरोलोजी, युरीन, हार्ट डिजीस, किडनी, डायबिटीज, बर्न प्रोब्लेम, या आजारांच्या जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमध्ये खूप जास्त अंतर दिसून येते. एकाच स्लाटच्या दोन औषधांच्या किंमतीमधील मोठा फरकच जेनेरिक औषधांचा पुरावा आहे.*
*जेनेरिक औषधे कशी प्राप्त करू शकता?*
जेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोर्सवर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा.

महाराष्ट्र के पूर्व एफडीए कमिश्नर व आइएएस श्री महेश झगडे लम्बे समय से इस मुद्दे पर काम कर रहे थे | उन्होने कई पत्र सरकार...
04/09/2019

महाराष्ट्र के पूर्व एफडीए कमिश्नर व आइएएस श्री महेश झगडे लम्बे समय से इस मुद्दे पर काम कर रहे थे | उन्होने कई पत्र सरकार को लिखा l सरकार ने अब जाकर एक्ट मे बदलाव की तैयारी की है | सिर्फ एक्ट मे संशोधन काफी नही... फार्मासिस्ट को सबस्टिच्युट करने का पुरा कानुनी अधिकार भी मिलना चाहीए | इसके साथ ही जेनरीक न लिखने वाले डॉक्टरों को जेल व जुर्माना दोनो ही का स्पष्ट प्रावधान होना चाहीए |

Happy new year 2019
01/01/2019

Happy new year 2019

28/08/2018

BazaarInside is India’s online marketplace, connecting buyers with suppliers. The online channel focuses on providing a platform to Small & Medium Enterprises (SMEs), large enterprises as well as individuals. Founded in 1996, the company’s mission is ‘to make doing business easy’. More About...

Sant Gadgebaba Generic medicine store khamgaon.9503210026
16/08/2018

Sant Gadgebaba Generic medicine store khamgaon.
9503210026

Sant Gadgebaba Generic medicine store khamgaon9503210026
16/08/2018

Sant Gadgebaba Generic medicine store khamgaon
9503210026

09/07/2018

🏥 _*आता सरसकट सर्वच केमिस्ट्ना जेनेरिक औषधे विकणे बंधनकारक*_

💫 सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन यांनी काढले परिपत्रक...

⚡ परिपत्रकानुसार, ग्राहकांच्याही निदर्शनास येईल, अशा पद्धतीने सर्व केमिस्ट्सने दर्शनी भागात जेनेरिक औषधे ठेवण्याची वेगळी व्यवस्था करण्याचे सुचविले आहे...

संपर्क :- संत गाडगे बाबा स्वस्त औषधी सेवा स्वामी समर्थ संकुल, नांदुरा रोड, खामगांव
मो नं. - उज्वल जावरकर, ९५०३२१००२६

संत गाडगे बाबा स्वस्त औषधी सेवा, स्वामी समर्थ संकुल, नांदुरा रोड, खामगांवसंपर्क:- ९५०३२१००२६
18/06/2018

संत गाडगे बाबा स्वस्त औषधी सेवा, स्वामी समर्थ संकुल, नांदुरा रोड, खामगांव
संपर्क:- ९५०३२१००२६

Vinay Kateजेनेरिक प्रिस्क्रिप्शनची सक्ती - MCI व नरेंद्र मोदींचा धाडसी व कौतुकास्पद निर्णय!जेनेरिक औषधांबद्दल सध्या देशा...
13/05/2018

Vinay Kate

जेनेरिक प्रिस्क्रिप्शनची सक्ती - MCI व नरेंद्र मोदींचा धाडसी व कौतुकास्पद निर्णय!

जेनेरिक औषधांबद्दल सध्या देशात सगळ्या डॉक्टर मंडळींनी व फार्मा कंपन्यांनी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची भीती दाखवायला सुरुवात केलीय, जी अत्यंत निराधार व व्यावसायिक हितसंबंधानी प्रेरित आहे. जेनेरिक या शब्दाला औषधांच्या क्षेत्रात काही वेगवेगळे संदर्भ आहेत ते खालीलप्रमाणे -

१) जेनेरिक "नावा"संदर्भात-
कुठल्याही औषधाला दोन प्रकारची नावे असतात. एक जेनेरिक नाव म्हणजे त्याचे रासायनिक नाव; आणि दुसरे व्यावसायिक/ब्रँड नाव. थोडक्यात, Paracetamol हे जेनेरिक नाव आणि Crocin हे ब्रँड नाव. Paracetamol हे औषध जगाच्या पाठीवर किमान हजारभर कंपन्या वेगवेगळ्या ब्रँड नावाने विकत असतील. ब्रँड नाव काहीही असलं तरी मूळ औषध, त्याची परिणामकारकता समान. ब्रँड नाव फक्त ते औषध कुठल्या कंपनीने बाजारात आणलंय हे सांगते; नीट वाचा 'बाजारात आणलंय' एवढंच सांगते. कारण, जगातल्या यच्चयावत मोठ्या औषध कंपन्या त्यांची कित्येक औषधे दुसऱ्या छोट्या कंपन्यांकडून बनवून घेतात व स्वतःच्या नावाने विकतात, स्वतःचे खर्च कमी करून फायदा वाढवायला. हिमाचल मधील बद्दी हे अशा अनेक छोट्या कंपन्यांचे माहेरघर आहे जिथून जगभरच्या नामांकित ब्रँडची औषधे तयार होतात.

२) जेनेरिक "संशोधना"संदर्भात -
जगात दोन प्रकारच्या औषध कंपन्या असतात, नवीन संशोधन करून "पेटंट" असणारी औषधे निर्माण करणाऱ्या इनोव्हेटर्स, आणि जेव्हा ह्या औषधांचे पेटंट संपते तेव्हा त्याच औषधांचे "जेनेरिक" उत्पादन करणाऱ्या. कुठलेही पेटंट (व्यावसायिक एकाधिकारशाही) हे 20 वर्षे चालते, पण औषधांच्या बाबतीत ते साधारण 7 वर्षेच बाजारात वापरता येते. पेटंटेड औषधे महाग असतात कारण त्यासाठी संशोधनावर प्रचंड खर्च येतो, अगदी 1 औषध बाजारात आणायला 1 बिलियन डॉलर्स (सात हजार कोटी रुपये) इतका. तो खर्च वसूल करण्यासाठी पेटंटेड औषधे महाग असणे क्रमप्राप्त व न्यायाचे असते. पण जेव्हा पेटंट संपते तेव्हा त्याच पेटंटेड औषधांची दुसऱ्या कंपन्यांनी बनवलेली जेनेरिक औषधे साधारणत: पेटंटेड औषधांच्या 15-20% किंमतीला बाजारात मिळतात.

वरील मुद्दा क्र १ व २ नुसार औषधांचे तीन प्रकार पडतात-
अ) पेटंटेड औषधे (जी साहजिकच ब्रँडेड असतात)
ब) ब्रँडेड जेनेरिक औषधे (यांना ब्रँडनाव असते)
क) जेनेरिक जेनेरिक औषधे (ब्रँडनाव नसणारी)

अमेरिकेत 10 पैकी 8 prescription या जेनेरिक (ब्रँडेड व जेनेरिक प्रकारच्या) औषधांच्या असतात. आणि खुद्द अमेरिकेचे FDA (अन्न व औषध प्रशासन विभाग) जेनेरिक औषधे ही पेटंटेड औषधांइतकीच प्रभावी आहेत हे Clinical Trial चा संदर्भ घेऊन सांगते. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातसुद्धा जेनेरिक औषधे लोकांच्या व सरकारच्या पसंतीस पात्र आहेत कारण ती स्वस्त व दर्जेदार आहेत. आफ्रिकेत HIV ला आळा घालण्यात भारतातील स्वस्त जेनेरिक औषधांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि म्हणूनच भारतातील नामांकित फार्मा कंपन्या जेनेरिक (ब्रँडेड व जेनेरिक) औषधे जगभर निर्यात करून गेल्या 10-15 वर्षात अतिश्रीमंत बनल्या आहेत. त्यामुळे कुणी जेनेरिक औषधांची quality चांगली नसते वगैरे ज्ञान द्यायला लागला तर त्याला विचारा "पेटंटेड औषधे बनवणारी भारतीय कंपनी कुठली?". तो एका सेकंदात गप्प बसेल कारण यच्चयावत भारतीय औषध कंपन्या ह्या जेनेरिक औषधांच्या व्यवसायात आहेत. ब्रँडेड म्हणजे काहीही विशेष मोठे नसते; www.ipindia.nic.in या सरकारी वेबसाईट वर कुणीही काही हजारांत स्वतःचा ब्रँड (Trademark) रजिस्टर करू शकते. औषधाला ब्रँडनेम दिल्याने त्याची परिणामकारकता वाढत नाही किंवा न दिल्याने कमी होत नाही!

आता येऊया सध्याच्या मुद्द्याकडे - Generic Prescription च्या सक्तीच्या. MCI (मेडिकल कौंन्सिल ऑफ इंडिया) ने 2016 साली एक आदेश काढून डॉक्टर्सना सूचित केले होते की प्रिस्क्रिप्शन मध्ये औषधांचे ब्रँड नाव न लिहिता जेनेरिक नाव लिहावे, ज्याला डॉक्टर्सनी हरताळ फासला होता. वास्तविक MBBS च्या दुसऱ्या वर्षाला फार्माकॉलॉजी व तिसऱ्या वर्षी समस्त क्लिनिकल विषयांत विद्यार्थी ज्या प्रिस्क्रिप्शन लिहितो त्यात कुठेही ब्रँडनेम नसते, जेनेरीक नावच असते. पण जेव्हा हाच विद्यार्थी डॉक्टर बनून बाजारात उतरतो तेव्हा तो प्रिस्क्रिप्शन वर ब्रँडचे नाव टाकायला लागतो. कारण सोपे आहे... ब्रँड हा औषध कंपनीचा असतो आणि आपल्या ब्रँडचे प्रिस्क्रिप्शन लिहावे म्हणून औषध कंपनी त्यासाठी काही चीजवस्तू डॉक्टरांना देत असते (काही प्रामाणिक डॉक्टर्स अशा चीजवस्तू सरळ नाकारतात, पण ती संख्या थोडी आहे). कपडे, घरातल्या वस्तू, परदेशी वाऱ्या पासून ते अगदी महागड्या गाड्यांपर्यंत गोष्टी डॉक्टर्सना दिल्या गेलेल्या आहेत, अजूनही दिल्या जातात, भले MCI ने त्यावर कितीही निर्बंध आणले तरी.

आता समजा की मोदींच्या आणि MCI च्या सक्तीला धरून जर प्रिस्क्रिप्शन वर ब्रँडनेम लिहिता येत नसेल तर औषध कंपन्यांच्या MR (Medical Representative) ना कळणार कसे की कुठल्या डॉक्टरने किती बिझनेस दिलाय? आणि त्याला ते नाही कळले तर तो कंपनीला काय कळवणार? आणि तो ते नाही कळवू शकला, डॉक्टर्सशी व्यावसायिक हितसंबंध टिकवू नाही शकला तर त्या MR चा कंपनीला उपयोग काय? IMS सारख्या प्रिस्क्रिप्शन मधील ब्रँडनेम चा सर्व्हे करणाऱ्या व्यापारी संस्था औषधकंपन्यांना कसला data विकणार? MCI च्या या निर्णयाने औषधांच्या व्यवसायाचा खूप जास्त कंट्रोल रुग्ण व retail (छोट्या) फार्मसी वाल्यांकडे येणार आहे जो आजवर डॉक्टर्स, गब्बर फार्मा स्टॉकिस्ट व फार्मा कंपन्यांकडे होता. भले यात काही लाख MR थोड्या काळासाठी भरडले जातील, पण हळूहळू छोट्या जेनेरिक औषध कंपन्या सुद्धा स्वतःचा माल विकायला या MR ना वापरू शकतील.

भारतात औषधांच्या निर्मितीला परवानगी द्यायला व त्यांची गुणवत्ता मानकांनुसार राखायला CDSCO (Central Drugs Standard Control Organization) ही केंद्रीय संस्था आहे (अगदी अमेरिकेच्या FDA सारखीच), जिच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात FDA (अन्न व औषध प्रशासन) औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करते. कुठलेही औषध बनवायला कित्येक परवानग्या, ऑडिट, क्वालिटी टेस्टस यांतून प्रत्येक औषध कंपनीला (छोटी असो वा मोठी) वारंवार जावे लागते. खडूची भुकटी, उंदराचे औषध आदी ज्या गोष्टी सामान्य लोकांना भीती घालायला सांगितल्या जात आहेत त्या भेसळीच्या/नकली औषधांच्या घटना आहेत आणि त्या कुठल्याही औषध कंपनीच्या औषधाबाबत होऊ शकतात. Ranbaxy सारख्या नामांकित भारतीय कंपनीला सुद्धा 2013 साली अमेरिकेच्या FDA ने 500 मिलियन डॉलर्स चा दंड ठोठावला होता. अगदी गेल्या महिन्याच्या, मार्च 2017 च्या CDSCO च्या Drug Alert मध्ये D-Cold Total, Combiflam, Cadilose या मोठ्या औषध कंपन्यांच्या नामांकित ब्रँडेड औषधांच्या दर्जात कमी आढळल्याचे म्हणले आहे. CDSCO च्या प्रामाणिकतेबद्दल आणि औषध कंपन्यांच्या भुई धोपटायच्या वृत्तीबद्दल बोलायला हे पुरेसे आहे.

2013 साली मनमोहन सिंग सरकारने DPCO (Drug Price Control Order) आणत 628 जीवनावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणात आणत सामान्य माणसाला दिलासा दिला होता. 2 महिने आधी मोदी सरकारने मूळ खर्चाच्या 5 ते 10 पट किंमतीला विकल्या जाणाऱ्या Medical Devices च्या किंमती आटोक्यात आणत कित्येक कंपन्या, हॉस्पिटल व डॉक्टर्सचे दुकान बसवले. याचाच पुढचा टप्पा म्हणजे 2016 च्या MCI च्या Generic Prescription च्या सक्तीला मोदींनी पाठिंबा देणे. हे करायला खूप मोठे धाडस व राजकीय ईच्छाशक्ती लागते जी मनमोहन सिंग व नरेंद्र मोदींनी दाखवलीय. फार्मा कंपन्यांच्या नेक्सस च्या विरोधात जाणे वाटते तितके सोपे नाही. जे ओबामांनी अमेरिकेत केले तेच या दोघांनी इथे भारतात केलेय. औषध कंपन्यांकडून सामान्यांची केली जाणारी लूट अमेरिकेला परवडत नाही, आपण तर त्यापुढे कितीतरी गरीब देश आहोत. भारतीय औषध कंपन्यांनी सुद्धा आता ब्रँडेड आणि अनब्रँडेड च्या नावाखाली सामान्य लोकांना भीती घालवण्याचे उद्योग बंद करत स्वतःचा धंदा वेगळ्या पद्धतीने व प्रामाणिकपणे करावा. MR हे औषधांची quality जपायला वगैरे असतात ही लोणकढी थाप आहे, MR हे सेल्समन आहेत हे जगजाहीर आहे, त्यापासून उगीच लपू नका.

राहता राहिला डॉक्टर्सचा भाग; कधी नव्हे ते एक सुवर्णसंधी चालून आलीय प्रामाणिकपणे व्यवसाय करत सामान्य लोकांच्या मनातून हरवला गेलेला विश्वास परत मिळवायची व तिचे सोने करायची. "कट प्रॅक्टिस" मुळे, फार्मा कंपन्यांसोबतच्या अभद्र युतीमुळे वैद्यकीय व्यवसाय, जो आधी खूप सन्मानाचा होता तो आता एक धंदा बनलाय. त्याला परत एक चांगले स्थान मिळवून द्यायला यासारखी संधी नाही. "ही औषधे नाही घेतली व औषधांमुळे गुण नाही आला तर आम्ही जबाबदार नाही" असल्या consent घ्यायच्या गप्पा काय करता तुम्ही? जर तुम्ही लिहिलेली औषधेच घेतली, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणीच तपासण्या केल्या तर पेशंट 100% बरा होईल याची खात्री घ्याल का तुम्ही?? या घडीलाही काही हजार/लाख रुपयांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सामान्य माणसाच्या भल्याच्या विरोधातच भूमिका घ्यायची असेल तर भवितव्य वाईट आहे. "MR ना प्रवेश नाही" व "आम्ही कुणाकडूनही Referral Charges स्विकारत नाही व देत नाही" अशी पाटी लावून वैद्यकीय व्यवसाय करणे खूप अवघड नाही. सगळ्यांनाच डॉ.प्रकाश आमटे व्हायला भामरागड ला जायची गरज नाही. Ethics व प्रामाणिकपणा सांभाळला तरी तुमच्या गावा-शहरात तुम्ही डॉ.आमटे व्हाल व पेशंटचे नातेवाईक तुमच्यावर हल्ले न करता तुमचे गुणगान गातील!

- डॉ. विनय काटे

(टीप- या लेखाचा लेखक मेरिटने MBBS व नंतर IIM अहमदाबाद मधून शिकलेला आहे. 3 वर्ष वैद्यकीय व्यवसाय व 3.5 वर्ष एका नामांकित फार्मा कंपनीत नोकरी करून सध्या इतर क्षेत्रात कार्यरत आहे.)

Intellectual Property India

Address

NANDURA Road
Khamgaon
444303

Opening Hours

Monday 9:30am - 11pm
Tuesday 9:30am - 11pm
Wednesday 9:30am - 11pm
Thursday 9:30am - 11pm
Friday 9:30am - 11pm
Saturday 9:30am - 11pm
Sunday 9:30am - 11pm

Telephone

+919503210026

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant gadgebaba generic medicine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sant gadgebaba generic medicine:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram