10/10/2020
* जागतिक मानसिक आरोग्य दिन
दरवर्षी 10 ऑक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृकता पसरवण्याचा व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ती मदत पोहचवण्यासाठी या दिवसाचे आयोजन केले जाते. वर्ल्ड फेडरेशनकडून या दिनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीची थीम आत्महत्या प्रतिबंध (su***de prevention) ही आहे.
मानसिक आरोग्य चांगले नसणे म्हणजे केवळ मानसिक अस्वस्थता व तणाव नाही, तर मानसिक आरोग्य चांगले ठेऊन निरोगी राहणे, जीवनातील अडचणींना सामोरे जाणे हे आहे.
आज मानसिक आरोग्याबद्दल लोक जागृक नसल्याचे दिसून येते व काही जणांच्या मते ही वाईट गोष्ट आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सोशल मीडियावर युजर्सकडून अनेक सकारात्मक संदेश शेअर करण्यात आलेले आहेत. आम्ही तुमच्यासाठी अशाच सात निवडक पोस्ट घेऊन आलो आहोत, ज्या सांगतात की, मानसिक आरोग्य का महत्त्वाचे आहे व त्याबद्दल आपण का बोलले पाहिजे.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका व तणावापासून दूर रहा.
मानसिक आरोग्य हे शारिरिक आरोग्याप्रमाणेच महत्त्वाचे आहे.
ज्याप्रमाणे आपण एखाद्या लंगड्या व्यक्तीला मदत करतो, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याला देखील सांभाळले पाहिजे.
मानसिक आरोग्याविषयी बोला – चिंता आणि नैराश्य हे खरे आहे.
मेंदूसाठी, मनासाठी थेरपी घेणे हे एकप्रकारे जिमला जाण्यासारखेच आहे.
तुम्ही यातून संघर्ष करत असाल, तर नक्कीच कोणाशी तरी संवाद साधा.
आणि नेहमी लक्षात ठेवा – मानसिक आरोग्याशी संघर्ष करणे आपल्याला दुबळे बनवत नाही, तर आपण त्याही परिस्थितीमध्ये टिकून राहणे गरजेचे आहे, अनेकवेळा या परिस्थितीला सामोरे जाणे हीच खूप मोठी गोष्ट असते.
जर तुम्हाला अथवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मानसिक आरोग्यविषयी मदत हवी असेल तर तुमच्या जवळील मानसिक आरोग्य तज्ञाकडे नक्की जा.
धन्यवाद,
गुरुकृपा मेडिकल,
कडेगांव.