30/06/2023
*आला पावसाळा, आरोग्य सांभाळा*
पावसाळा हा सर्वाँना आवडणारा ऋतु. पण या मध्ये आरोग्य जपणे तितकेच महत्त्वाचे.
पावसाळ्यामध्ये भूक मंदावते . त्यामुळे या ऋतमध्ये पोटाचे विकार बळावतात. अजीर्ण , अपचन आम्लपित्त, पोट जड वाटणे , मलावरोध , भूक कमी असणे , तोंडाला चव नसणे या आरोग्य विषयक तक्रारी सर्वानाच अधून मधून जाणवतात.
पोटाचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आयुर्वेदामध्ये आहेत.
१. ताजे व शक्यतो गरम अन्न घ्यावे. शिजवलेलं अन्न
पुन्हा गरम करू नये. रेडी टू इट पदार्थ नको.
२. शक्यतो पिण्यासाठी कोमट पाणी घ्यावे. नसल्यास
साधे पाणी प्यावे ,पण थंड नको.
३. फळ भाज्या वाफवून त्यास वरून फोडणी द्यावी.
घोसाळी, दोडका, शेवगा, परवल, पडवळ, दुधी, बिन
बियांची वांगी, यांचा वापर करावा.
४. पालेभाज्या टाळाव्यात.
५. मांसाहार टाळावा / सूप घ्यावे.
६. भूक नसल्यास गरम तांदळाची पेज/ मुगाचे कढण/
भाज्यांचे सूप घ्यावे. यात चवीसाठी धने जिरपूड /
मिरेपूड/चाट मसाला टाकावा. किंवा यात थोडे
ताक/ कोकम टाकून शिजवावे व तुपाची फोडणी
द्यावी.
७. भाजलेल्या धान्याचा वापर करावा किंवा भाकरी/
फुलका खावा.
८. दिवसा झोपणे टाळावे
९. मधल्या भुकेसाठी भाजलेला पापड / धान्याच्या
लाह्या खाव्यात.
१०. खूप तिखट/ खारट/ आंबट/ तळलेले
पदार्थ चविष्ट असले तरी टाळावेत
११. दुपारच्या जेवना नंतर १ कप गोड ताजे ताक घ्यावे.
१२. मूग/ तुरीचे वरण घ्यावे. त्यात १ चमचा गाईचे साजूक तूप टाकून घ्यावे.
***सर्वात महत्वाचं म्हणजे भूक लागल्याशिवाय खाऊ नये.***
वैद्य ज्योती जगताप
एम डी (आयु)
९७६९१३२३७१