Royal Hospital Khed

Royal Hospital Khed Advanced Multi-speciality Hospital with emergency care and high-end surgery care

न्यूरोसर्जनडॉ. दिलराज कडलास (DNB न्यूरोसर्जरी)तारीख: 25 फेब्रुवारी 2024 (रविवार)वेळ: सकाळी 9 ते 12भेटीसाठी 9151312121 वर...
24/02/2024

न्यूरोसर्जन

डॉ. दिलराज कडलास (DNB न्यूरोसर्जरी)
तारीख: 25 फेब्रुवारी 2024 (रविवार)
वेळ: सकाळी 9 ते 12

भेटीसाठी 9151312121 वर कॉल करा

22/02/2024
You can also follow on Instagram to see more.
21/02/2024

You can also follow on Instagram to see more.

We are a Multi-speciality Trauma care centre in Khed, Ratnagiri, Maharashtra. Health, Dedication, Quality and Support ar...
19/02/2024

We are a Multi-speciality Trauma care centre in Khed, Ratnagiri, Maharashtra.
Health, Dedication, Quality and Support are four basic principles we have put forth to serve the people in healthcare needs.
A well qualified and compassionate team is our strength in our journey towards making every patient a part of happy and delighted Royal Family.

आता कोणत्याही मोठ्या आजारांच्या सल्ला व उपचारासाठी मुंबई-पुणे-मिरज सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. रॉयल हॉस...
17/02/2024

आता कोणत्याही मोठ्या आजारांच्या सल्ला व उपचारासाठी मुंबई-पुणे-मिरज सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही.
रॉयल हॉस्पिटल आता खेड वासियांसाठी घेऊन आले आहे प्रतिभावान सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची टीम. मुंबई-पुण्यातील नामांकित हॉस्पिटल्स जसे वोक्हार्ट, सैफी , मासींना, हबीब, रुबी हॉल क्लिनिक, जहांगीर, फोर्टिस इत्यादी हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेले सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आता खेड मधील रॉयल हॉस्पिटल मध्ये आपल्या सेवेसाठी उपलब्ध.
या टीम मध्ये हृदय रोग तज्ञ, कॅन्सर तज्ञ, मेंदू व मणका विकार तज्ञ , किडनी विकार तज्ञ, रोबोटिक गुढगा प्रत्यारोपण तज्ञ, मूत्र विकार तज्ञ, लेप्रोस्कोपी सर्जन तसेच स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ यांचा समावेश असून महिन्याच्या विशिष्ट शनिवारी किंवा रविवारी हे डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी रॉयल हॉस्पिटल मध्ये येणार आहेत.

*रॉयल हॉस्पिटल भरणे नाका खेड तर्फे लोकाग्रहास्तव सर्व खेड वासीयांसाठी एक मोठी पर्वणी !🏥*  *शनिवार दिनांक २५ व रविवार दिन...
10/11/2023

*रॉयल हॉस्पिटल भरणे नाका खेड तर्फे लोकाग्रहास्तव सर्व खेड वासीयांसाठी एक मोठी पर्वणी !🏥*

*शनिवार दिनांक २५ व रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रॉयल हॉस्पिटल तर्फे मूळव्याध व फिशर उपचार या महा शिबिराचे आयोजन !*

एक लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केलेले मुंबईचे *सुप्रसिद्ध सर्जन डॉ हेमंत पटेल (एम.एस.सर्जन, कोलोरेक्टल सर्जन)* 👨🏻‍⚕️यांच्या द्वारे मुळव्याध व फिशर आजारावर शस्त्रक्रिया द्वारे उपचार करण्यात येणार आहेत.
*शिबिरामध्ये फक्त 9999/- रुपयांमध्ये* उपचार केले जाणार आहेत.

*या शिबिराची वैशिष्ठे*
- रुग्णाला कमीत कमी वेदना🤷‍♂️ आणि जलद रोगमुक्तता.
- अत्याधुनिक पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये अचूक उपचार.
- शिबिरामध्ये पुरुष 👨🏻‍🦳व स्त्रियांसाठी 👱🏻‍♀️तपासणी व उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.
- खाण्याचे 🍲 विशेष पथ्य नाही.

एवढ्या कमी खर्चामध्ये मूळव्याध व फिशर या आजारावर कायमचा उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे *रॉयल हॉस्पिटल मूळे गरजू रुग्णांना नक्कीच मोठा दिलासा* मिळणार आहे.

*अपॉइंटमेंट आवश्यक आहे त्यासाठी कॉल करा : ☎️*
*9151312121* .
*8999593818*

डॉ विक्रांत पाटील
*9850526090*

*रॉयल हॉस्पिटल येथे सर्वात कमी खर्चामध्ये गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू* 👨🏻‍⚕️सर्व उपाय आणि उपचार करून देखील *गुडघ...
08/11/2023

*रॉयल हॉस्पिटल येथे सर्वात कमी खर्चामध्ये गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू* 👨🏻‍⚕️

सर्व उपाय आणि उपचार करून देखील *गुडघे दुःखी सतत होत आहे का ? किंवा कुर्चा अधिकच झिजल्याने हाडांवर खड्डा तयार होऊन घर्षणाने होणारी तीव्र वेदना थांबली नाही का* ? याचे कारण एकच ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर खराब झालेला कूर्चा काही वेळेला औषध आणि इतर उपचाराच्या मदतीने पुन्हा पूर्ववत करता येत नाही त्यामुळे ही सततची होणारी गुडघेदुखी टाळण्यासाठी यावर *कृत्रिम गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच एक उत्तम पर्याय आहे.*

आपल्या रॉयल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये कृत्रिम गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन *सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर ते शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंत* करण्यात आले असून या शिबिरात ७०० पेक्षा जास्त गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे निष्णात *ऑर्थोपेडीक सर्जन डॉ आशुतोष जाधव यांचा मोफत सल्ला मिळणार असून एक्स रे तपासणी वर 25 टक्के सवलत होणार आहे.*

फक्त *1 लाख 20 हजार मध्ये ( सर्जरी चार्जेस + इम्पोर्टेड इम्प्लांट + भुलतज्ञ + हॉस्पिटल स्टे + औषधे व इतर हॉस्पिटल खर्च )* या व्यतिरिक्त आणखी कोणताही खर्च नाही.

*शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रुग्णांना लाभ देखील मिळू शकेल*

गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मध्ये सवतीच्या दराचा लाभ घेण्यासाठी शिबिरात नावनोंदणी आवश्यक आहे.☎️
*9151312121* , *8999593818*
डॉ विक्रांत पाटील
*9850526090*

*सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ.उज्वल येवले रविवार ०५ नोव्हेंबर रोजी रॉयल हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी साठी उपलब्ध*🏥*सुप्रसिद्...
01/11/2023

*सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ.उज्वल येवले रविवार ०५ नोव्हेंबर रोजी रॉयल हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी साठी उपलब्ध*🏥

*सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन* *डॉ उज्वल येवले* ( M.S. MCh.Neurosurgery)
*रॉयल हॉस्पिटल येथे रविवार दि.०५/११/२०२३ रोजी दुपारी १२ ते दु.३.३० वाजेपर्यंत* रुग्ण तपासणी करीता उपलब्ध राहणार आहेत.

*डॉ.उज्वल येवले* यांनी न्युरो सर्जरीचे आपले वैद्यकीय शिक्षण *भारतातील अव्वल दर्जाचे neuroscience मधील बेंगलोर येथील(NIMHANS)* 🏣या नामांकित इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केले असून मुंबई येथील *टाटा हॉस्पिटल ,हिंदुजा हॉस्पिटल,फोर्टिस* अश्या नामांकित हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. *ब्रेन, स्पाईन ट्युमर आणि पेरिफेरल नर्व सर्जरिज, व्हास्क्युलर न्यूरो सर्जरी, मिनिमल इन्वेसिव्ह स्पाईन सर्जरी ,अवेक ब्रेन सर्जरी.* अश्या शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

मणका व मेंदूच्या आजारातील रुग्णांना सामान्यपणे मुंबई, पुणे ,कोल्हापूर, मिरज यासारख्या ठिकाणी उपचारांसाठी जावे लागते. अश्या रुग्णांना *रॉयल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने* आता खेड येथेच उपचार उपलब्ध करून दिले आहेत.
न्यूरोसर्जन डॉ.येवले हे प्रत्येक महिन्यात रुग्ण तपासणी करीता उपलब्ध राहणार आहेत. *वारंवार डोके दुखणे,ब्रेन ट्युमर ,पक्षाघात यामुळे मेंदूला इजा होणे, वारंवार चक्कर येणे, हातापायातून मुंग्या येणे, मेंदूचे आजार,मणक्याचे विकार, स्मृतीभ्रंश* अशी विविध लक्षणे असणाऱ्या रुग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

✨अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी आजच संपर्क करा.☎️ *९१५१३१२१२१,८९९९५९३८१८*

*मधुमेह रोखुया निरोगी जीवन जगुया !*👨🏻‍⚕️आपल्या " *रॉयल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* " मध्ये मधुमेह या आजाराने ग्रस्त असलेल्...
30/10/2023

*मधुमेह रोखुया निरोगी जीवन जगुया !*👨🏻‍⚕️

आपल्या " *रॉयल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* " मध्ये मधुमेह या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आता *डायबिटीस क्लिनिक सुरू झाले आहे.* प्रत्येक महिन्यात पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी मधूमेह असणाऱ्या रुग्णांना डायबिटीस क्लिनिक चा लाभ घेता येणार आहे.

*या महिन्यात पहिल्या शनिवारी म्हणजे ४ नोव्हेंबर आणि तिसरा शनिवार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत*

*हे क्लिनिक खालील लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.* 👍🏻

▪️सतत विनाकारण थकवा येणं🙇🏻‍♂️
▪️हातापायांना मुंग्या येणे 🤲🏻🦵🏻
▪️सतत आणि फेसासारखी लघवी होणे
▪️विनाकारण वजन कमी होणे🤷‍♂️
▪️सतत तहान लागणे🥛
▪️दृष्टी धूसर होणे
▪️तोंड सुकल्यासारखे वाटणे
▪️झालेली जखम लवकर भरून न येणे🤦🏻‍♂️

*डायबिटिस क्लिनिक ची वैशिष्ठे*
🔸तज्ञ फिजिशियन डॉ.आकाश नारायणे यांचे मार्गदर्शन वर ५० टक्के सवलत
🔸 रक्तातील साखरेची मोफत तपासणी
🔸आहार तज्ञांचा सल्ला ५० टक्के सवलतीच्या दरात
🔸लॅब तपासण्या वर २० टक्के सवलत

या क्लिनिक चा व तपासणी आणि उपचारामधील सवलतीचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

आजच संपर्क करा ☎️
*रॉयल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल*
9151312121
8999593818

*डॉ विक्रांत पाटील*
9850526090

*प्रसिद्ध त्वचा विकार तज्ञ (स्किन स्पेशालिस्ट) डॉ गणेश सोनवणे रॉयल हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी करीता उपलब्ध असणार.👨🏻‍⚕️* ...
13/10/2023

*प्रसिद्ध त्वचा विकार तज्ञ (स्किन स्पेशालिस्ट) डॉ गणेश सोनवणे रॉयल हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी करीता उपलब्ध असणार.👨🏻‍⚕️*

प्रख्यात स्किन स्पेशालिस्ट *डॉ.गणेश सोनवणे (MBBS DDV , Skin Specialist & Consmatologist)*
*रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रॉयल हॉस्पिटल येथे 11 ते 2 वाजेपर्यंत* त्वचा विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांकरीता उपचार आणि मार्गदर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. ( डॉ.गणेश सोनवणे हे *प्रत्येक महिन्यात चौथ्या रविवारी* रॉयल हॉस्पिटल येथे उपलब्ध असणार आहेत.)

▪️चेहऱ्यावरील मुरूम , काळे डाग, वांग ,खड्डे असणे.
▪️चेहऱ्यावर वरील व शरीरावरील फोडी, खरूज, कांजण्या, नागीण , फंगल इन्फेक्शन.
▪️चेहऱ्यावरील काळसरपणा, सुरकुत्या.
▪️चामखीळ, तीळ, मस काढणे.
▪️सोरायसिस, पांढरे डाग.
▪️ चाई पडणे, लिखा होणे.
▪️अतिप्रमाणात केस गळणे, अकाली पांढरे होणे, खूप कोंडा होणे.
▪️अंगावर पित्त उसळणे ,स्किन अलर्जी.
▪️ स्ट्रेचमार्कस.
▪️हातापायांना खूप जास्त घाम येणे.
▪️अन्य कोणतेही त्वचाविकार.

अश्या त्वचा विकारांवर योग्य निदान आणि उपचार घेण्यासाठी खेड आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी *रॉयल हॉस्पिटल मध्ये डॉ.गणेश सोनवणे उपलब्ध असणार आहेत ज्यामुळे त्वचा विकारांवर योग्य उपचार रुग्णांना आता खेड मध्येच घेता येतील.* या संधीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घेऊन आपल्या त्वचेची निगा राखावी.

आपणास देखील वरील समस्या असतील तर आजच *रॉयल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* येथे संपर्क करून आपली नोंदणी करा.
☎️ *9151312121*
*8999593818*

*डॉ.विक्रांत पाटील 9850526090*

*निष्णात ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ञ)डॉ.अद्वैत गोरे शनिवार १४ ऑक्टोबर रोजी रॉयल हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असण...
06/10/2023

*निष्णात ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ञ)डॉ.अद्वैत गोरे शनिवार १४ ऑक्टोबर रोजी रॉयल हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असणार.👨🏻‍⚕️*

डॉ. अद्वैत गोरे हे *कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, हीमॅटोलोजिस्ट आणि*बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन* आहेत.
शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील *प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ.अद्वैत गोरे* दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत खेड मधील कॅन्सर ग्रस्त रुग्णांच्या तपासणी साठी रॉयल हॉस्पिटल येथे उपलब्ध राहणार आहेत.

*१८ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. अद्वैत गोरे यांनी आत्ता पर्यंत मुंबई येथील प्रसिद्ध नानावटी मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर केअर,कोहिनूर हॉस्पिटल,प्रिन्स अली खान हॉस्पिटल, जॉय हॉस्पिटल, झेन हॉस्पिटल* अश्या नामांकित हॉस्पिटल मध्ये रुग्णसेवा दिली आहे.

*केमोथेरपी*,*टार्गेटेड थेरपी* , *इम्मुनोथेरपी, हॉर्मोनल थेरपी, ऑटोलॉगास* आणि *ॲलॉजेनिक* *बोन मॅरो ट्रान्सप्लांट,प्यालीटेटीव्ह* *मेडीसिन* अश्या कॅन्सर उपचारांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर,ब्लड कॅन्सर,हेड अँड नेक कॅन्सर, लंग कॅन्सर, किडनी आणि प्रोस्टेट कॅन्सर, गॉल ब्ल्याडर, युरीनरी ब्ल्याडर, कोलोन, रेक्टम आणि पॅनक्रीयाज आणि इतर कोणत्याही प्रकारच्या कॅन्सर वर अचूक उपचार करण्यासाठी *प्रख्यात कॅन्सर तज्ञ डॉ अद्वैत गोरे प्रत्येक महिन्यात दुसऱ्या शनिवारी* मार्गदर्शन व उपचारासाठी उपलब्ध असणार आहेत.

कोकणातील कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना *डॉ.अद्वैत गोरे यांच्या कॅन्सर आजारातील प्रदीर्घ अनुभवाचा नक्कीच फायदा होईल.*
गरजू रुग्णांनी त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

अधिक माहिती आणि नावनोंदणी आजच संपर्क करा☎️
*9151312121*
*8999593818*

*सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन🩺 डॉ.उज्वल येवले रविवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी रॉयल हॉस्पिटल 🏥येथे उपलब्ध* *मेंदू, पाठीचा क...
03/10/2023

*सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन🩺 डॉ.उज्वल येवले रविवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी रॉयल हॉस्पिटल 🏥येथे उपलब्ध*

*मेंदू, पाठीचा कणा आणि नसांसह मज्जासंस्थेच्या स्थितीचे निदान आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी व अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यासाठी न्यूरोसर्जनच्या सल्ल्याची आवश्यकता असते.

**ब्रेन ट्यूमर*: ब्रेन ट्यूमरचे निदान करण्यासाठी करण्यासाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असू शकते.

*मेंदूला दुखापत* झालेल्या रुग्णाचे मूल्यांकन आणि उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असू शकते, जसे की आघात, दुखापत किंवा रक्तस्त्राव.

*पाठीच्या कण्याला दुखापत*: पाठीच्या कण्याला दुखापत हर्निएटेड डिस्क किंवा स्पाइनल फ्रॅक्चर.

*हायड्रोसेफलस*: हायड्रोसेफलस असलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी

*स्ट्रोक* अथवा *पक्षाघात*: स्ट्रोक झालेल्या रूग्णावर उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जनची/ आवश्यकता असू शकते.

*पार्किन्सन रोग*: पार्किन्सन रोग आणि इतर हालचाली विकारांवर उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जनची आवश्यकता असू शकते.

१२ वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असलेले प्रख्यात न्युरो सर्जन
*डॉक्टर उज्वल येवले (MBBS,MS,MCH neurosurgery )* रविवार दिनांक *०८ ऑक्टोबर* रोजी
रॉयल हॉस्पिटल,खेड येथे *सकाळी १०.३० ते दुपारी ३.३०* या वेळेत रुग्ण तपासतील.

रुग्णांनी या सेवेचा लाभ अवश्य घ्यावा.
*रॉयल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल*
☎️ संपर्क :
*9151312121*
*8999593818*

Address

1st Floor, Bharne Naka, Bahar Commercial Complex, Mumbai - Goa Highway, Khed, Maharashtra 415621
Khed
415621

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal Hospital Khed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Royal Hospital Khed:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category