04/12/2025
ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर पोस्टर स्पर्धा संपन्न.
ज्ञानदीप फार्मसी महाविद्यालय बोरजच्या ज्ञानवृद्धी क्लब, रेड रिबन क्लब (RRC) आणि सब-डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कळंबनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन कार्यक्रमाचे आयोजन ०३ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रविण राठोड, डॉ. परेश मळंनगावकर, श्री. विलास म्हसके (ICTC प्रमुख, सब-डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कलंबनी) आणि श्री. पंकज जाधव (एक्स-रे तंत्रज्ञ, सब-डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कलंबनी) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. घोडके यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. नगरे यांच्या हस्ते अतिथींचे स्वागत व सत्काराने झाली. पोस्टर स्पर्धा सादरीकरणाचे उद्दिष्टाचे स्पष्टीकरण डॉ. पटवर्धन यांनी केले. त्यांनी वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यामागील महत्त्व, एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, लवकर निदान आणि एड्सविषयक सामाजिक कलंक कमी करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर मान्यवर अतिथींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शनपर लघु भाषणे दिली. त्यांनी सुरक्षित आरोग्य वर्तनाचे महत्त्व, एचआयव्ही संक्रमण टाळण्यासाठीचे उपाय, तसेच सरकारी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध सल्ला व तपासणी सुविधा याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पोस्टर्समध्ये विद्यार्थ्यांनी एचआयव्हीची संरचना, संक्रमणाची पद्धत, रुग्ण समुपदेशन, उपलब्ध थेरपी आणि प्रतिबंधक उपाय यावर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या पोस्टर्सद्वारे एचआयव्ही/एड्सची माहिती सुलभ, आकर्षक व शैक्षणिक पद्धतीने सादर केली. परीक्षकांनी उत्कृष्ट पोस्टर्स निवडून विजेत्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कार प्रदान केले.
कार्यक्रमाचा समारोप सौ. शिगवण यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. अनिल शिवदे, तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष श्री. रुपल पाटणे, जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, तसेच संस्थेचे सर्व सभासद यांचेकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.